Friday, August 3, 2012

श्लोक १३३

II श्रीराम समर्थ II

हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।
जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे।
तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥१३३॥

जय जय रघुवीर समर्थ !
 

2 comments:

suvarna lele said...

जो हरिभक्त ,विरक्त आणि विज्ञान रासी असतो ,ज्याने हरिभक्ती करण्याचा निश्चय केलेला असतो ,त्याच्या दर्शनाने ,स्पर्शाने पुण्य जोडले जाते ,त्याच्या भाषणाने वाईट संदेह ,शंकांचे निरसन होते .
हरीभक्त कसा असतो ? हा सत्पुरुष विरक्त असतो ,वैराग्य त्याच्या अंगी मुरलेले असते .तो ज्ञाननिधी असतो .ज्ञानाचा तो सागर असतो .तो विज्ञानरासी असतो म्हणजे त्याच्या अंगी अध्यात्म ज्ञान पुरेसे भरलेले असते .ज्ञानेश्वर महाराज प्रपंच विषयक ज्ञान म्हणजे विज्ञान म्हणतात पण येथे विज्ञान म्हणजे आत्मज्ञान असाच अर्थ घ्यायचा .
त्याच्या मनाने हरिभक्तीचा निश्चय केलेला असतो त्याच्याकडे धरसोड ,चंचळ पणा नसतो ,मनातले विचार पालटत नाहीत .हरिभक्ती विषयी तो ठाम असतो .त्यामुळेच तो नि:संशय असतो ,त्याच्या संगतीत थोडा वेळ जरी एखाद्या साधकाने घालवला ,त्याच्याशी दोन वाक्ये जरी बोलले तरी मन शांत होते .वृत्ती प्रसन्न होतात .श्रध्दा बळावते ,बुद्धी स्थिरावते .संदेह ,शंका ,कुशंका नाहीशा होतात . पण त्यासाठी अशा हरीभक्ताकडे जाणा-याचे मन शांत ,निर्मळ ,हवे .अहंकाराचा वाराही त्याच्याजवळ असायला नको .

lochan kate said...

श्लोक १३३....
हरी भक्त विरक्त विज्ञान राशी |
जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ||
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे |
तया भाषणे नष्ट संदेह मोडे ||१३३||
हिन्दी में.....
हरी भक्त विरक्त विज्ञानि होता है |
निश्चय मन में जिसके बस गया है ||
उसके दर्शनों से जुडता है पुण्य |
उसके भाषण से मन होता है धन्य ||१३३||
अर्थ.... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव ! जोव्यक्ति विरक्त हो गया हो , जिसनें हरि भक्ति की जिसनें अपनें मन में निष्ठा पैदा कर ली हो और वह ज्ञान से परिपूर्ण है , उसके केवल दर्शन मात्र से या स्पर्श मात्र से ही पुण्य की प्राप्ति होती है तथा उसके वचन सुनकर दुष्ट भावनायें समाप्त हो जाती है | इसलिये सदा सज्जन लोगों की संगति में रहना चाहिये |