II श्रीराम समर्थ II
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।
जय जय रघुवीर समर्थ !
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
या श्लोकात कर्म ,धर्म ,योग ,भोग ,त्याग अशा पाच मार्गांचा विचार करून शेवटी नामावर ठेवलेला विश्वास कसा तारून नेतो ते सांगितले आहे .
कर्मावर विश्वास ठेवून ईश प्राप्ती करावी म्हटले तर ते सोपे नाही .कारण परमेश्वर प्राप्ती साठी होणारे कर्म यथासांग व्हावे लागते .कर्म यथासांग झाले तरी ते ईश्वरार्पण करावे लागते .कर्म कोणते व अकर्म कोणते यात बुध्दीवान लोकांतही सदेह असतात .कर्म करताना जर वैगुण्य राहिले तर हरी हरी म्हणावे लागते . म्हणजे कर्म मार्ग जरी अवलंबला तरी नामाचा आधार घ्यावाच लागतो .
धर्म या शब्दाच्या अनेक व्याख्या केल्या आहेत .समर्थ म्हणतात : सकळ धर्मामध्ये धर्म | स्वरूपी राहणे हा स्वधर्म || भगवंत म्हणतात :धर्मोमद्भक्तिकृत प्रोक्त: | माझी उत्तम भक्ती करणे म्हणजे धर्म असे भगवंत उद्धवला सांगतात .
नामाने रूपाशी तादात्म्य लगेच पावत असल्यामुळे नाम च सर्वश्रेष्ठ आहे .
योग म्हणजे अष्टांग योग .यम ,नियम ,आसन ,इ.आठ पाय-या चढण्यासाठी शारीरिक कष्ट ,व मानसिक श्रम करावे लागतात .चित्तवृत्ती आटोक्यात ठेवाव्या लागतात . आहार ,विहारावर नियंत्रण ठेवावे लागते .मनाला आवरावे लागते .विषयाकडे धावणारे मन पून्हा पून्हा वळवावे लागते .म्हणजे मानसिक कष्ट खूप करावे लागतात .त्यापेक्षा नाम पटकन ध्येय वस्तू गाठून देते .
भोग घेतल्याने तात्पुरते समाधान मिळते .एखादी वस्तू प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो पण शाश्वत आनंद मिळत नाही .पण नामाने ,भजनाने एकाग्रता येते .समाधान मिळते .
त्याग ही एक साधनाच आहे .त्याग कर्मफलाचा करायचा .कर्म करायचे पण त्याच्या फलाची अभिलाषा धरायची नाही .सामान्य माणसे कोणतीही ,अगदी क्षुल्लक गोष्ट सुध्दा काही तरी मिळेल या आशेने करत असतो .कर्म फलाची ईच्छा त्याग करणे इतकी सोपी गोष्ट नाही .म्हणून समर्थ नाम घ्यायला सांगतात .नामाने कर्ता करविता मी नसून देव आहे अशी मनाची धारणा होते .मी पणा गळून पडतो .नामाने ईश्वर प्रसन्न होतो .पण ईश्वर प्रसन्न होण्यासाठी नामावर विश्वास असायला हवा .तरच भगवंताची प्राप्ती होईल .
म्हणूनच समर्थ प्रभात काळी नाम घेण्यास सांगतात.
ज्या क्षणी नामा बद्दल विश्वास आपल्या मनात जागा होईल तो क्षण म्हणजे प्रभात !
श्लोक ७६........
श्लोक ७६........
नव्हे कर्म ना धर्म ना योग काही |
नव्हे भोग ना त्याग ना संग पाही ||
म्हणे दास विश्वास नामी धरावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७६||
[हिन्दी में]
नही धर्म नही कर्म नही योग कुछ भी |
नही भोग नही त्याग विधिवत है जो भी ||
कहे दास विश्वास नाम तु समझ ले |
प्रभाती समय में राम चिंतन तु कर ले ||७६||
अर्थ....श्री राम दासजी कहते है कि हे मानव मन ! ध्यान में रखने योग्य बात है कि ना धर्म [कर्तव्य] ना कर्म [कार्य] ना योग [नियम] ना भोग [जीवन यापन] ना त्याग ना यथाविधी कार्य , देखना या करना कुछ भी विशेष महत्व नही रखते है परन्तु हे मानव ! विश्वास रखो कि श्रीराम का नाम जाप स्मरण करने मे ही सार है | अत: प्रात: समय में श्री राम का चिंतन करते रहना चाहिये |
Post a Comment