Friday, April 12, 2013

श्लोक १६९

II श्रीराम समर्थ II 


 नसे संत आनंत संता पुसावा।
अहंकार विस्तार हा नीरसावा ॥
गुणेवीण निर्गुण तो आठवावा।
देहेबुद्धिचा आठवो नाठवावा ॥१६९॥



जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक १६९........
नसे अंत आनंत संता पुसावा |
अहंकार विस्तार हा नीरसावा ||
गुणे वीण निर्गुण तो आठवावा |
देहे बुध्दि चा आठवू नाठवावा || १६९||
हिन्दी में.......
नही अंत आनंत संतो से जानो |
अहं का विस्तार ना हो ये मानो ||
गुणो के बिना निर्गुण को बनालो |
देहे बुध्दि का ध्यान मन से निकालो || १६९ ||
अर्थ...... श्री समर्थ रामदास जी कहत्ते है कि हे मानव मन ! अगर तुम अनंत पा सकने में असमर्थ हो जाओ तो संतो की शरण में जाने का प्रयास करना चाहिये और अंतर मन में फ़ैला अंधकार रुपी अहंकार समेटने का प्रयास करना चाहिये |यदि आप में गुण नही हो फ़िर भी निर्गुण स्वरुप परब्रह्म का चिंतन करना चाहिये | देहबुध्दि का स्मरण अर्थात् अहंकार का स्मरण कदापि नही करना चाहिये |

समर्थदास said...

माया आणि परब्रह्म या दोहोंमधील सारासार विवेक संतांकडून शिकावा. ॐकारातून जे जे प्रकाशले ते ते मायिक. देह-जीव, क्षेत्र-क्षेत्रज्ञ, ब्रह्म-ब्रह्मांड, सत्-असत् सारं काही मायेच्याच कक्षेत येते. हे सारं द्वैत ज्याच्यावर भासत आहे, ते परमतत्त्व अनादी, अनंत आहे. खरं तर गूण आणि निर्गूण या दोहोंच्या पलीकडे ते आहे. अशा आपल्या स्वरूपाचे सातत्याने चिंतन करून मायिक कल्पनांचा मनातून त्याग करावा म्हणजे मन तदाकार होऊन राहते.

suvarna lele said...

आपण सामान्य माणसे संत भेटल्यावर त्यांना प्रापंचिक अडचणी विचारतो .त्यावर उपाय विचारतो समर्थ दासबोधात सांगतात की संत भेटल्यावर दोन गोष्टी विचाराव्या .देव कोण ? मी कोण ? ह्या दोन गोष्टी समजल्या तर अंत नसलेला ,अनंत असा परमात्मा ,परब्रह्म समजायला लागतो .त्यातून अहंकार कसा वाढत जातो ते कळते .अहंकाराचा विस्तार कसा निरासावा ते कळते .त्यातून एकाच गोष्टीचा निश्चय होतो की सर्व व्यापक असणारे ब्रहम चैतन्य सर्व जीवांमध्ये व्यापून आहे .तेच सत्य आहे .बाकी दृश्य असलेली सृष्टी ही भासमान आहे . ,कल्पनारूप आहे .हे ज्ञान पक्के होण्यासाठी गुणरहित आत्मस्वरूपाचे चिंतन करायला हवे .संपूर्ण शरीराला व्यापून असणारे चैतन्य म्हणजे मी हे ओळखले की त्या आत्मस्वरूपाचे चिंतन ,ध्यान धरणे म्हणजे निर्गुणाला आठवणे आहे .त्या चैतन्याचे ,आत्मारामाचे चिंतन म्हणजे गुणां शिवाय असणा-या निर्गुणांचे चिंतन करणे ,त्याला आठवणे आहे .
असे केले की देहबुद्धीचा आठव येणार नाही ,देहबुद्धी हळू हळू कमी होत जाईल .असे झाले की जीवात्मैक्य घडते .