II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
तुटेना फुटेना कदा देवराणा।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा॥
कळेना कळेना कदा लोचनासी।
वसेना दिसेना जगी मीपणासी॥१७७॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
3 comments:
वेदांमध्ये मुक्तीचा मार्ग सांगून देव अलिप्त राहिला नाही, तर तोच इंद्रियसंवेद्य श्रीगुरूंच्या रूपात प्रकट झाला व आईने बालकाला बोट धरूना चालवावे त्याप्रमाणे अधिकारी साधकाला मोक्षपथावर चालवू लागला. युगं पालटली, कल्प लोटली पण ईश्वराच्या या भावात कणमात्रदेखील बदल झाला नाही. हाच त्या अक्षरब्रह्माचा अक्षर भाव आहे.
देव अक्षर आहे, त्याला कोणी जाळू शकत नाही, कोणी मारू शकत नाही, पाण्याने भिजवू शकत नाही, आगीने भाजू शकत नाही, म्हणूनच आत्मारामालाही अक्षरत्व प्राप्त झाले आहे. तसेच आपला जीवभाव ज्यांनी या ईश्वरभावावर ओवाळून टाकलेला आहे, त्या संतांनाही अक्षरत्व प्राप्त होते. सामान्य मनुष्याचे हेच कर्तव्य ठरते, की त्याने मीपणा टाकून आपल्या सर्व भावांनी त्या सगुण-निर्गुण परमेश्वरात विलीन होऊन जावे, देवत्वावर आरूढ व्हावे.
मीपणाच्या सर्व जाणिवा टाकून दिल्याशिवाय आपल्याला त्या परमतत्त्वाचा गंधही लागत नाही. यासाठीच संतसहवासाची जाणिवपूर्वक जोड धरावी, संताच्या अलौकिक, कल्याणकारक जाणिवा आत्मसात कराव्यात आणि त्यायोगे ईश्वरच होऊन जावे.
श्लोक १७७......
तुट्ना फ़ुटेन कदा देव राण |
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा |
कळेना कळेना कदा लोचनासी |
वसेना दिसेना जगी मी पणासी ||१७७||
हिन्दी मे......
टूटता ना फ़ूटता कभी ये भगवन्त |
हिलता ना डुलता ना कभी दीन होता ||
समझ मे ना आता कभी चक्षुओ को |
दिखत न वसता कभी अहं मन को ||१७७||
अर्थ..... श्री समर्थ रामदास जी कहते हि कि हे मानव मन !भगवान ना कभी टूटता है ना ही कभी फ़ूटता है अर्थात् बॅटता नही है वह तो सर्व व्यापी है तथा दीन प्रव्रुत्ति के लोगों की तरह कदापि इधर उधर डोलता नही है | यह आंखों को दिखाई नही देता है | अहंकर के कारण संसार में परमेश्वर दिखाई नही देता है ना ही उसके [अहंकारी के ] ह्रदय में वास करता है |
शाश्वत देव चळणारा नाही ,फुटणारा नाही ,ढळणारा नाही [श्लोक १४७ मध्ये ही हा उल्ल्ख आला आहे ].हा देव सर्व सामर्थ्यवान आहे सच्चिदानंद रूप आहे त्यामुळे तो दैन्यवाणा नाही ..त्याचे स्वरूप कोणालाही ह्या चर्मचक्षु च्या सहाय्याने बघता येत नाही .मीपणा म्हणजे देहबुद्धीने तर खरा शाश्वत देव दिसतच नाही [श्लोक १७१ मध्ये ही हे वर्णन आले आहे ] .देहबुद्धीचे पांघरून मुख्य देवावर पडलेले असते ते जर दूर केले तरच मुख्य कोण कसा ते स्पष्ट कळेल .
Post a Comment