श्लोक ११०... तुटे वाद -संवाद त्याते म्हणावे | विवेके अहंभाव याते जिणावे || अहंता गुणे वाद नाना विकारी | तुटे वाद संवाद तो हितकारी ||११०|| हिन्दी में... छुटे वाद- संवाद उसको है कह लो | विवेक से अहंभाव उसको तुम जो लो || अहंकार हौ गुण वारी विकारी | छुटे वाद संवाद वो हितकारी ||११०|| अर्थ.... श्री रामदास जी कहते है कि हे मनुष्य मन ! संवाद करना उस अच्छी बात को कहा जाता है , जिससे वाद-विवाद समाप्त हो जाता है | अपनें स्वविवेक से अहंकार को छोडकर आचरण करना व्यवस्थित जीवन है | अभिमान से किया गया वाद-विवाद नाना प्रकार के विकार उत्पन्न करता है | इसलिये जो बात सदैव हितकर हो वही करना चाहिये |
या श्लोकात पहिल्या चरणात संवादाची व्याख्या केली आहे .ज्याच्यापासून वादाचा उलगडा होतो ,शेवट परस्पर समजुतीत होतो त्याला संवाद म्हणतात .वादाचे मूळ कारण असते अहंता ! अहंता म्हणजे अहंकार म्हणजे देहबुद्धी ! देहबुद्धी म्हणजे आपल्यामध्ये असणारे शुध्द अहं हे स्फुरण अज्ञानामुळे देहाशी तादात्म्य पावते .म्हणजे आपल्या देहामध्ये असलेला आत्मा देहाशी तादात्म्य पावतो तेव्हा अहं शबल म्हणजे अशुध्द होते व देहबुद्धी उत्पन्न होते .मग वाद उत्पन्न होते .समर्थ या वेळेस विवेक करायला सांगतात विवेक कोणता करायचा ? मी म्हणतो ते सर्व बाजूनी बरोबर आहे का ? माझ्या विचारात काही चुकत नाही ना ? समोरचा माणूस बोलतो आहे ते खरे आहे का ? आसा विवेक करता येण्यासाठी सत्संगती लागते किंवा ईश्वरी कृपा हवी .आपली अहंता ईश्वर चरणी अर्पण करणे हा सुध्दा एक उपाय आहे पण त्यासाठी सुध्दा सत्संगती हवीच . सत्संगतीने देहबुद्धीचे प्राबल्य हळू हळू कमी होउ लागते .मग वैराग्य ,ज्ञान ,सर्वांमध्ये परमेश्वर पाहाण्याची सवय हळू हळू वाढू लागते आणि वादाऐवजी संवाद होऊ लागतो .
2 comments:
श्लोक ११०...
तुटे वाद -संवाद त्याते म्हणावे |
विवेके अहंभाव याते जिणावे ||
अहंता गुणे वाद नाना विकारी |
तुटे वाद संवाद तो हितकारी ||११०||
हिन्दी में...
छुटे वाद- संवाद उसको है कह लो |
विवेक से अहंभाव उसको तुम जो लो ||
अहंकार हौ गुण वारी विकारी |
छुटे वाद संवाद वो हितकारी ||११०||
अर्थ....
श्री रामदास जी कहते है कि हे मनुष्य मन ! संवाद करना उस अच्छी बात को कहा जाता है , जिससे वाद-विवाद समाप्त हो जाता है | अपनें स्वविवेक से अहंकार को छोडकर आचरण करना व्यवस्थित जीवन है | अभिमान से किया गया वाद-विवाद नाना प्रकार के विकार उत्पन्न करता है | इसलिये जो बात सदैव हितकर हो वही करना चाहिये |
या श्लोकात पहिल्या चरणात संवादाची व्याख्या केली आहे .ज्याच्यापासून वादाचा उलगडा होतो ,शेवट परस्पर समजुतीत होतो त्याला संवाद म्हणतात .वादाचे मूळ कारण असते अहंता ! अहंता म्हणजे अहंकार म्हणजे देहबुद्धी ! देहबुद्धी म्हणजे आपल्यामध्ये असणारे शुध्द अहं हे स्फुरण अज्ञानामुळे देहाशी तादात्म्य पावते .म्हणजे आपल्या देहामध्ये असलेला आत्मा देहाशी तादात्म्य पावतो तेव्हा अहं शबल म्हणजे अशुध्द होते व देहबुद्धी उत्पन्न होते .मग वाद उत्पन्न होते .समर्थ या वेळेस विवेक करायला सांगतात विवेक कोणता करायचा ? मी म्हणतो ते सर्व बाजूनी बरोबर आहे का ? माझ्या विचारात काही चुकत नाही ना ? समोरचा माणूस बोलतो आहे ते खरे आहे का ? आसा विवेक करता येण्यासाठी सत्संगती लागते किंवा ईश्वरी कृपा हवी .आपली अहंता ईश्वर चरणी अर्पण करणे हा सुध्दा एक उपाय आहे पण त्यासाठी सुध्दा सत्संगती हवीच .
सत्संगतीने देहबुद्धीचे प्राबल्य हळू हळू कमी होउ लागते .मग वैराग्य ,ज्ञान ,सर्वांमध्ये परमेश्वर पाहाण्याची सवय हळू हळू वाढू लागते आणि वादाऐवजी संवाद होऊ लागतो .
Post a Comment