Friday, March 29, 2013

श्लोक १६७

II श्रीराम समर्थ II 

बरा निश्चयो शाश्वताचा करावा।
म्हणे दास संदेह तो वीसरावा॥
घडीने घडी सार्थकाची धरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६७॥


जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक १६७.....
बरा निश्चयो शाश्वताचा करावा |
म्हणे दास संदेह तो वीसरावा ||
घडीने घडी सार्थकाची करावी |
सदा संगती सज्जनाची धरावी ||१६७||
हिन्दी में ........
अरे निश्चय शाश्वत ता का रखो रे |
अरे मन का संदेह जड से भूलो रे ||
पल ही पल को सार्थक तुम करो रे |
सदा संगती सज्जनों की धरो रे ||१६७||
अर्थ...... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! अहं ब्रह्मास्मि यह एक शाश्वत यथार्थ है | अत: इसी शाश्वतता का निश्चय करना चाहिये | मनुष्य यदि अपने मन में शंकायें न रखे तो उसके लिये हितकर है कि प्रत्यैक पल-पल को सार्थक करने का प्रयास करना चाहिये तथा सदैव सज्जन लोगों की संगति में रहना चाहिये जिससे जीवन सफ़ल एवं सार्थक हो सके |

suvarna lele said...

समर्थ या श्लोकात सांगतात की शाश्वताचा निश्चय करावा .म्हणजे मी कोण याचा निश्चय करावं मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे असा निश्चय झाला की शाश्वत सुखाची प्राप्ती होते .जेव्हा देहबुद्धी असते तेव्हा त्याच्या जवळील देहाभिमानाने त्याच्या मनात संशय असतात .मन समाधानी नसते .मी कोण याचे ज्ञान नसते .सुख दु:खात्मक संशयी जीवन माणूस जगत असतो . तो संशय श्रवण ,मनन ,चिंतनाने नाहीसा करावा .श्रवण करावे सज्जनाच्या ,ज्ञानी माणसाच्या मुखातून ,! तरच जीव ब्रह्मच आहे असे ज्ञान या नरदेहात होते .असे ज्ञान होणे म्हणजे घडीने घडी सार्थकाची होते .ह्या साठी सज्जनाची संगती हवी .








समर्थदास said...

बंधनाचे एकमेव कारण म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे संदेहाला जागा उरते, तेथून सुरू होतो भ्रमाचा, मायेचा सारा खेळ. नि:संदेह वृत्ती होणे हे खरे साध्य, हीच जीवनाची सार्थकता आणि इतिकर्तव्यता. ईश्वर, ईश्वराची कार्यप्रणाली याविषयी साधकाची वृत्ती जोवर नि:संदेह होत नाही, तोवर स्वरूपाबरोबर लपंडाव सुरूच राहतो.
हा संदेह दूर होण्यासाठीच तर संतसहवास असतो, ग्रंथाभ्यास असतो. संताच्या ठिकाणी भक्ताला ते निर्गुण, निराकार, अचिंत्य स्वरूप अनुभवता येते आणि तेथेच स्वस्वरूपाचा कित्ता गिरवायला शिकता येते. अशी ही व्यवस्था ईश्वरानेच लावून दिली आहे. तेथे संशय ठेवता कामा नये. आधी ग्रंथप्रचिती, मग गुरूप्रचिती , शेवटी ईश्वरप्रचिती.