Friday, April 1, 2011

श्लोक.. ६६

II श्रीराम समर्थ II

नव्हे सार संसार हा घोर आहे |
मना सज्जना सत्य शोधुनि पाहे ||
जनी वीष खाता पुढे सुख कैचे |
करी रे मना ध्यान ह्या राघवाचे ||६६||


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated By Lochan Kate .. [हिन्दी मे]
नही सार संसार ये घोर तापा |
मन: सज्जन उसे ढूंढता ही जाता ||
अगर विष है लेता तो सुख रे कैसा |
करो मन मे ध्यान रे उसी राघव का||६६||
अर्थ...
श्री रामदास जी कहते है कि हे मानव ! सांसारिक जीवन एक भयंकर समस्या है | इसमें सत्य क्या है यह ढूंढ पाना मुश्किल है | सांसारिक भौतिक जीवन की आस एक विष के समान है | अत: जिस प्रकार से विष खा लेने पर भी सुख प्राप्त नही होता , वैसे ही भौतिक सुख के जीवन से सुख कैसे प्राप्त होगा ? इसलिये हे मन ! श्रीराम का नाम स्मरण और ध्यान करते रहना चाहिये | सांसारिक कर्तव्यो के साथ ही नाम स्मरण का सुख प्राप्त करना अत्यंत आवश्यक है |

suvarna lele said...

संसारात सारभाग कांहीच नाही .संसार असार आहे .जर संसारात आसक्ती आली तर तो घोर आहे .घोर म्हणजे भयंकर आहे .भयंकर अशा साठी की संसारात एकदा लिप्त झालो की येणा-या काळज्या ,चिंता कर्तव्य ,यातून सुटका होत नाही .एका चितेतून ,काळजी तून मुक्तता झाली की दुसरी समोर हजर असतेच .एकां चितेतून मुक्तता झाली की दुसरी आहेच .एक वासना पूर्ण झाली की दुसरी आहेच हजर .त्यामुळे अनेक जन्म घेतले तरी माणूस ह्या संसारात गुंतत च जातो .जन्म मृत्यूच चक्र चालूच राहते .म्हणूनच समर्थ संसाराला घोर म्हणतात .
संसार घोर असला तरी संसार टाकता येत नाही .एखाद्याला संसाराचा वीट आला व तो अरण्यात निघून गेला तरी त्याला जगण्यासाठी मूलभूत गरजांची पूर्तता करावीच लागते .म्हणजे तो त्याच्या पुरत्या गोष्टींचा संग्रह करतोच .त्या वस्तूंबद्दल आसक्ती ठेवतो .म्हणजे पून्हा ये रे माझ्या मागल्या ! अशी अवस्था होते .
ह्या संसारातून सुटका करून घ्यायची असेल तर समर्थ सांगतात की हे मना तू सत्य काय आहे ते शोध .सत्य ते की जे व्यापक आहे ,त्रिकालाबाधित आहे .म्हणजे तीनही काळात सत्य आहे .पण हा सत्याचा शोध सहज शक्य नाही ..त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात .परमेश्वराला शरण जाउन परमेश्वराशी लीन होऊन जावे लागते .
त्यासाठी संसाराची असारता पटावी लागते .संसाराच्या असारता पटवणा-या अनेक गोष्टी घडत असल्या तरी आपले त्या गोष्टींकडे लक्ष नसते .पून्हा आपल्या मनासारखे होईल असे माणसाला वाटते .
समर्थ विचारतात की विष खाल्ले तर सुख कसे मिळणार ? विष कोणत्या अर्थाने समर्थ म्हणतात ते बघितले पाहिजे .संसाराची आसक्ती विषासारखी काम करते .आसक्तीने माणूस संसारात रममाण होतो तसे तसे त्याला दु:ख आणि स्वार्थ दैन्याला सामोरे जावे लागते .संसारात आपण ज्यांना आपले म्हणतो तेही आपले नसतात .सगळ्यांमध्ये स्वार्थ भरलेला असतो .जोपर्यंत स्वार्थ साधणार असतो तोपर्यत माणसे साथ देतात .म्हणून संसारात राहताना कर्तव्य भावनेने ,आसक्तीने राहता कामा नये .
कर्तव्य भावनेने ,आसक्ती सोडून राहता यावे म्हणून च समर्थ आपल्याला राघवाचे ध्यान करायला सांगतात .ज्याचे ध्यान करायचे तो राघव कसा आहे ते समर्थ श्लोक ६७ मध्ये सांगतात