Friday, June 3, 2011

श्लोक ७५

II श्रीराम समर्थ II

समस्तामधे सार साचार आहे।   
कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥   
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।   
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७५॥ 

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
 जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक ७५
श्लोक ७५
समस्ता मधे राम साचार आहे |
कळेना तरी सर्व शोधुनि पाहे ||
जिवा संशयो वाउगा तो सजावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७५||
[हिन्दी में]
समस्तों में सत्य है सार नाम का ही |
समझता नही ढूढ ले तु फ़िर भी ||
संशय जो मन में है उसे त्याग दे रे |
प्रभाती समय में राम चिंतन कर रे ||७५||
अर्थ.... श्री राम चन्द्र जी कहते है कि हे मन ! संसार में सब ओर सच्चाई का ही महत्व है |मनुष्य को समझ में नही आता परन्तु सब ओर ढूढकर देखो समस्त बातों में सच्चाई को ही महान माना गया है | अत: हे मन ! जो बेकार की शंका हो , उसे छोड देना चाहिये और प्रात: समय में श्रीराम का चिंतन करते रहना चाहिये |

suvarna lele said...

नाम हे सर्व साधनांचे सार कसे आहे टे या श्लोकात समर्थ सांगत आहेत .समर्थ म्हणतात ,’ हे मना ,तुला कळत नसेल की नाम सर्व साधनांचे सार कसे आहे तर तू शोधून काढ .त्यासाठी तू अध्यात्मिक ग्रंथ वाच ,ज्यात आत्मज्ञानी पुरुषाचे स्वानुभव लिहिलेले असतात .त्यांचा सखोल अभ्यास केला तर तुला नाम साधनेचे वर्म कळेल .त्यानेही जमले नाही तर सद्गुरुंना शरण जा .ते तुला समजावून देतील . यापैकी काहीही न करता नामात काय आहे ? नामाने काय होणार ? अशा संशयात अडकू नकोस .नाही तर हाती काही लागणार नाही .आयुष्य फुकट जाईल .
नाम पारमार्थिक सर्व साधनांचे सार आहे असे समर्थ म्हणतात कारण नाम सत्य आहे .सत्य म्हणजे शाश्वत आहे .ज्याप्रमाणे ॐकारातून शब्द सृष्टी निर्माण झाली , ॐ कार हे परमात्मवाचक नाम झाले .म्हणून नाम सत् आहे शाश्वत आहे .कारण ते सृष्टीच्या आदि होते ,आणि अंतीही आहे ..परमात्मा नेत्र चक्षुने दिसत नाही ,मग त्याचे अनुसंधान कसे ठेवायचे ,हा प्रश्न नामाने सोडवला आहे .नामाने परमेश्वराशी अनुसंधान ठेवता येते ,
भगवंताची अनेक नामे आहेत .त्यापैकी कोणतेही नाम घेतले तरी त्याची चैतन्य शक्ती त्या नामामध्ये असतेच .अनंत ,अपार ,निर्गुण निराकार ,गुणातीत असलेल्या भगवंता प्राप्त करून देणारे एकमेव साधन नाम आहे .
म्हणूनच शांत वेळेस ,जेव्हा चित्त वृत्ती शांत असतात तेव्हा म्हणजे प्रभात काळी नाम घ्यावे .ज्या क्षणी नामाचे महत्व पटून सदेह न ठेवता नाम घ्यायला सुरुवात होते ती आपल्या जीवनाची प्रभातच असते .