Friday, March 29, 2013

श्लोक १६७

II श्रीराम समर्थ II 

बरा निश्चयो शाश्वताचा करावा।
म्हणे दास संदेह तो वीसरावा॥
घडीने घडी सार्थकाची धरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६७॥


जय जय रघुवीर समर्थ !

Friday, March 22, 2013

श्लोक १६६

II श्रीराम समर्थ II 

 अहंकार विस्तारला या देहाचा।
स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥
बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥


जय जय रघुवीर समर्थ !

Friday, March 15, 2013

श्लोक १६५

II श्रीराम समर्थ II 


देहादीक प्रपंच हा चिंतियेला।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला॥
हरीचिंतने मुक्तिकांता करावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६५॥ जय जय रघुवीर समर्थ !

Friday, March 8, 2013

श्लोक १६४

II श्रीराम समर्थ II
 
मनें कल्पिला वीषयो सोडवावा।
मनें देव निर्गूण तो ओळखावा॥
मनें कल्पिता कल्पना ते सरावी।
सदा संगती सज्जनाची धरावी॥१६४॥


 जय जय रघुवीर समर्थ !

Friday, March 1, 2013

श्लोक १६३

II श्रीराम समर्थ II 

 
देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।
देहातीत ते हीत सांडीत गेला॥
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।
सदा संगती सज्जनाची धरावी॥१६३॥जय जय रघुवीर समर्थ !