II श्रीराम समर्थ II
जय जय रघुवीर समर्थ !
बहू चांगले नाम या राघवाचे। |
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे॥ |
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे। |
जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें॥८८॥ |
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
श्लोक ८८......
बहु चांगले नाम या राघवाचे |
अती साजिरे स्वल्प सोपे फ़ुकाचे ||
करी मूळ निर्मळ घेता भवाचे |
जिवा मानवां हेचि कैवल्य साचे ||८८||
हिन्दी में ....
बडा अच्छा है नाम ये राघव का |
देखे ये सपना बिना मोल ही का ||
करता ये निर्मल मूल जीवन का |
अरे मान ले ये ही कैवल्य दाता ||८८||
अर्थ.... श्रीराम दास जी कहते है कि हे मानव मन ! राघव का नाम बहुत ही अच्छा है जो मन को शांन्ति प्रदान करता है | एक प्रकार से बिना मोल के मिलने वाले रुचिकर स्वल्पाहार के समान है | श्रीराम का नाम नियमित लेने से जन्म सार्थक हो जाता है और विषय वासनाओं का नाश होता है | अत: हे मानव १ यह नाम्स्मरण ही जीवन का कैवल्य दाता [ कल्प व्रुक्ष के समान] है अर्थात् मोक्ष का साधन है | अत: नाम स्मरण सतत् करते रहना चाहिये |
या श्लोकात श्रीसमर्थ रामनामाचे महत्व सांगतात :समर्थ सांगतात की राम नाम म्हणायला खूप सोपे ,फुकटात होणारे आहे .छोटे आहे ,गोड आहे ,सुंदर आहे .त्या नामाने मनाला आनंद तर मिळतोच पण नामाचा आनंद घेण्या साठी पैसेही मोजावे लागत नाहीत . नाम घेऊन मोक्ष मिळतो ,जन्म मरणातून सुटका होते .
असे म्हणतात की परब्रह्माचे ,त्या अनादी अनंत शाश्वत वस्तूचे ज्ञान झाले की मोक्ष मिळतो .प्रश्न असा पडतो की नाम घेण्याने मोक्ष कसा मिळेल ?
नाम काय करते ? आपल्या मनात अनेक विचारांची गर्दी असते .मन सतत दृश्याचीच कल्पना करत असते .नामाची आपल्याला जेव्हा गोडी लागते ,नाम घेतल्या शिवाय चैन पडत नाही , तेव्हा नामाने मनाचे बाहेर धावणे बंद होते .मन बाह्य गोष्टींचे चिंतन करणे बंद करते .एक श्रीराम च आठवायला लागतात .श्रीराम चिंतनाने कामना ,कल्पना ,वासना नाहीशा होतात .चित्त अचित्त होते .विषय वासना पासून चित्त परावृत्त करण्याचे अवघड काम नाम करते .म्हणून नामाची थोरवी मोठी आहे .
नाम साधना वाढली की पाप क्षीण होऊ लागते .चित्त शुध्द होते वैराग्याची प्राप्ती होते .सत्व गुणांची वाढ होते असे जेव्हा होते निर्गुणाचे ज्ञान होते .भक्तीला ज्ञानाची जननी म्हणतात .ज्ञान झाले की कैवल्याची प्राप्ती होते .
Post a Comment