Friday, May 27, 2011

श्लोक ७४

II श्रीराम समर्थ II

बहुतांपरी संकटे साधनांची ।
व्रते दान उद्यापने ती धनाची॥
दीनाचा दयाळू मनी आठवावा।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७४॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक ७४..
श्लोक ७४..
बहूतां परी संकटे साधनांची |
व्रते दान उद्यापने ती धनाची ||
दिनांचा दयाळु मनी आठवावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||
[हिन्दी में]
बडे संकट आते है साधनों में |
व्रत,दान,उद्यापन,वो जनों में ||
दीनों का दयालु मन में बसा रे |
प्रभत में कर चिंतन राम का रे ||७४||
अर्थ ....श्री राम दास जी कहते है कि हे मानव मन् !
बहुधा यह देखा गया है कि संकटों का साधन मार्ग _ क्रम _धन - दान , व्रत उद्यापन , जो अधिक तर पैसों के आधार पर होता है | अत: हे मन ! दीन दु:खी लोगों के दयालु श्रीराम को मन में याद करते रहना चाहिये और प्रात: समय में श्रीराम का चिंतन करते रहना चाहिये |

lochan kate said...

श्लोक ७४..
श्लोक ७४..
बहूतां परी संकटे साधनांची |
व्रते दान उद्यापने ती धनाची ||
दिनांचा दयाळु मनी आठवावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||
[हिन्दी में]
बडे संकट आते है साधनों में |
व्रत,दान,उद्यापन,वो जनों में ||
दीनों का दयालु मन में बसा रे |
प्रभत में कर चिंतन राम का रे ||७४||
अर्थ ....श्री राम दास जी कहते है कि हे मानव मन् !
बहुधा यह देखा गया है कि संकटों का साधन मार्ग _ क्रम _धन - दान , व्रत उद्यापन , जो अधिक तर पैसों के आधार पर होता है | अत: हे मन ! दीन दु:खी लोगों के दयालु श्रीराम को मन में याद करते रहना चाहिये और प्रात: समय में श्रीराम का चिंतन करते रहना चाहिये |

suvarna lele said...

या श्लोकात अनेक साधनांमध्ये नामस्मरण हेच साधन सर्वात सोपे कसे आहे त समर्थ सांगत आहेत .अनेक साधनांमध्ये अनेक प्रकारांचे कष्ट करावे लागतात ,त्यात शारीरिक कष्ट करावे लागतात ,मानसिक त्रास सहन करावे लागतात कोठे पैसे खर्च करावे लागतात ,तर कोठे शारीरिक कष्ट ! घोर तपे केली तर शारीरिक कष्ट पडतात तर यात्रे सारख्या साधनेमध्ये धन खर्च करावे लागते .
त्या ऐवजी नामस्मरणात –नाम घेणे फुकट असते ,बिनकष्टाचे ,बिनात्रासाचे असते ,नाम साधनेला काळ ,वेळ स्थळ यापैकी कशाचेही बंधन नसते . नाम कोणीही ,केव्हाही ,कसेही घेउ शकते .कोणत्याही वर्णाचे स्त्री ,पुरुष ,बाल वृध्द नाम घेउ शकतो .कोणत्याही वाचेने नाम घेता येते .पण त्याचे एक पथ्य आहे की नाम ज्याचे घ्यायचे ,त्याला सर्वस्व मानून ,त्याला पूर्ण शरणागत होऊन नाम घेतले तर च दीनदयाळ असणारा राम भक्तावर कृपा करतो .
इतके असूनही आपण नाम साधना करून परमेश्वराची कृपा संपादन का क्कारात नाही ? आपण आपला उध्दार का करून घेत नाही ? असे प्रश्न पडतात .
नाम घेणे अतिशय सुलभ साधन असल्यामुळे आपण द्यावे तेव्हडे महत्व या साधनाला देत नाही .त्याचे कडे आपण दुर्लक्ष करतो . पण या साधनेत दृढ आसनेला महत्व आहे .नाम घेता घेता ते परा वाणी पर्यंत पोहोचले की नाम साधना फळाला येते .त्यासाठी नाम अभ्यासावे लागते ,नामाचेच चिंतन करावे लागते . नामावर निष्ठा ठेवावी लागते.नामावरील निष्ठा बुद्धी अंतर्मुख करते .बुद्धी अंतर्मुख झाली की ती स्वरूपाकार होते .बुद्धी चा स्वभाव आहे बहिर्मुख होण्याचा ! त्यामुळे नाम घेताना मन सतत बाहेर धावत असते .त्याला आत वळवणे हे नामाचे काम असते .प्रभात काळी म्हणजे पहाटे नाम घेतले तर मन शात असते ,अंतर्मुख होऊ शकते .म्हणून नाम नेहमी प्रभात काळी घावे असे समर्थ म्हणतात .
आपण बुद्धीची बहिर्मुखता जेव्हा अंतर्मुख करू शकू ती आपल्या जीवनाची प्रभात असते