Saturday, November 26, 2011

श्लोक १००

II श्रीराम समर्थ II


यथासांग रे कर्म तेंहि घडेना।
घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥
दया पाहतां सर्व भुतीं असेना।
फुकाचे मुखी नाम तेंही वसेना॥१००॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक १००....
यथा सांग रे कर्म ते ही घडेना |
घडे धर्म तो पुण्य गांवी पडेना ||
दया पाहतां सर्व भूती असेना |
फ़ुकाचे मुखी नाम तेही वसेना ||१००||
हिन्दी में .....
सविस्तर वो कर्म तुझसे हुए ना |
यह पुण्य रे तेरे हाथों हुए ना ||
दया देखो तेरी व्रुत्ति में नही है |
बैठे में राम नाम तेरे मुख में नही है ||१००||
अर्थ....
श्री रामदासजी कहते है कि हे मनुष्य ! कोई कार्य यथा विधि नही हो पाता , अगर हो भी जाये तो जरुरी नही कि हमें पुण्य प्राप्त हो ही जाये | सम्पूर्ण संसार में सब जगह देखो दया भाव नही है | परन्तु जब तक वाणी के द्वारा बैठे बिठाये रामनाम का स्मरण नही किया जाय , तब तक पुण्य प्राप्त नही हो सकता |

ओम प्रभाकरराव पाठक said...

http://11maruti.blogspot.com/
pl.visit and give u r suggestion

suvarna lele said...

कर्म करताना ते विधीपूर्वक होत नाही त्यांमुळे कर्म मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचता येत नाही .कर्म म्हणजे स्वधर्माचरण .आपल्याला नेमून दिलेले कर्म .आपले विहित कर्म आपल्या वर्णानुसार करायचे कर्म .ते आपण करू शकलो नाही तर त्यातून दु:ख पदरात येते .
धर्म म्हणजे स्वत:च्या उन्नतीसाठी योग्य अशी धारणा .आचार प्रभवो धर्म: असे म्हणतात .ज्याच्या मुले सुखाचे धारण होते जीवन पोषण होते तो धर्म ! धर्मामुळेच उत्तम संतती ,संपत्ती ,अंती सद्गती प्राप्त होते .
स्वधर्माचरण करायचे म्हणजे आचरण म्हणजे कर्म करायचे धर्म कर्म प्रधान आहे वैयक्तिक ,सामाजिक ,कौटुंबिक ,पारमार्थिक ,या सर्वांचा अंतर्भाव धर्मात होतो .तो धर्म आचरणात आणला जात नाही .तर कर्मही योग्य रीतीने केले जात नाही
द्या ही सर्वांच्या प्रती सारखी असत नाही .जी गोष्ट आपण आपल्या मुलासाठी करू तीच गोष्ट आपण एखाद्या रंजलेल्या गांजलेल्या मुलासाठी करू शकत नाही .कारण आपण मुलावर करतो ती माया .दुस-या वर करतो ती दया .ती सुद्धा आपण करू शकत नाही .
ज्या नामाला ,जे नाम घ्यायला पैसे पडत नाहीत , जे फुकट घेता येते ,तेही आपण घेउ शकत नाही ,किती केविलवाणी अवस्था आपली !