II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
गुरु पाहता पाहता लक्ष कोटी।
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी॥
मनी कामना चेटके धातमाता।
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता॥१८०॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
3 comments:
गुरु हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे मोक्षदात्या गुरुची लक्षणे या श्लोकापासून १८४ व्या श्लोकापर्यंत समर्थांनी सांगितली आहेत .गुरूंची जर यादी करायची तर ती खूप मोठी होते .आई वडील माणसाचे पहिले गुरु असतात .विद्या देणारे शाळेतले शिक्षक गुरु होतात .ते आपल्याला भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान करून देतात .पोट भरण्यासाठी विद्या देतात .मंत्र ,तंत्र शिकवणारे गुरु असतात .पण ह्यातले कोणतेच गुरु मोक्ष देत नाहीत . मंत्र शक्तीने अनेक गोष्टी करणारे गुरु आहेत .वासनेमुळे भीड बाळगून शिष्याच्या तंत्राने चालणारे गुरु पुष्कळ आहेत आशाळपणे ईश्वर भजन करणारे अनेक असतात .हे सर्व सुध्दा मोक्षदाते नाहीत .
ज्ञाना शिवाय मोक्ष मिळत नाही सद्गुरू शिवाय ज्ञान मिळत नाही .मोक्ष म्हणजे जन्म मरणातून सुटका होते .समर्थ म्हणतात –असो जयासी मोक्ष व्हावा | तेणे सद्गुरू करावा ||५-१-४४ ||भोंदू गुरुच्या नादी लागून फसवणूक होऊ नये अत्यंत जागरुकतेने मोक्षदाता गुरु शोधावा .गुरूला पारखून घ्यावे
श्लोक १८०.....
गुरु पाहतां -पाहतां लक्ष कोटि |
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ||
मनी कामना चेटके धात्माता |
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्ति दाता ||१८०||
हिन्दी में ......
गुरु देखते - देखते लक्ष कोटि |
बहू रे विधी मंत्र की शक्ति होती ||
मनो कामना टोटके रे जो रखता |
बडा व्यर्थ जीवन नमुक्ति है पाता ||१८०||
अर्थ..... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव १ गुरु इस संसार मे लक्षावधी है | नाना विधी मंत्रों की शक्ति अत्यंत ही महान है | परन्तु जो भी व्यक्ति झूठी लालसा के भोग हेतु टोना -टोटका करने की कामना रखता है या करता ही है | उसका जीवन व्यर्थ है | मुक्तिदाता की ओर से उसे किसी भी प्रकार की कोई मुक्ति प्राप्त नही होती |
प्रारब्ध आपल्यापूढे आपल्याच पूर्वकर्मांच्या अनुषंगाने सारे दृष्य उभे करते. असे असले तरी जन्मानंतरही देवाने दिलेल्या अफाट बुद्धीचा वापर करून आपल्याला वाईट, परमार्थास प्रतिकूल वातावरण चांगले करता येते व चांगले प्रारब्ध अधिक दिव्य़ करता येते. प्रत्येकाला ही संधी मिळतेच मिळते, पण कोणी ती संधी स्विकारून संतांची आवडीने सलगी करतो, तर कोणी संतांना हेटाळून बाजारबुणग्यांनाच जवळ करतो. असो!
संत हेच भूवरीचे देव, संत हेच ज्ञानाचे माहेरघर, संतत्व म्हणजेच मूर्तीमंत मुक्ती आणि संतत्व हीच आत्मशक्ती! साधकांनी ती नीट ओळखावी. भोंदू लोकांना बळी पडू नये, यासाठी संतांचा शोध घेण्याआधीच शास्त्रे धुंडाळावीत. शास्त्रात सांगितलेल्या संतांच्या खुणा जेथे दिसतात, तेथेच नतमस्तक व्हावे व एकदा का असे चरण सापडले की जन्मो न जन्मी ते सोडू नये. दिव्यत्व जेथे प्रत्ययाला येते, ते संत. चंद्राची शीतलता व तीर्थांची पवित्रता जेथे येऊन मिळते, ते स्थान म्हणजे संत. शंकराचे ज्ञानाश्रित वैराग्य व कालीमातेचे धर्माश्रित शौर्य जेथे साकार होते ते स्थान म्हणजे संत. अशा संतांनाच शरण जावे, लौकिक आशीर्वाद देणा-यांची फजित करून सोडावी.
Post a Comment