Sunday, August 26, 2012

श्लोक १३६

II श्रीराम समर्थ II

भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे।
भयातीत तें संत आनंत पाहे॥
जया पाहतां द्वैत कांही दिसेना।
भयो मानसीं सर्वथाही असेना॥१३६॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

सर्व ब्रह्मांड भयाने व्यापले आहे .लोकांना रोगांचे ,धनाला चोरांचे ,कुलाला नाशाचे ,रूपाला ,तारुण्याला काळाचे भयं आहे परंतु संत भयातीत आहेत .भयाच्या पलीकडे आहेत संत भयातीत होण्याचे कारण ते परब्र्ह्माशी एकरूप होतात .त्यांच्यामध्ये वेगळेपणाची ,भावना नसते .त्यामुळे तेथे द्वैत नसते .द्वैत असले की भयं निर्माण होते .पण सज्जनांनी परब्र्ह्माशी अद्वैत साधलेले असते .त्यामुळे संताना कशाचेही भयं असत नाही .



lochan kate said...

श्लोक ...१३६ ....
भये व्यपिले सर्व ब्रह्मांड आहे |
भयातीत ते संत आनंत पाहे ||
जया पाहतां द्वैत कांही दिसेना |
भय मानसी सर्वथा ही असेना ||
हिन्दी में ......
भय व्याप्त है सारे ब्रह्मांड में रे |
भयातीत वो संत अनंत देखे ||
जिसे देखनें पर द्वैत दिखे ना |
भय मन में जो सर्वथा ही रहे ना ||
अर्थ...
श्री राम दास जी कहते है कि हे मानव मन ! यह सम्पूर्ण ब्रह्मांड भय से व्याप्त है | अत: डरे हुए सभी व्यक्ति उस अनंत ब्रह्म को देखते है , जिसको देखने से कुछ द्वैत नही दिखता और मन के भय का सर्वथा अंत हो जाता है |