Friday, June 21, 2013

श्लोक १७९

II श्रीराम समर्थ II

तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले।
तया देवरायासि कोणी न बोले॥
जगीं थोरला देव तो चोरलासे।
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे॥१७९॥
 
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

suvarna lele said...

ज्याच्या सत्तेमुळे स्वर्ग ,मृत्यू ,पाताळ हे तीन लोक निर्माण होतात त्या श्रेष्ठ देवास कोणीच ओळखत नाही .थोरला देव म्हणजे परब्रह्म ,निरुपाधिक आत्मा ,परमेश्वर होय .जेव्हा मायेची उपाधी थोरला देव स्वीकारतो तेव्हा शुध्द असलेले ब्रहम शबल होते .मग त्याला ईश्वर म्हणतात .जोपर्यंत देह्बुध्दी असते तोपर्यंत या थोरल्या देवाचा माणसाला विसर पडलेला असतो .या थोरल्या देवावर मायेचे आवरण आणि विक्षेप असतो मायेचे आवरण तोडून जर थोरला देव पहायचा असेल तर केवळ सद्गुरुकृपाच हवी .सद्गुरू कृपेने जर शिष्य बुद्धी प्रज्वलित झाली तर मुख्य देव समजतो .,त्या देवाचे रूप तच माझे रूप आहे असे समजते .तेच स्वस्वरूप आहे हे सर्व सद्गुरू कृपेने समजते .

समर्थदास said...

ईश्वराने सृष्टी निर्माण केली, प्राणीमात्र निर्माण केले. त्या सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्यासारखा बुद्धीमान प्राणीदेखील निर्माण केला की ज्या योनीत जन्म मिळाल्यास जीव स्वतःचे परमध्येय मोक्ष प्राप्त करून ईश्वर होऊन ईश्वराचे कार्य करेल. त्यासाठी सहाय्यीभूत म्हणून देव स्वतः सगुण रूपात निरंतर या धरेवर भगवंत म्हणून कैक ठिकाणी, तेथील लोकांच्या शुभ प्रारब्धाने, त्यांच्या कल्याणासाठी, वास करत असतो आणि अशा संत-सद्गुरूंना शरण जाण्याऐवजी लोक इतर देवी-देवतांना केवळ लौकिक मोहापोटी भजतात.
खरं तर तो थोरला देव, सर्व देवांचा, सृष्टीचा आजा सगुण देह धारण करून मनुष्यासाठी मनुष्यदेहातील सुख-दुःखांचे खेळ माणूस होऊन खेळतो, पण त्याच्या या माणसाच्या भूमिकेमागील ईश्वरीतत्त्व सामान्यांच्या लक्षात येत नाही व ते त्याची मनुष्य म्हणून अवहेलना करतात. अशा विभूतीची ओळख ती विभूती स्वतःच करून देऊ शकते, दुसरे कोणी नाही. म्हणून या भूदेवांनीच काय ती भक्ती शिकवावी आणि आम्हा अज्ञानांकडून करवून घ्यावी. हीच सगुण भक्तीतील अवीट गोडी आहे. पण कुतर्की मनुष्य मात्र या गोडीला मुकतो.

lochan kate said...

श्लोक १७९....
तिन्ही लोक जेथुनि निर्माण झाले |
तया देव्रायासि कोणी न बोले ||
जगी थोरला देव तो चोरलासे |
गुरुविण तो सर्वथा ही न दीसे ||१७९||
हिन्दी मे .......
तीनो लोक निर्माण जहां से हुए |
उस भगवन को कोई ना बोले ||
जग मे वो बडा देव है गुप्त
रे |
गुरु बिन वो तो रहता है लुप्त रे ||१७९||
अर्थ..... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! स्वर्ग म्रुत्यु एवं पाताल इन तीनों लोकों को जिसने निर्माण किया उस भगवान को अर्थात् ब्रह्माजी को कोई कुछ नही कहता है | इस संसार का वह सबसे बडा भगवान गुप्त रुप में रहता है परन्तु सद् गुरु के बिना परमेश्वर प्राप्त नहीं हो सकता | अत: सद् गुरु का होना अत्यंत ही आवश्यक है |