Friday, April 8, 2011

श्लोक ६७ ....

II श्रीराम समर्थ II

घन:श्याम हा राम लावण्य रुपी |
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ||
करी संकटी सेवकाचा कुडावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||६७||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


 जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate( Gwaliar) ..घनश्याम ये राम लावण्य रुपी |
महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी ||
करे संकटों में भक्तों की रक्षा |
कर प्रभात मे राम चिंतन लक्षा ||६७||
अर्थ..... श्री राम दास जी कहते है कि हे मन ! मेघों के समान सांवले रंग के श्रीराम जो लावण्यरुपी और सुंदर है तथा महान धीरज रखने वाले और गंभीर स्वभाव के एवं प्रतापवान है जो संकट के समय अपने भक्तों का रक्षण करने वाले है | अत: हे मानव ! प्रात: के समय में ऐसे श्री राम जी का चिंतन करते रहना चाहिये |

suvarna lele said...

समर्थ सांगतात की त्यांचा राम घनश्याम आहे रूपाने लावण्यरूपी आहे .मेघ सावळा असतो .तसे रामाचे रूप ही सावळे आहे .मेघ जसा उदार ,जलाने भरलेला असतो .सर्वत्र जलधारांचा वर्षाव करून लोकांना आनंद देणारा ,समृद्धी वाढवणारा असतो .उन्हाची तलखी वाढली की हवा हवासा असणारा हा मेघ आनंद देतो .तसाच हवा हवासा वाटणारा घनश्याम राघव आहे .तोही दयासागर आहे .दैन्य घालवणारा आहे .आनंद देणारा आहे .सावळा रंग संग्राहक आहे .सगळ्यांना सामावून घेणारा आहे .तसा श्रीराम सर्व गुणांचा संग्राहक आहे .
लावण्य या शब्दात रेखीवपणा ,अधिक आकर्षतता एकत्रित असतात .त्याच्या मोहकपणा मध्ये ध्यान करणा-याचे मन त्या लावण्य रूपी रामात गुंतून पडते .श्रीराम नुसते लावण्याने युक्त नाही तर ते धीर ,गभीर ,आणि पूर्ण प्रतापी आहेत .
धीर म्हणजे टिकून राहणारे ,निश्चल आहेत .दृढनिश्चयी आहेत .बुद्धीवादी आहेत .बुद्धीनिष्ठ आहेत . स्थिर आहेत .पण स्थिरता आहे सत्व गुणांची .सत्व गुणाची स्थिरता टिकविण्यासाठी गरज असते गंभीरतेची ,आपण गंभीर नसतो ,चंचल असतो .आपण सर्व गोष्टी वर वरच्या करतो .एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जात नाही .त्यामुळे एखाद्या गोष्टीतला गाभा आपल्याला कळत नाही .हा श्रीरामाचा गांभीर्याचा गुण सव रामभक्तांनी घेण्या सारखा आहे .गांभीर्य या शब्दातून समर्थांनी श्रीरामांच्या ठिकाणी असलेली परिपूर्णता दाखवलेली आहे .तो गुण साधकांनी घेण्यासारखा आहे कारण गंभीरता असणारी व्यक्ती वरवरच्या देखाव्याला फसत नाही ..सामान्य पणे स्वत:ला भक्त म्हणवून घेणारे आत एक ,ओठावर एक अशी परिस्थिती असणारे असतात .असा दंभ अप्रामाणिकता श्रीरामांच्या कडे चालत नाही .या गोष्टीकडे साधकांनी लक्ष द्यायला हवे .
श्रीराम पूर्ण प्रतापी आहेत ..त्यांचे सामर्थ्य अलौकिक आहे .त्यांचे शौर्य ,पराक्रम कार्यक्षमता प्रचंड आहे .त्यामुळे श्रीरामांना कोणत्याही संकटाला धीराने ,निश्चलतेने तोंड देणारे आहेत ..त्यामुळेच भक्तांना ते दिलासा देतात की तुमच्या कोणत्याही संकटात श्रीराम तुमच्या पाठीशी आहेत . संकटातून तुमचे रक्षण करतील .
म्हणूनच समर्थ सांगतात की प्रभाते मनी राम चिंतीत जावे .