Friday, April 5, 2013

श्लोक १६८

II श्रीराम समर्थ II 
 
करी वृत्ती जो संत तो संत जाणा।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥
उपाधी देहेबुद्धीते वाढवीते।
परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥
 


जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक १६८.....
करी व्रूत्ति जो संत तो संत जाणा |
दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा ||
उपाधि देहे बुध्दि ते वाढविते |
परी सज्जना केवि बांधू शके ते ||
हिन्दी में .......
करे सदा सद् व्रुत्ति वो संत जानो |
दुराश न हो जिसको न हो दीन मानो ||
उपाधि देह बुध्दि को जो है बढाता |
पर सज्जनों को ना है बांध पाता ||१६८||
अर्थ.........श्री समर्थ रामदास स्वामी कहते है कि जो संत शाश्वत स्वरुप की पहचान करवा सके अर्थात् हम शाश्वत स्वरुप में लीन हो सके इतना आत्म चिंतन करा दे ऐसा ही गुरु करना चाहिय्रे | उसे ही संत कहना चाहिये जिसके अंदर विभिन्न गुण हो और दीन रुप में नही हो | प्रपंच की परेशानियॉ देह बुध्दि को बढावा देती रहती है परन्तु संत सज्जनों को यह सांसारिक प्रपंच बॉध के कभी भी नही रख सकते |

समर्थदास said...

बा मना, सतत वाईट विषयांच्या चिंतनात राहिल्यामुळे तर तुझी संसारी वृत्ती बनली आहे. तेव्हा आपले कल्याण साधायचे असेल तर त्वरीत भगवत् चिंतनाची कास धर बरं.
आपण ज्याचे चिंतन करतो त्याच्याशी तन्मय होऊन जातो. तेव्हा विचारांमध्ये सत् असेल तर सहजच आपणच संत होऊन जातो. हे विचारांचे चक्र नियंत्रीत करणारी ती आशा असते. ही आशा सहजच मनाला आपल्याकडे आकृष्ट करून मनुष्याच्या विचारांना, मनाला, बुद्धीला व्यापून टाकते. पण ज्याने विचारांना भगवत् नामाची ढाल-तलवार सहाय्यास दिली आहे, त्या सज्जनाला ही आशा कधीच दीनवाणा करू शकत नाही. उलट अशा संतांच्या वाटेलाही आशा भरकटत नाही, उलट दूर पळते. केवळ आशाच नाही तर आशा ज्या उपाधींच्या संबंधाने असते, त्या प्रापंचिक उपाधीही संतांना बाधू शकत नाही. ज्या उपाधींमध्ये अडकून मनुष्य आपलीच खरी ओळख विसरतो, त्या देह-प्रपंचादिक उपाधी संतांना उलट मोक्षमार्गात साधकच होतात. पहा ना, जो प्रपंच सामान्यांना जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकवतो, तोच एकनाथ महाराजांसाठी लोकसेवेचे साधन झाला.

suvarna lele said...

जो वृत्ती संत करतो तो संत असतो असे समर्थ म्हणतात .संत म्हणजे शांत आणि परब्रह्म .जो आपली वृत्ती शांत करतो ,म्हणजे शाश्वत अशा परब्रह्मरूपात स्थिर करतो ,तो संत असतो .बृत्ती स्थिर शांत असली की आपोआपच वाणी गोड होते कारण तेथे मत्सर नसतो ,राग ,द्वेष नसतो .बाह्याकारी संत आपल्या सारखाच दिसतो ,मग त्याला ओळखायचा कसा असा प्रश्न पडतो .तो जगात वावरतो तो फक्त भक्ती ,नीती ,ज्ञान धर्म या विषयीच बोलत रहातो .चित्तात राग द्वेष नसल्यामुळे तो चित्तात समाधान राखून असतो त्यामुळे निरिच्छ णी:स्पृह असतो .त्याच्याजवळ दुराशा नसते .कोणतीही स्वार्थ साधणारी ईच्छा नसते .त्यामुळे त्याला कसलीही अपेक्षा नसते .मग दैन्यही नसते .
काहीही स्वार्थासाठी मिळवायचे नसते ,पण स्वार्थ नसल्यामुळे देहबुद्धी नाहीशी होते .त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला धैर्याने तोंड देतो .संताला देह हीच उपाधी वाटते .त्यामुळे देहाबद्दल त्याला चिंता नसते .असेल ते असू दे नसेल अशी मनाची धारणा असते .अशी स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर सज्जन संगती धरावी .संत भेटला तर देहबुद्धी नष्ट करण्याचा उपाय विचारावा असे समर्थ या श्लोकात सांगतात .