श्लोक १७०......... देहे बुध्दि हे ज्ञान बोधे त्यजावी | विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी || तदाकार हे व्रुत्ति नाही स्वभवे | म्हणोनी सदा तेचि शोशीत जावे || १७०|| हिन्दी मे....... देह बुध्दि का ध्यान तुम छोड दो रे | विवेकि व्रुत्ति से तुम ज्ञान पा सकोगे || तदाकार व्रुत्ति न होती कभी भी | फ़िर भी सदा हो निर्गुण व्रुत्ति अभी भी ||१७० || अर्थ......श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! अपने विवेक से देह बुध्दि का ज्ञान अर्थात् विचारों का जडपन त्याग देना चाहिये और स्वविवेक के द्वारा उस निर्गुण परब्रह्म स्वरुप को प्राप्त करनें का प्रयत्न करना चहिये | ऐसा करना मनुष्य स्वभाव में स्वभावत: नही होता है फ़िर भी सदैव उस निर्गुण परब्रह्म को ढूढने का प्रयास करना चाहिये |
अज्ञानाच्या प्रभावाखाली मनुष्य दृष्याला सत्य मानून या मिथ्या दृष्यातल्या स्वत:च्या मिथ्या ओळखीशी तादात्म्य पावून आपल्या कर्तव्याला विसरतो आणि नाहक कर्मगतीचा गुंता अधिक वाढवतो. एक नाटक त्या नाटकातल्या पात्रासाठी जितके सत्य असते तितकेच हे दृष्य जग आपणासाठी सत्य असावयास हवे, त्यापेक्षा त्याला अधिक सत्यता जेव्हा दिली जाते तेव्हा काम, क्राेध, लोभ, मोहाची पुटं आपल्या बुद्धीवर चढतात. ही देहबुद्धी मी तो परमात्मा आहे या बोधानेच गळून पडते. सतत विवेकाचा आश्रय धरून कोणत्या गोष्टीला, घटनेला मी कसे हाताळणे पारमार्थिकदृष्ट्या श्रेयस आहे किंवा माझ्या ईश्वरास, सद्गुरूस अभिप्रेत आहे याचा विचार करूनच कर्म केल्याने तदाकार वृत्ती होते. मी परमात्म्यापासून कोणीतरी वेगळा आहे ही सहज वृत्ती असते; पण परमात्मस्वरूप हाच सर्वांचा मूळ स्वभाव आहे आणि तो प्राप्त करण्यासाठीच ही अध्यात्म्याची वाट धरावी लागते. आधी निग्रहाने, मग आग्रहाने, मग सहज स्वभावत:
देहभाव आत्मभावात स्थिर झाला की जीव ब्रहम यांचे ऐक्य घडते .ते घडण्यासाठी देह आणि देहसुख हेच माझे सुख हा भाव नाहीसा व्हायला हवा .हे अज्ञान संत सहवासातच नाहीसे होते .संत आपल्याला मी म्हणजे कोणी पंच कोशातीत असे आहे असे शिकवतात .अन्नमय कोष ,प्राणमय कोष ,मनोमय कोष ,विज्ञानमय कोष ,आनंदमय कोष असे पांच कोष आपल्या स्वस्वरुपाला आवरण घालून आहेत असे मानले जाते स्थूळ देह अन्नावर जगतो म्हणून स्थूळ देह हा अन्नमय कोष आहे असे मानले जाते .कर्मेंद्रीयांना जो कर्मे करायला भाग पाडतो तो प्राण मय कोष असतो .ज्ञानेंद्रिये व मन मिळून मनोमय कोष म्हणतात .ज्ञानेंद्रिये व बुद्धी मिळून विद्न्यांमय कोष म्हणतात .प्रिय ,मोद .प्रमोद या उपभोगांनी होणारा संतोष म्हणजे आनंदमय कोष .हे पांचही कोष आपल्या शरीरात असतात .स्थूळ सूक्ष्म आणि कारण या पांच देहांच्या ,या पांच कोशांचे आपण साक्षी आहोत असे समजणे म्हणजे आपण सच्चिदानंद रूप आहोत याचा प्रत्यय येतो आणि देहबुद्धीचा विसर् पडतो .हे सर्व होण्यासाठी सत्पुरुषांनी सांगितलेल्या साधन मार्गाने जाऊन परब्रह्माचा शोध घ्यावा व वृत्ती स्थिर करावी .
3 comments:
श्लोक १७०.........
