Friday, September 9, 2011

श्लोक ८९

II श्रीराम समर्थ II

जनीं भोजनी नाम वाचे वदावें।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥८९॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक ८९.....
जनी भोजनी नाम वाचे वदावे |
अती आदरे गद्य घोषे म्हणावे ||
हरी चिंतनें अन्न सेवीत जावे |
तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे ||८९||
हिन्दी में....
अरे जीमते नाम वाचा से बोलो |
अती आदर से करो गद्य घोषो ||
हरी चिंतन से अन्न सेवन करो रे १|
तभी श्री हरी को तुम पाओगे फ़र से ||८९||
अर्थ....
श्री राम दास जी कहते है कि हे मनुष्य ! भोजन के समय सर्व प्रथम परमेश्वर के नाम का घोष करना चाहिये | ऊंची गर्जना के साथ आदर से नाम स्मरण का घोष करना चाहिये | राम नाम के चिंतन के साथ खाना , खाना चाहिये , अर्थात् अना ग्रहण करना चाहिये | तभी परमेश्वर हमें स्वाभाविक रुप से प्राप्त हो सकते है |

suvarna lele said...

समुदायात भोजन करताना किंवा एकटे जेवत असताना हरीचे नाम अवश्य घ्यावे .ते नाम नुसतेच घ्यायचे नाही तर अति आदराने घ्यावे .हरीच्या नामाचा घोष करावा .पण हरीचे नाम जेवताना का घ्यायचे ? नुसता नामाचा गजर करून थांबायचे ?असे अनेक प्रश्न मनात येतात .आपण समुदायात असलो तर नामाचा घोष करतोच .त्यानंतर गप्पा ,हास्य विनोद करायला सुरुवात करतो .त्यातून आनंदी मन होते .अन्न पचन होते .पण याहीपेक्षा गप्पा मारत जेवण्यापेक्षा हरीचे नाम घेत जेवले तर जास्त चांगले असे समर्थ म्हणतात
आपण जेव्हा एकटे जेवत असतो तेव्हा आपल्या मनात नाना विचारांचे काहूर माजलेले असते त्या विचारांचा परिणाम अन्नावर होत असतो .आपले चित्त स्थिर नसते . आपले जेवणाकडे लक्ष नसते .आपण एकटे असताना दूरदर्शन बघतो त्यातील मालिकांमध्ये दाखवलेल्या दृश्यांचा ही बरा वाईट परिणाम आपल्या मनावर होतोच .परिणामी आपल्या सप्त धातूंवर होतो .
अन्न सूक्ष्म अंशाने मनाचे पोषण करत असते .अन्न आपण करत असलेल्या वाईट विचारांनी सात्विक रहात नाही .आणि अन्न सात्विक रहात नाही .त्यापेक्षा एकटे असताना ,समुदायात असताना अन्न सेवन करत असताना हरिनामात मन गुंतवले तर सात्विक बनते ,शुध्द बनते आणि अन्न पचन सुलभ होते
आपल्या शरीरात असणारे सप्त धातू रक्त ,रस ,मांस ,अस्थी ,मज्जा , स्नायू ,शुक्र ,शोणित या सर्वांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पुष्टी होते .सात्विक गुणांची वाढ होते .,म्हणून समर्थ म्हणतात तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे | येथे स्वभाव हा शब्द महत्वाचा आहे ,स्वभाव म्हणजे संस्कार ! भोजन समयी हरीचे नाम घेतले तर हरीनामाचा संस्कार त्या अन्नावर होतो .,चित्त शुद्धी होते .अन्न पवित्र बनते .हरीप्रसाद प्राप्त होतो .म्हणून नामाबरोबर होणा-या आहाराला एकनाथ महाराज निर्गुण आहार म्हणतात .त्या निर्गुण आहाराने अन्न शुध्द होते . म्हणूनच ‘हरी चिंतने अन्न सेवीत जावे |]