Friday, December 2, 2011

श्लोक १०१

II श्रीराम समर्थ II 

 
जया नावडे नाम त्या यम जाची।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची॥
म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे।
मुखे बोलतां दोष जाती स्वभावें॥१०१॥



जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १०१ ....
जया नावडे नाम त्या येम जाची |
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ||
म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे |
मुखे बोलतां दोष जाती स्वभावे ||१०१ ||
हिन्दी में.....
जिसे नाम लेना मंजुर ना हो |
वो येम की यातना से ग्रसित हो ||
तर्क जो करे नर्क उसे है मिलता |
आदर से जो नाम ले उसका दोष है जाता ||१०१||
अर्थ ....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! जिसे राम का नाम अच्छा नही लगता है उस अधम व्यक्ति को यमराज दु:ख देते है | नामस्मरण के बारे में संशयात्मक विचारों द्वारा तर्क करने वाले लोगों को संसार में तुच्छ समझा जाता है इसलिये आदर से श्रीराम का नाम लेते रहना चाहिये | मुख से अंतर मन से राम राम बोलने से ही सारे दोष स्वाभविक रुप से नष्ट हो जाते है |

suvarna lele said...

ज्याला नाम घ्यायला आवडत नाही त्याला यमयातना सोसाव्या लागतात .त्यालाच समर्थ यम जाची असे म्हणतात .सामान्य माणसाला वाटते की मेल्यावरच माणसाला ज्या यातना सोसाव्या लागतात त्यांना नरक यातना म्हणतात .पण संतांच्या दृष्टीने जेव्हा माणसाच्या मनात तमोगुणाची अति वाढ होते ,तेव्हा त्याच्या अंत;करणाची जी अवस्था होते ती नरकापेक्षा भयानक असते ,कारण ती अज्ञानाची अवस्था असते .अज्ञानावस्था हाच नरक असतो
ज्याला भगवंताच्या बद्दल विकल्प असतो ,भगवद भजन करण्याची ईच्छा नसते त्याला जीवनात शांती मिळत नाही .त्याला अति दु:खे भोगावी लागतात .म्हणून कोणताही विकल्प मनात न ठेवता नाम घ्यावे नामाने देहाभिमान सुटतो .देहाभिमान सुटला की अज्ञान दूर होते .