देहे बुध्दि हे ज्ञान बोधे त्यजावी |
विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी ||
तदाकार हे व्रुत्ति नाही स्वभवे |
म्हणोनी सदा तेचि शोशीत जावे || १७०||
हिन्दी मे.......
देह बुध्दि का ध्यान तुम छोड दो रे |
विवेकि व्रुत्ति से तुम ज्ञान पा सकोगे ||
तदाकार व्रुत्ति न होती कभी भी |
फ़िर भी सदा हो निर्गुण व्रुत्ति अभी भी ||१७० ||
अर्थ......श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! अपने विवेक से देह बुध्दि का ज्ञान अर्थात् विचारों का जडपन त्याग देना चाहिये और स्वविवेक के द्वारा उस निर्गुण परब्रह्म स्वरुप को प्राप्त करनें का प्रयत्न करना चहिये | ऐसा करना मनुष्य स्वभाव में स्वभावत: नही होता है फ़िर भी सदैव उस निर्गुण परब्रह्म को ढूढने का प्रयास करना चाहिये |
अज्ञानाच्या प्रभावाखाली मनुष्य दृष्याला सत्य मानून या मिथ्या दृष्यातल्या स्वत:च्या मिथ्या ओळखीशी तादात्म्य पावून आपल्या कर्तव्याला विसरतो आणि नाहक कर्मगतीचा गुंता अधिक वाढवतो. एक नाटक त्या नाटकातल्या पात्रासाठी जितके सत्य असते तितकेच हे दृष्य जग आपणासाठी सत्य असावयास हवे, त्यापेक्षा त्याला अधिक सत्यता जेव्हा दिली जाते तेव्हा काम, क्राेध, लोभ, मोहाची पुटं आपल्या बुद्धीवर चढतात. ही देहबुद्धी मी तो परमात्मा आहे या बोधानेच गळून पडते. सतत विवेकाचा आश्रय धरून कोणत्या गोष्टीला, घटनेला मी कसे हाताळणे पारमार्थिकदृष्ट्या श्रेयस आहे किंवा माझ्या ईश्वरास, सद्गुरूस अभिप्रेत आहे याचा विचार करूनच कर्म केल्याने तदाकार वृत्ती होते. मी परमात्म्यापासून कोणीतरी वेगळा आहे ही सहज वृत्ती असते; पण परमात्मस्वरूप हाच सर्वांचा मूळ स्वभाव आहे आणि तो प्राप्त करण्यासाठीच ही अध्यात्म्याची वाट धरावी लागते. आधी निग्रहाने, मग आग्रहाने, मग सहज स्वभावत:
देहभाव आत्मभावात स्थिर झाला की जीव ब्रहम यांचे ऐक्य घडते .ते घडण्यासाठी देह आणि देहसुख हेच माझे सुख हा भाव नाहीसा व्हायला हवा .हे अज्ञान संत सहवासातच नाहीसे होते .संत आपल्याला मी म्हणजे कोणी पंच कोशातीत असे आहे असे शिकवतात .अन्नमय कोष ,प्राणमय कोष ,मनोमय कोष ,विज्ञानमय कोष ,आनंदमय कोष असे पांच कोष आपल्या स्वस्वरुपाला आवरण घालून आहेत असे मानले जाते
स्थूळ देह अन्नावर जगतो म्हणून स्थूळ देह हा अन्नमय कोष आहे असे मानले जाते .कर्मेंद्रीयांना जो कर्मे करायला भाग पाडतो तो प्राण मय कोष असतो .ज्ञानेंद्रिये व मन मिळून मनोमय कोष म्हणतात .ज्ञानेंद्रिये व बुद्धी मिळून विद्न्यांमय कोष म्हणतात .प्रिय ,मोद .प्रमोद या उपभोगांनी होणारा संतोष म्हणजे आनंदमय कोष .हे पांचही कोष आपल्या शरीरात असतात .स्थूळ सूक्ष्म आणि कारण या पांच देहांच्या ,या पांच कोशांचे आपण साक्षी आहोत असे समजणे म्हणजे आपण सच्चिदानंद रूप आहोत याचा प्रत्यय येतो आणि देहबुद्धीचा विसर् पडतो .हे सर्व होण्यासाठी सत्पुरुषांनी सांगितलेल्या साधन मार्गाने जाऊन परब्रह्माचा शोध घ्यावा व वृत्ती स्थिर करावी .
Post a Comment