Friday, September 30, 2011

श्लोक ९२

II श्रीराम समर्थ II

अती आदरें सर्वही नामघोषे।
गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषें।
विशेषें हरामानसीं रामपीसें॥९२॥3 comments:

lochan kate said...

श्लोक ९२....श्लोक ९२....
अती आदरे सर्व ही नाम घोषे |
गिरी कंदरी जाइजे दूरि दोषे ||
हरी तिष्ठतू तोषला नाम घोषे |
विशेषे हरा मानसी राम पीसे ||९२||
हिन्दी में....
अती आदर से सर्व ही नाम लेते |
गिरी कंदराओं में बैठ लेते ||
हरि भी ठहर जाये नाम के लेने से |
विषेश रहा नाम राम को जो लेते||९२||
अर्थ....
श्री राम दास जी कहते है कि हे मानव मन ! सब ओर अत्यंत आदर पूर्वक राम नाम का जय घोष होना चाहिये | पहाडों कंदराओं में भी दूर बैठकर भी राम नाम लेने से सारे दोष दूर हो जाते है | श्री शंकर जी के मन में श्री राम नाम का पागल पन विषेश रुप से है , उसे सुनकर श्री राम जी भी संतुष्ट होकर ठहर जाते है |

Dr.Madhavi Mahajan said...

मनाच्या श्लोका मध्ये समर्थांनी अनेक ठिकाणी नामसाधनेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. अस्थिर आणि अशांत मनाला स्थिर करण्यासाठी नामासारखे दुसरे साधन नाही. वाल्याकोळ्या सारखा दरोडेखोर असो अजामेळा सारखा पापी मनुष्य असो किंवा पिंगले सारखी वारांगना असो नामाच्या सहाय्याने निर्दोष होऊ शकतात. म्हणजॆ आम्ही कोणतेही पाप करायला मोकळे असा होत नाही. भक्त प्रल्हाद ,ध्रुव यासारखे थोर भक्तांची उदाहरणे समर्थांनी दिलेली आहेत. भगवान शंकर तर सतत श्रीरामाच्या नामात मग्न असत. हनुमंतासारखा बुद्धीमतां वरिष्ठम देखील सतत नामात मग्न असलेले दिसतात. संताची चरित्र बघितली तर ते सतत नामातच दंग असलेले दिसतात.
नामाचा महिमा आगाध आहे . देहातील सर्व दोष पार जाळून टाकण्याचे सामर्थ्य या नामात आहे. या देहामध्ये वसलेले विकार, अनेक जन्माचा फ़ेरा करुन आल्यामुळे याचा एक डोंगरच तयार झाला आहे . या डोंगराचा अडसर हाच की ज्ञानाचा प्रकाश जीवा पर्यंत पोहोचत नाही . सतत अज्ञानात जगण-या या जीवाला हा डोंगर फ़ोडण्यास नाम हेच उत्तम साधन आहे. महादोषांचे पर्वत या नामाने नासून जातात.
सदाचार तसेच नीति असे सद्गुण ज्याच्या नित्य चिंतनाने अंगी बाणतात त्या नामाचा घोष अत्यंत आदराने करा असे समर्थ सांगतात. सतत नामाचा घोष केल्याने ते शरीर पुण्य स्वरुप होते. संत सतत नाम घेत असत त्यांचे स्तवन करताना समर्थ दासबॊधात म्हणतात,
संत धर्माचे धर्मक्षेत्र । संत स्वरुपाचे सत्पात्र । नातरी पुण्याची पवित्र । पुण्य भूमी ।।१.५.१८॥
संत समाधीचे मंदिर । संत विवेकाचे भांडार । नातरी बोलिजे माहेर । सायोज्यमुक्तीचे ॥१.५.१९॥
सतत नामाचा घोष करणा-या संताचे अंत:करण म्हणजे आत्मस्वरुप ठेवण्य़ाचे उत्तम भांडॆच होय असा समर्थ त्यांचा गौरव करतात. ’ज्याचे अंत:करण विशाल हरि एक विठ्ठल नामे संतोष ’ सदॆव भगवंताचे चिंतन केल्याने भगवंत संतुष्ट होतो. म्हणुन भगवान शंकरासारखे हरीनामाचे रामपीसे लावुन घ्या असे समर्थ याठिकाणी सांगतात.
II श्रीराम समर्थ II

suvarna lele said...

जर अतिशय आदराने नामाचा घोष केला ,.नाम घेणा-या सर्व दोष ,पातके नाहीशी होतात साधका पासून लांब पळून पर्वत गुहांमध्ये लपून बसतात .जसजसे नामधारक नाम घेत जातो,तसतसे त्याच्या मनात ज्या इष्ट देवतेचे नाम घेतो त्या देवतेबद्दल त्याच्या मनात प्रेम निर्माण होते .हळू हळू षडरिपु कमी व्हायला लागतात .अष्ट सात्विक भाव निर्माण होऊ लागतात .आणि शेवटी चित्त शुध्द होऊ लागते .पापे नाहीशी होतात चित्त सत्व गुणांनी युक्त होते .शुध्द अंत:करणात देवतेचे रूप ठसते ..नामघोषाने परमेश्वराचे वास्तव्य टिकून रहाते .
नामसाधक देवतेच्या ठिकाणी लीन झालेला असल्याने त्याचे मीपण संपलेले असते .त्यामुळे कर्ता मी नाही ,एक परमेश्वर आपल्याकडून सर्व करवून घेत आहे अशी जाणीव त्याला असते .ती जाणीव असणे दुर्लभ गोष्ट आहे .म्हणूनच श्रीहरी तेथे आनंदाने रहातो असे समर्थ म्हणतात .
साधकाच्या नामघोषात प्रेम असते श्रीहरी प्रेमाचा भुकेला आहे . म्हणूनच भगवान श्रीकृष्ण नारदांना म्हणतात ‘जेथे जेथे नामसंकीर्तन चालू आहे तेथे तेथे मी आहे ‘
केवळ नामसाधकच नाही तर प्रत्यक्ष शंकरांना रामनामाचे वेड आहे . म्हणून श्री शंकर सुध्दा पार्वती सह श्रीरामांच्या नामाचा घोष करत आपल्या चित्तात समाधानाची प्राप्ती करून घेतात .