II श्रीराम समर्थ II
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
नसे गर्व आंगी सदा वीतरागी।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी॥
नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा।
इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा॥१३४॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
3 comments:
या श्लोकात समर्थ योग्याची लक्षणे सांगत आहेत .योगी कसा असतो ? त्याच्या अंगी गर्व नसतो .,तो नेहमी शांत असतो ,त्याच्याकडे क्षमा ,शांती दया असते ,तो नेहमी दक्ष असतो .त्याच्याकडे लोभ नसतो ,त्याला कधीही राग येत नाही ,तो कधीही दैन्य वाणा नसतो .
तो अहंकारी नसतो ,त्याला आपल्या अंगी असणा-या सामर्थ्याची ,योग्यतेची ,मोठेपणाची जाणीव नसते .आपली योग्यता इतरांच्या लक्षात आणून देण्याचा तो प्रयत्न करत नाही .त्याच्या भोवती त्याचे स्तुती करणारे तो गोळा करत नाही .आपल्याला कोणी मोठा म्हणावे ,आपला मान करावा अश्ही त्याला अपेक्षा नसते .
तो वीतरागी असतो म्हणजे तो अनासक्त असतो कारण त्यांचा मीपणा संपलेला असतो .त्याची कोणत्याही या श्लोकात समर्थ सांगतात – विचारूनी बोलले ,विवंचुनी चाले |
विचारूनी बोले चे स्पष्टीकरण बरे शोधल्यावीण बोलू नको या चरणात आहे .केव्हाही बोलताना विचार करून ,नक्की काय घडले आहे ,एखादी गोष्ट खरी आहे की खोटे ह्याचा सारासार विचार करून बोलावे कारण असे सारासार विचार करून बोललेले सत्याच्या जवळ असते .सर्व प्रकारचा साधक बाधक विचार करून ,थोरा मोठ्यांचा विचार पाहून विचार करून बोलायाला हवे
विवंचुनी चाले –या ओळीचे स्पष्टीकरण जनी चालणे शुध्द नेमस्त राहो या ओळीत आहे विवंचुनी चालायचे म्हणजे विवेकाने वागायचे ,कृती करण्यापूर्वी सावध राहायचे .पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही असे वागायचे .कोणत्याही प्रकारे टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्गाने जाउन सर्व समावेशक निर्णय घेणे हे महत्वाचे .त्यामुळे संताप होत नाही .वागणे शुध्द ,निर्मळ ,सदाचार असणारे असावे .त्यामुळे ध्येय निश्चित ठरते व वागणे पवित्र होते .
विषयात आसक्ती राहिलेली नसते .स्वभावत:च त्याला विषयांची अभिलाषा नसते .तो उपभोग घेतो क्षमा व शांती चा .त्यामुळे निंदा अवहेलना ,अपमान ,तिरस्कार उपेक्षा कितीही झाली तरी त्याची चित्त वृत्ती नंदादीपा प्रमाणे प्रसन्न व शांत असतो .
दयाशीलता व अखंड दक्षता हीच सत्पुरुषाची योगसाधना ! एकनाथ महाराजांनी तहानलेल्या गाढवाला पाणी पाजून त्यांच्या व्यापक आणि निरपेक्ष दयेचे प्रत्यंतर दाखवले
सत्पुरुष दक्ष असतो त्याला बेशिस्त ,गबाळपणा आवडत नाही विहितकर्म तो टाळत नाही . परमार्थासाठी तो नेहमी दक्ष असतो .
असा योगी असतो दया क्षमा शांती दया दक्ष असतो त्याला लोभ ,क्षोभ नसतो तो दैन्यवाणा ही नसतो .
श्लोक १३४.....
नसे गर्व आंगी सदा वीतरागी |
क्षमा शांति भोगि दया दक्ष योगि ||
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा |
इही लक्षणी जाणिजे योगिराणा ||
हिन्दी में ........
नही गर्व मन में सदा विरागी |
क्षमा शांति भोगि दया दक्ष योगि ||
नही लोभ ना क्षोभ ना दीनता हो |
यही लक्षणो से होता योगि संत हो ||१३४||
अर्थ....
श्री राम दास जी कहते है कि हे मानव मन ! जो अपने को सम्पूर्ण विरक्त रखता हो अर्थात् गर्व रहित जिसका व्यक्तित्व हो | जिसके मन्में क्षमा , शांति , दया की भावना है वही व्यक्ति योगि प्रव्रुत्ति का कहलाता है , अर्थात जिसके मन में लोभ नही है उसके मन में क्षोभ [ गुस्सा] कैसा ? ना ही वह व्यक्ति दीनता पूर्वक रहता है | यही लक्षण जिसमें होते है वही व्यक्ति "संत " , " योगि " कहलाता है |
योगी पावन मनाचा
Post a Comment