Tuesday, June 28, 2011

श्लोक ७८

II श्रीराम समर्थ IIअहो ज्या नरा रामविश्वास नाहीं।
तया पामरा बाधिजे सर्व कांही॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता।
वृथा वाहणें देहसंसारचिंता॥७८॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या  श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक .. ७८.....
अहो ज्या नरा राम विश्वास नाही |
तया पामरा बाधिजे सर्व कांही ||
महाराजा तो स्वामी कैवल्य दाता |
व्रुथा वाहणे देह संसार चिंता||
हिन्दी में...
अरे राम का जिसे विश्वास ना हो |
उस पामर को बाधा ही आती रही हो ||
महाराज वो स्वामी कैवल्यदाता |
व्रुथा ढोहते है हम देह संसार चिंता ||
अर्थ.....
श्री रामदासजी कहते है कि हे मानव मन ! जिस मनुष्य के मन मे श्रीराम के प्रति विश्वास या श्रध्दा नही है उस पापी को दुष्कर्म करने के कारण प्रत्यैक कार्य में परेशनियो का सामना करना पडता है | हे मनुष्य वह परमेश्वर करुणा निधान है | व्यर्थ में ही हमारा शरीर एवं मन संसार की चिंता में व्यस्त रहता है | अत: मनुष्य को चाहिये कि व्यर्थ की चिंता छोड दे एवं भगवद् भक्ति में लीन हो जाये |

suvarna lele said...

ज्या माणसाचा रामावर विश्वास नसतो ,त्या पामराला ,दुर्दैवी माणसाला सर्व काही बाधते ,जिवंत असताना ,आणि मृत्यू नंतरही ! असे का होते ? खरे तर सर्व सजीव परमेश्वराची लेकरेच ! आई वडील आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाहीत ,मग परमेश्वर असा भेद भाव का करतो ? कोणाला सुख तर कोणाला दु:ख का देतो ? ज्याचा रामावर विश्वास नसतो ,जो अभक्त असतो ,त्याचा देह अहंकार असतो ,देहबुद्धी मोठ्या प्रमाणात असते ,त्याला मी कर्ता असे वाटत असते ,नव्हे त्याचा तसा विश्वास असतो ,त्यामुळे तो बंधनात अडकतो .कर्ता करविता परमेश्वर आहे यावर त्याचा विश्वास नसल्यामुळे तो विषय सुखाच्या मागे लागतो ,स्वकर्तुत्वावर वाटेल ते करून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो .,सुख मिळाले नाही तर दु:खी होतो देह्संसार चिंता मिटत नाही .समाधान कधीच मिळत नाही .हाव कधी संपत नाही .दु:ख वाढतच जातं .विषय सुख मिळवत असताना पाप पुण्याचा विचार केलेला नसल्या मुळे शेवटी दुर्गतीला जातो .
याउलट जो भक्त असतो ,त्याला उपासनेमुळे असे वाटत असते की श्रीराम आपला पाठीराखा आहे .तो आपल्याला सर्व संकटातून तारून नेईल त्याची देह्संसार चिंता मिटलेली असते तो समाधानात राहून शेवटी सद्गती मिळवतो .