Friday, February 24, 2012

श्लोक ११२

II श्रीराम समर्थ II


जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।
परी वादवेवाद तैसाचि ठेला॥
उठे संशयो वाद हा दंभधारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक ११२...
जनी सांगता ऐकतां जन्म गेला |
परी वाद वेवाद तैसाचि ठेला ||
उठे संशयो वाद हा दंभधारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी ||११२||
हिन्दी में ...
जनों में कहे सुने में ही जन्म गया |
परंतु वाद - विवाद वैसा ही रहा ||
उठा वाद संशय है बहुत दंभधारी |
छुटे वाद संवाद वो हितकारी ||११२||
अर्थ.... श्री राम दास जी कहते है कि हे मनुष्य ! माता के द्वारा या घर के बडे लोगों द्वारा सिखाई हुई बातें सुनते -सुनते और सीखते -सीखते समय निकल जाता है , परन्तु उनके द्वारा सिखायी हुई बातों को अनसुना कर देने से विवाद पैदा होता रहता है , अर्थात् व्यक्ति को नुकसान उठाना पडता है | दंभ से किया हुआ विवाद संशय पैदा करता है एवं संबंधों में कटुता पैदा करता है | अत: जिस संवाद से विवाद का अंत हो उसी प्रकार का संवाद करना चाहिये |

suvarna lele said...

डॉ सुषमाताई वाटवे यांना विनम्र अभिवादन !
जगाच्या सुरवातीपासून आत्तापर्यंत सांगणारे ,ऐकणारे पुष्कळ झाले .सांगणारा थकला ,ऐकणाराही थकला पण वादविवाद संपला नाही .तो तसाच राहिला .एखादी साधी घटना घडली तरी सर्वांची मते ,मतांतरे येतात .मग खरे कोण ,खोटे कोण कसे ठरवायचे ? सामान्य माणसांतच फक्त मतांतरे दिसत नाहीत तर ती वेदांतही आहेत .पतंजली चित्त निरोध करून जीवब्र्ह्मैक्य साधायला सांगतो .मीमांसक जैमिनी म्हणतो कर्म हेच म्हणजे ब्रह्म आहे .वेदांती म्हणतो सर्वा खल्विदं ब्रह्म ! हे सर्व वाद प्रक्कृतीतले आहेत .परमात्म वस्तू प्रकृती पलीकडे आहेत .
अनुभवाशिवाय वाद घातला तरी तो दंभ होतो .अनेक साधनातून आपल्याला योग्य असेल ,आपल्या अधिकारानुसार ,स्वभावानुसार ,आपले ध्येय गाठावे असे समर्थ सांगतात पण त्यासाठी सत्संग लागतो .सत्संगामुळे संशय निवृत्ती होते .वाद मिटतो ,स्व:चे हित साधते