Friday, August 31, 2012

श्लोक १३७


II श्रीराम समर्थ II

जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले॥
देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना।
जुने ठेवणें मीपणें आकळेना॥१३७॥

 
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण



जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

जीवासाठी श्रेष्ठ म्हणजे हितकारक ते श्रेष्ठ म्हणजे संत सांगून गेले ,परंतू जीवाने आपली स्थिती सोडली नाही म्हणजे अज्ञानाची स्थिती सोडली नाही .देहबुद्धीने वागणे खोटे आहे ते टाळता येत नाही .
सन्त हिताचे महणजे काय सांगतात ते समजावून घेतले पाहिजे संत सांगतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ..म्हणजे देह म्हणजे मी ही बुद्धी सोडून आत्मा म्हणजे मी अशी बुद्धी करावी .का असे सांगतात ? कारण देह म्हणजे मी म्हणाले की देहाबद्दल प्रेम वाटायला लागते .मग देहाला सुख देणा-या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो .त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर त्या गोष्टी मिळवण्याची वासना वाढते आणि त्याचे रुपांतर क्रोधात होते .काम ,लोभ ,मोह ,मद ,मत्सर ,असे विकार उत्पन्न होतात आणि त्यातूनच नाश होतो .म्हणून संत आपल्याला आत्मबुद्धी करायला सांगतात .कारण देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेना | तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना | असे समर्थ सांगतात .देह्बुधीने विवेक ,विचार रहात नाही म्हणून तिचे कर्म खोटे आहे असे समर्थ म्हणतात .त्यामुळेच जुने ठेवणे म्हणजे परब्रह्माचे स्वरूप कळत नाही .

lochan kate said...

श्लोक १३७........
जिवा श्रेष्ट ते स्पष्ट सांगोनि गेले |
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले | |
देहे बुध्दि चे कर्म खोटे टळेना |
जुने ठेवणे मी पणे आकळेना ||१३७||
हिन्दी में ....
रहे श्रेष्ट वो स्पष्ट कहकर है बोले |
फ़िर भी अज्ञानी जीव वैसे ही झोले ||
देहे बुध्दि के कर्म झुठे जो टले ना |
भरा जो अहंकार वो तो छुटे ना ||१३७||
अर्थ......
श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! श्री संत ज्ञानेश्वर महाराज भी कह गये है कि मन की आत्मा द्रुष्टि का कर्म भोग कभी भी टलता नही है | पुराने ग्रन्थ पुराणों में जो पुरातन ज्ञान है उसे सदैव सम्हाल कर रखना चाहिये अर्थात् उसका सदुपयोग करते रहना चाहिये | उसको पढ कर उसका उपयोग करते रहना चाहिये परन्तु मनुष्य अपनी अज्ञानता से उसको दूर ढकेलता रहता है | मनुष्य यदि चाहे तो उस ज्ञान का अपने जीवन में प्रयोग कर सकता है पर "अज्ञान के अहंकार "से भरे होने के कारण मनुष्य सही गलत को अपने जीवन में पहचान नही पाता और विनाश की ओर अग्रसर होता है |