Friday, October 7, 2011

श्लोक ९३


II श्रीराम समर्थ II

जगीं पाहतां देव हा अन्नदाता।
तया लागली तत्त्वता सार चिंता॥
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे।
मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥



डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !




3 comments:

Dr.Madhavi Mahajan said...

ज्याने चोच दिली तोच दाण्याची सोय करतो असे आपण सहज म्हणतो पण तेव्हढ्याच विश्वासाने वागत नाही. समर्थ या श्लोकामध्ये हेच सांगत आहेत. या विश्वातील सर्व व्यवहार भगवंताच्या सत्तेने चालतात. तोच आपल्याला जन्माला घालतो आणि तोच आपला सांभाळ करत असतो. आपल्याला जन्माला घालणा-या आणि आपल्याकडून कशाची अपेक्षा न करता आपली काळजी वाहणा-या या भगवंताचे विस्मरण न होणे हेच खरे माणूसपण आहे. दासबोधात समर्थ म्हणतात
अहिर्निशी ज्या भगवंता । सकळ जीवांची लागली चिंता । मेघ वरुषे जयची सत्ता । सिंधु मर्यादा धरी ॥ दा.३.१०.५६॥ भगवंताला रात्रंदिवस सगळ्या जीवांची काळजी लागलेली आहे. त्याच्या सत्तेने ढग पाऊस पाडतो, सागर आपल्या मर्यादेत रहातो, सूर्य वेळेवर उगवतो..अशा रीतीने भगवंत सगळी सृष्टी केवळ आपल्या सत्तेने चालवतो..स्वत:च्या कृपाळूपणाने तो सर्व जीवांचा सांभाळ करतो.
अशा भगवंताचे जीवाला विस्मरण होते म्हणून समर्थ याठिकाणी पुन्हा एकदा त्याची जाणिव करून देत आहेत. समर्थांचा या वचनावर दृढ विश्वास होता. एक काळा फ़त्तर फ़ोडून त्यांत असलेल्या बेडकीकडे आणि त्यातील पाण्याकडे शिवरायांचे लक्ष वेधून समर्थ म्हणतात ॥ आम्ही काय कोणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो ॥ शिवबा तटाच्या भिंतीवर उगवलेल्या पिंपळाच्या मुळाला काय मोटेने पाणी पाजले जाते? तेथे पाणी कोण घालतो. ? खडकाच्या पोटात पाणी कसे आले येथे काय समुद्र आहे . तरीही याठिकाणी ही बेडकी जीवंत आहे. "नसता पाण्याचे बुडबुडे । सदा सर्वदा गगन कोरडे । दास म्हणे जीवन चहुंकडे ।घालुनि सडे पीक उगवितो । श्रीराम आम्हाला देतो ॥ "
॥जय जय रघुवीर समर्थ॥

lochan kate said...

श्लोक ९३.....श्लोक ९३.....
जगी पाहतां देव हा अन्नदाता |
तया लागली तत्वता सार चिंता ||
तयाचे मुखी नाम घेता फ़ुकाचे |
मना सांग पां रे तुझे काय वेचे ||९३||
हिन्दी में...
संसार में देखो है वो अन्नदाता |
उसे लगी है तत्व की सार चिन्ता ||
मुख में लो उसका नाम तुम देखो |
मन को बताओ उसका क्या गया हो ||९३||

अर्थ... श्री रामदासजी कहते है कि हे मन ! संसार में भगवान ही अन्नदाता है | देखा जाता है कि संसार भर के प्राणि मात्र के सुख -दु:ख की सारी चिंता उस परमेश्वर को रहती है | अत: सिर्फ़ उस परमेश्वर का नाम अपने मुख से लेना है , जिसमें अपना कुछ भी खर्च नही होता है | हे मनुष्य ! बताओ उसमें तुम्हारा क्या खर्च हो रहा है ? अर्थात नाम लेने में मनुष्य का कुछ भी खर्च नही होता फ़िर नाम लेने में क्या परेशानी है ?

suvarna lele said...

जगी पाहता देव हा अन्नदाता | असे समर्थ या श्लोकात म्हणत आहेत .देव या सकळ पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांचा अन्नदाता आहे .ज्या परब्रह्म परमात्म्याने सजीव सृष्टीला निर्माण केले त्यालाच सर्वांना अन्न मिळवून देण्याची व्यवस्था करावी लागते .त्यालाच पाउस पाडावा लागतो ,शेते पिकवावी लागतात . सर्व सृष्टीचा स्वामी ,जगन्नायक असलेल्या परमात्म्या बद्दल कृतज्ञ बुद्धी तरी माणसाने ठेवायला नको का ? त्यासाठी काय करावं ? समोर आलेल्या ताटाचा नैवेद्य तरी दाखवावा ! ते देवाला अर्पण केले तर देव दयाळू होऊन आपल्याला पुढील वर्षी पून्हा आपल्याला देईल अशी भावना असावी ,
देवाला नैवेद्य दाखवावाच ,याशिवाय जेवताना ,भोजन करताना देवाचे नाम तरी मुखात असावे .कारण ते नाम घेताना पैसे खर्च करावे लागत नाहीत .याशिवाय नाम घेऊन आपल्याला कितीतरी फायदे होतात ते वेगळेच .अन्नदाता प्रत्यक्ष परमेश्वरच आहे हे वचन श्री समर्थांचे आहे .दगडातून बाहेर आलेली बेडकी पाहून समर्थ म्हणतात ‘आम्ही काय कुणाचे खातो | श्रीराम आम्हाला देतो ||शिवरायांना एकदा गर्व झाला की मी पोशिंदा आहे .हा गर्व नाहीसा करण्यासाठी श्रीसमर्थांनी खडकातून बेडकी काढली .आणि शिवरायांचे गर्व हरण केले .
यावरूनच असे विचार येतात मातेच्या मांसमय स्तनात दूध कसे निर्माण होते ? खडकात जिवंत बेडकी कशी सापडते ? सर्वांचे उत्तर एकच की ही परमेश्वराची लीला आहे .याचे कारण जागी पाहता देव हा अन्नदाता |
मग असे असताना हे मना ,तुला त्या परमेश्वराचे नाम घ्यायला काय त्रास आहे ? ते सुध्दा काहीही खर्च येत नसलेले फुकट असलेले नाम !