Friday, February 3, 2012

श्लोक ११०

II श्रीराम समर्थ II

तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।
विवेके अहंभाव यातें जिणावें॥
अहंतागुणे वाद नाना विकारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक ११०...
तुटे वाद -संवाद त्याते म्हणावे |
विवेके अहंभाव याते जिणावे ||
अहंता गुणे वाद नाना विकारी |
तुटे वाद संवाद तो हितकारी ||११०||
हिन्दी में...
छुटे वाद- संवाद उसको है कह लो |
विवेक से अहंभाव उसको तुम जो लो ||
अहंकार हौ गुण वारी विकारी |
छुटे वाद संवाद वो हितकारी ||११०||
अर्थ....
श्री रामदास जी कहते है कि हे मनुष्य मन ! संवाद करना उस अच्छी बात को कहा जाता है , जिससे वाद-विवाद समाप्त हो जाता है | अपनें स्वविवेक से अहंकार को छोडकर आचरण करना व्यवस्थित जीवन है | अभिमान से किया गया वाद-विवाद नाना प्रकार के विकार उत्पन्न करता है | इसलिये जो बात सदैव हितकर हो वही करना चाहिये |

suvarna lele said...

या श्लोकात पहिल्या चरणात संवादाची व्याख्या केली आहे .ज्याच्यापासून वादाचा उलगडा होतो ,शेवट परस्पर समजुतीत होतो त्याला संवाद म्हणतात .वादाचे मूळ कारण असते अहंता ! अहंता म्हणजे अहंकार म्हणजे देहबुद्धी ! देहबुद्धी म्हणजे आपल्यामध्ये असणारे शुध्द अहं हे स्फुरण अज्ञानामुळे देहाशी तादात्म्य पावते .म्हणजे आपल्या देहामध्ये असलेला आत्मा देहाशी तादात्म्य पावतो तेव्हा अहं शबल म्हणजे अशुध्द होते व देहबुद्धी उत्पन्न होते .मग वाद उत्पन्न होते .समर्थ या वेळेस विवेक करायला सांगतात विवेक कोणता करायचा ? मी म्हणतो ते सर्व बाजूनी बरोबर आहे का ? माझ्या विचारात काही चुकत नाही ना ? समोरचा माणूस बोलतो आहे ते खरे आहे का ? आसा विवेक करता येण्यासाठी सत्संगती लागते किंवा ईश्वरी कृपा हवी .आपली अहंता ईश्वर चरणी अर्पण करणे हा सुध्दा एक उपाय आहे पण त्यासाठी सुध्दा सत्संगती हवीच .
सत्संगतीने देहबुद्धीचे प्राबल्य हळू हळू कमी होउ लागते .मग वैराग्य ,ज्ञान ,सर्वांमध्ये परमेश्वर पाहाण्याची सवय हळू हळू वाढू लागते आणि वादाऐवजी संवाद होऊ लागतो .