II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
जया मानला देव तो पुजिताहे।
परी देव शोधुनि कोणी न पाहे॥
जगी पाहता देव कोट्यानुकोटी।
जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
3 comments:
आपल्या सर्व जाणिवा, इच्छा, कामना, वासना भगवंतात म्हणजेच एका स्वरूपात विलीन करण्यासाठीच हा मनुष्यजन्म देवाने दिलेला आहे. असे असूनही मनुष्य स्वतःच्या कामना तशाच ठेऊन जीवन जगतो. त्याचा स्वार्थ मोह काही त्याला सोडवत नाही, तो त्याच्या ठिकाणी असा काही मुरलेला असतो की देवाची भक्ती करतानाही तो तेथे कामना जागृत ठेऊन आपल्या सोयीनुसार भक्ती, सेवा करू पाहतो. परिणामतः भक्तीचे जे फळ विरक्ती ती तर दूर राहतेच पण त्याच्या भक्तीलाही विकृत स्वरूप प्राप्त होते. असा मनुष्य स्वतः तर भक्तीपथावर चालत नाही, पण जे सद्भक्त असतात, त्यांना मात्र भरकटवतो.
असा मनुष्य आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने अनुरूप देवतेचे भजन-पूजन करतो. धन प्राप्त करण्याच्या हेतूने मनुष्य लक्ष्मी, कुबेराची पूजा करतो. सोमवारी शंकराच्या मंदिरात, तर मंगळवारी गणपतीच्या इ. वास्तविक प्रत्येक देवता ही त्या त्या गुणांची श्रेष्ठतम अवस्था असून ती केवळ आपला आदर्श होऊ शकते, पण प्राप्तव्य नाही. प्राप्तव्य एकच आहे, ते म्हणजे हे सर्व गुण ज्याच्यापासून व ज्याच्या प्राप्तीसाठी उत्पन्न झालेत असा परमात्मा.
ज्याला जसा देव आवडतो ,इओ देव आवडतो त्याचे पूजन तो करतो .तो दव मग प्रतिमांच्या ,चित्रांच्या,मूर्तींच्या रूपात असतो .कोणी म्हसोबा ,कोणी खंडोबा ,कोणी मारुती ,अशा अनेक प्रकाराच्या देवांची पूजा करतात .कोणाचे देव मातीचे ,कोणाचे पाषाणांचे ,धातूंचे ,काष्ठांचे चीत्रालेप ,टाक ,नाणी अशा अनेक प्रतीकांची पूजा केली जाते .पण हे सर्व सगुण रूपातले देव आहेत म्हणजे नाश पावणारे आहेत . पण खरा देव जो निर्गुण निराकार आहे त्याची कल्पनाही माणूस करू शकत नाही कारण तो निर्गुण असल्यामुळे सगुण रूपात तो नसातू .माणसाला काहीतरी आलंबन लागते .पूजा विधीत वाहायचे असलेले गंध ,फुल ,अत्तर हार कोणाला वाहायचे असा प्रश्न येतो .त्या निर्गुणाची आपल्याला कल्पनाही करता येत नाही .सगुण देवांची पूजा शेवटी मूळ देवाला ,थोरल्या देवालाच जाऊन पोहोचते .जसे आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरं |सर्व देव नमस्कारं केशवं प्रती गच्छति || आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाव मिळते ,तसे या देवांना केलेला नमस्कार केशवाला जाऊन मिळतो .
अद्न्यानाने जी भक्ती होते ,त्यामध्ये पुण्यसंचय होऊ शकतो .कामना सिद्धीला जातात .पण उपासनेच्या शेवटी देव उपासनेच्या शेवटी होणारी देव भक्तांची अखंड भेट होणार नाही .कारण व्यापक उपासना होत नाही संकोचित भक्ती होते ..व्यापक उपासना न झाल्यामुळे चैतन्य युक्त प्राणीमात्राच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होत नाही .दारी आलेल्या दरिद्रीनारायणासाठी प्रेमभाव उत्पन्न न झाल्यामुळे त्याला मदत करावीशी वाटत नाही .
श्लोक १७८...
जया मानला देव तो पूजिता हे |
परी देव शोधुनि कोणी न पाहे ||
जगी पाहतां देव कोट्यानुकोटि |
जया मानली भक्ति जे तेचि मोठी ||१७८||
हिन्दीमें ......
जिसे माना भगवन उसे पूजता रे |
पर भगवन ढूंढ के कोई ना देखे ||
जग में दिखते कोटि कोटि देव रे |
जो भगवन माना वही भक्त कहलाये ||१७८||
अर्थ.... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! मनुष्य जिसे भगवान मान लेता है उसे पूजतारहता है , मानता रहता है | पर्न्तु भगवान को कोई ढूंढने की कोशिश नही करता है | संसार में देखा गया है कि भगवान के रुप कोट्यावधि [कोटि - कोटि ] है |इस बात को मान लेता है वह महान भक्त कहलाता है , अर्थात उसकी भक्ति महान है यह कहा जाता है | अत: मुख्य उद्द्येश्य यह हौ कि सतत भगवान के स्मरण मे रत रहो | उसे कभी ना भूलो |
Post a Comment