Friday, September 16, 2011

श्लोक ९०

II श्रीराम समर्थ II

न ये राम वाणी तया थोर हाणी।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी॥
हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी॥९०॥

3 comments:

lochan kate said...

श्लोक ९०......श्लोक ९०......
न ये राम वाणी तया थोर हाणी |
जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी ||
हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी |
बहु आगळे बोलिली व्यास वाणी ||९०||
हिन्दी में ......
न हो जिसकी वाणी में राम का नाम |
व्यर्थ उसका जीवन हानि करता है धाम ||
हरि नाम है वेद शास्त्रों में महान |
बहु अलभ्य है नाम बोले व्यास वान ||९०||
अर्थ....
श्री राम दासजी कहते है कि हे मानव मन ! जिसकी वाणी से श्रध्दा पूर्वक राम नाम नही निकलता है उसको सदैव हानी ही होती है |इस संसार में जो प्राणि नाम स्मरण को व्यर्थ समझता है जिसे राम नाम तुच्छ लगता है | उस व्यक्ति का जीवन व्यर्थ है | हरि का नाम अत्यंत पवित्र है , ऐसा वेदशास्त्र पुराणों में भी विशेष रुप से कहा गया है | यह बात व्यास क्रुत पुराणों में भी कही ग ई है | अत: हे मानव उस राम नाम से प्रिती कर ले जिससे तेरे जीवन का उध्दार होता है |

Dr.Madhavi Mahajan said...

भारतीय संस्कृति अध्यात्म प्रधान आहे. यामध्ये भगवंताचे दर्शन हेच मानवी जन्माचे परमोच्या ध्येय मानले जाते. यासाठी आपल्या ग्रंथांमध्ये हे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले गेले आहे . यामध्ये भगवंताचे नामस्मरण याला विषेश महत्व दिले गेले आहे. वेदशास्त्रे तसेच पुराणामधून महर्षी व्यास यांनी वर्णन केलेल्या नामस्वरुपाचे सूक्ष्मत्व लक्षात घेउन मानवाने त्याव्दारे स्वत:चे सार्थक करुन घ्यावे. ज्यांना हे साध्य होणार नाही त्यांचे जीवन व्यर्थ आहे. नरदेहा सारखे घबाड मिळून देखील जीवाला भगवंताच्या नामात रमता आले नाही तर तो अनेक जन्म घेउन देखील दरिद्रीच रहातो. यासाठी समर्थ वारंवार नामाचे महत्व समजावून सांगत आहेत .

suvarna lele said...

केवळ भोजनाच्या वेळेसच नाम घ्यायला हवे असे नाही तर सदा सर्वकाळ ,खाता पिता उठता बसता काम करता नाम घ्यावे असे समर्थ सांगतात .नाम न
घेणा-या माणसाचे जीवन निरर्थक समजावे असे समर्थ सांगतात .त्याचे मनुष्यत्व तुछ्य असते .त्याचे जीवन दु:खदायक ,क्लेशकारकच होते .त्याला कधीच शांती ,समाधान प्राप्त होत नाही ,
मानवदेह प्राप्ती झाल्यावर मानवाचे कर्तव्य आहे नरदेहाची सार्थकता ! प्रापंचिक माणूस आपल्या देहाची सार्थकता मानतो भौतिक सुख मिळविण्यात ! भौतिक सुख मिळवल्यानंतर होणारा आनंद क्षणभंगुर असतो .घर ,संपत्ती ,ऐश्वर्य ,यात सामान्य माणूस आपल्या देहाची सार्थकता मानतो पण माणसाच्या जीवनाची खरी सार्थकता आहे आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्यात ! त्यासाठी अतिशय सोपा उपाय आपल्या वेडात ,शास्त्रात ,सांगून ठेवला आहे –हरिनाम घेणे .
हरिनाम घेण्यासाठी विवेकाची आवश्यकता असते .जेव्हा आपण भौतिक सुखात ,म्हणजे तात्पुरता आनंद देणा-या भौतिक गोष्टीत अडकतो तेव्हा नाम घेण्याची ईच्छा उत्पन्न होत नाही .तेव्हा विवेक करावा लागतो की आपल्याला नाम घ्यायचे आहे .यात अडकायचे नाही आहे .मग विवेक केला की ननाम घेता येते .आपल्या जीवनाचे सार्थक करून घेता येते .नाम घेता घेता दुर्लभ अशा अविनाश पदाची प्राप्ती करून घेता येते .
वेद शास्त्र पुराणांनी हरिनामाचे महत्व तर समजावून दिले आहेच तसेच महर्षी व्यासांनी सुध्दा हरी नामाचे महत्व पटवून दिले आहे भागवत कथेच्या रूपाने .म्हणून मनुष्य जन्मात येऊन मानव जन्माचे सार्थक करायचे असेल तर नाम घ्यायलाच हवे .