Friday, November 11, 2011

श्लोक ९८

II श्रीराम समर्थ II

 
हरीनाम नेमस्त पाषाण तारी।
बहु तारीले मानवी देहधारी॥
तया रामनामीं सदा जो विकल्पी।
वदेना कदा जीव तो पापरूपी॥९८॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक ९८...
हरी नाम नेमस्त पाषाण तारी |
बहु तारिले मानव देह धारी ||
तया राम नामी सदा जो विकल्पी |
वदेना कदा जीव तो पाप रुपी ||९८||
हिन्दी में.....
हरी नाम लेने से पाषाण तरता |
तार गये बहुत मानव देह धारी ||
जिसे राम नाम लगता है विकल्प |
वद्न से न स्मरता है वो बुद्धी अल्प ||९८||
अर्थ...
श्री राम दास जी कहते हैं कि हे मनुष्य ! हरि नाम लेनें से तो पाषाण भी तर गये | परमेश्वर ने मानव देह धारण करके बहुतों का उध्दार किया | जिसके मन में राम नाम का उच्चार करनें से शंका उत्पन्न होती है और जो रामनाम का उच्चार नही करतावह पाप का भागीदार होता है | अत: रामनाम लेकर जीवन को तारनें का प्रयत्न करते रहना चाहिये |

suvarna lele said...

पाषाण जो पाण्यात टाकल्यावर बुडतो तो .श्रीरामांचे नाम लिहून पाण्यात टाकल्यावर पाण्यावर तरला .ही अशक्य वाटणारी घटना घडली रामायण काळात ! प्रभू श्रीराम जेव्हा सीतामाई ना सोडविण्यासाठी लंकेवर चाल करून गेले तेव्हा मधला समुद्र कसा पार करायचा हा प्रश्न होता तेव्हा सेतू बांधायचा ठरला तेव्हा सेतू बांधण्यासाठी वापारले गेलेले पाषाण श्रीराम असे नाम लिहून टाकले आणि अशक्य ते शक्य झाले .येथे एक रुपक समजता येईल दगड म्हणजे भक्ती नसलेला , ईश्वर न मानणारा माणूस . त्याने जर नामावर विश्वास ठेवला त्याने नाम घेतले तर तो नक्कीच तरून जाईल ,
नामाने केवळ पाषाणच नाही तर मानव देहधारी सुध्दा उद्धरून गेले अजामेळ आणि कुंटीणी न कळत नाम घेऊनही उद्धरून गेले .अनेक नामधारी संत नामाने उद्धरून गेले तुकोबा सदेह वैकुंठात गेले .वाल्या कोळ्यासारखा पापी नामाने उद्धरला .
पण जो नामाविषयी विकल्प मनात धरतो ,जो नाम घेत नाही तो पापी असतो .