Friday, June 17, 2011

श्लोक ७७

II श्रीराम समर्थ II

करी काम निष्काम या राघवाचे।
करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥
करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां॥७७॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक ७७ ..
श्लोक ७७ ..
करी काम निष्काम या राघवाचे |
करी रुप स्वरुप सर्वा जिवांचे ||
करी छंद निर्द्वंद हे गुण गाता |
हरी किर्तनी व्रुत्ति विश्वास होता||७७||
[हिन्दी में]
करो काम निष्काम उस राघव हो |
रहे रुप स्वरुप सभी जीवों हो ||
करो छंद निर्द्वंद ये गुण गाते |
हरि किर्तन व्रुत्ति में विश्वास पाते ||७७||
अर्थ.....
श्रीराम दासजी कहते है कि हे मानव मन ! श्रीराम की इच्छा के अनुसार निष्काम भाव से सेवा करते रहना चाहिये तथा सम्पूर्ण जीवन का एक अच्छा स्वरुप होना चाहिये | श्रीराम के गुणों का द्वंद्वमुक्त रहकर छंद लिखना चाहिये और हरि किर्तन में स्थिर मुद्रा तथा द्रुढ श्रध्दा का होना अत्यंत आवश्यक है | अत: श्रध्दा भक्ति से श्रीराम का चिंतन करते रहना चाहिये | विश्वास के बिना प्रभु भी हमें प्राप्त नही होते |

suvarna lele said...

कोणत्याही मार्गाने गेले तरी शेवटी नाम घ्यावेच लागते असे समर्थ मागील श्लोकात सांगतात .या श्लोकात श्रीसमर्थ कीर्तन भक्ती सांगतात .जेव्हा एखादा साधक आपल्या आवडत्या देवाविषयी ऐकतो ,तेव्हा त्याला आपल्या माहिती असलेली ,आपल्या लाडक्या देवाविषयी सांगण्याचा मोह होतो आणि तो कीर्तन भक्ती करू लागतो .आपल्या लाडक्या दैवता विषयी किती सांगू आणि किती नको असे त्याला होउन जाते .त्यातूनच राघावाविषयी काम निर्माण होतो .म्हणजे मला फक्त राम हवा अशी वासना शिल्लक उरते .यातूनच तो निष्काम होतो .त्याच्या वासनांचा क्षय होतो .कारण श्रीराम कृपेने त्याच्या सर्व ईच्छा पूर्ण होतात .किंवा त्याला विषय वैराग्य उत्पन्न होते .त्यामुळे त्याला षडरिपु त्रास देईनासे होतात .
त्याला सर्वत्र रामरूप दिसू लागते .जली स्थळी ,काष्ठी ,पाषाणी ,सजीव ,निर्जीव सर्वत्र रामरूप दिसू लागते .त्याला स्वत:चा विसर पडतो .त्याची देहबुद्धी नाहीशी होते .त्याचा मीपणा नाहीसा होतो .सर्वत्र रामरूप दिसू लागल्या मुळे त्याची दृष्टी विस्तारीत होते ,आकुंचित रहात नाही .हे सर्व होण्यासाठी समर्थ सांगतात की हरीकथेवर विश्वास हवा .हरीकथेवर विश्वास ठेवला की हरिदास हरीकाथेत विश्वास ठेवतो .तो स्वत:ला विसरतो .भगवत्स्वरूपाशी एकरूप होतो .कीर्तनात ब्रह्मरस असतो असे तुकोबाराय म्हणतात .
कीर्तनाची आवड निर्माण झाली की कीर्तन केल्याशिवाय चैन पडत नाही .सतत कीर्तन करत राहिल्यामुळे ,कीर्तन करण्यापूर्वी अभ्यास केल्यामुळे ,चित्त सात्विक होते ,शांत होते ,निर्द्वंद होते म्हणजे सुख दु:ख ,राग लोभ मान अपमान या कोणत्याही परिस्थितीत चित्त डगमगत नाही ,अस्थिर होत नाही .चित्ताची शांती ढळत नाही ..असेल ते असू द्यावे ,नसेल ते नसू द्यावे अशी मनाची भावना होते म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात ---आपुलिया सुखस्वार्था |केलीच करावी हरिकथा | हरिकथेवीण सर्वथा राहूची नये ||