II श्रीराम समर्थ II
नको वीट मानूं रघुनायकाचा। |
अती आदरे बोलिजे राम वाचा॥ |
न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा। |
करीं घोष त्या जानकीवल्लभाचा॥९१॥ |
3 comments:
श्लोक ९१....श्लोक ९१....
नको वीट मानूं रघुनायकाचा |
अती आदरे बोलेके राम वाचा ||
न वेचे मुखी सांपडे रे फ़ुकाचा |
करी घोष त्या जानकी वल्लभाचा ||९१||
हिन्दी में....
नही नाम का तुम द्वेष करो रे |
अती आदर से बोलो राम नाम रे ||
बिना मुल्य मिलता नही काम ऐसा |
करो घोष तुम राम नाम का वैसा ||९१||
अर्थ ...
श्री राम दास जी कहते है कि हे मन ! श्रीराम के नाम को तुच्छ मत समझो | अत्यंत आदर पूर्वक अपनी वाणी से राम का नाम लेना चाहिये | बिना मूल्य ऐसा काम ढूंढने से भी नही मिलता | हे मनुष्य ! उन जानकी वल्लभ श्री राम जी का जय घोष करते रहना चाहिये | और अपने जीवन को सार्थक करते रहना चाहिये |
सतत दृष्याकडे धाव घेणा-या मनाला समर्थ या ठिकाणी रामनामाचा कंटाळा करु नकोस असे सांगतात. भगवंताच्या समिप जाण्यासाठी नामस्मरणा सारखे सोपे साधन नाही. कलीयुगामध्ये नामस्मरण या साधनेला विषेश महत्व आहे. पण खरे तर झटपट फ़ळ देणारा हा साधन मार्ग नाही हे पण जाणुन घेतले पाहिजे. यासाठी सातत्य आवश्यक आहे. या साधनेतुन मिळणा-या मन:शांतीचा ’स्व’ अनुभव खुप महत्वाचा. यासाठी समर्थ याठिकाणी न कंटाळता सतत नामस्मरण करण्य़ास सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात , चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलावीते हरीविण ॥ देखवी ऎकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नका ॥ कोणत्या ही प्रकारचा खर्च न करता केवल वाणीने हे साधन शक्य आहे तर याचा कंटाळा का करावा ?
समर्थ म्हणतात की हे मना ,तू रघूनायकाचा वीट मानू नको .अति आदराने तू रामनाम घे .जर मानवाच्या मुखातून रामनाम आले नाही ,तर मानवाची खूप हानी होते .जन्म मरणाच्या फे-या चालू राहतील .म्हणून हे मना रघुनायकाचे नाम घे .
रघूनायकाचा वीट मानू नको याचा अर्थ रामनामाचा कंटाळा करू नकोस असा अर्थ नाही तर रघुनायकाच्या रुपाकडे तू दुर्लक्ष करू नकोस .ते रूप मनात साठवून ठेवण्याचा ,त्या रूपाशी अनुसंधान राखण्याचा प्रयत्न कर .त्या रूपाशी अनुसंधान ठेवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे नाम घेणे ,त्याचे चिंतन करणे ,त्यांचा निदिध्यास घेणे .
आपला अंतरात्मा म्हणजे आपल्या मध्ये असणारे राघवाचे रूप .आपल्या मध्ये असणा-या राघवाच्या सहाय्यानेच आपले शरीर चालते .आपण बोलतो ,चालतो ,ऐकतो ,सर्व क्रिया करतो .पण आपल्याला ती जाणीव नसते ,आपण मी कर्ता या भावात असतो .त्यामुळेच राघव आपल्यापासून दूर जातो .त्यासाठी काही पैसे खर्च करायचे नाहीत .फक्त प्रेम भावाने राघवाच्या फोटो कडे बघत राहायचे त्याचे नामात तल्लीन होउन जायचं म्हणजे राघवा बद्दल आपोआप प्रेम निर्माण होईल .
सर्वात महत्वाची गोष्ट अशी की नाम घेण्यासाठी पैसे पडत नाहीत .ते नाम फुकाचे आहे ,सुरक्षित आहे मग फुकट नाम घेउन एव्हडा फायदा होत असेल तर नामाकडे दुर्लक्ष का करायचे ? सतत सीतापती रघुवीर समर्थ असा नामघोष करत रहा .
Post a Comment