II श्रीराम समर्थ II
सदा राम नामे वदा पूर्ण कामे |
कदा बाधिजेना (आ)पदा नित्य नेमे ||
मदालस्य हा सर्व सोडोनी द्यावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७०||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
कदा बाधिजेना (आ)पदा नित्य नेमे ||
मदालस्य हा सर्व सोडोनी द्यावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७०||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
2 comments:
कामना पूर्ण करणा-या रामाचे नाम सतत घ्यावे .असे समर्थ या श्लोकात सांगतात .काम म्हणजे वासना ईच्छा .वासना जेव्हा ईश्वराचे नाम घेण्याची असते तेव्हा ती उत्तम असते .वासना जर विषयाची असेल तर काम षडरिपुचा राजा असल्याने चित्त विषयांचे ग्रहण करते .असे चित्त भगवंताच्या कडे वळवणे कठीण होते .त्यासाठी आपल्या प्रयत्नांची जरुरी असते .जेव्हा काम ईश्वर भजनी असतो ,तेव्हा ईश्वर भजनाची हाव असते ,भजन पूजनात ,ईश्वर भजनात गुंगून जावेसे वाटते .भक्त म्हणवून घेण्यास आनंद वाटतो .नामघोष करण्यात आनंद वाटतो ,तेव्हा कोणतेही सकट बाधित होत नाही .कोणतेही संकट झेलण्याची ताकद माणसात येते .नामावर पूर्ण निष्ठा उत्पन्न झाली की हे संकट आपण झेलावं अशी प्रभू रामचंद्रांचीच ईच्छा आहे अशी आपल्या मनाची धारणा व्हायला मदत होते .
ते संकट आहे असे वाटत नाही .अशी परिस्थिती यावी म्हणून एक पथ्य पाळावे लागते ,ते म्हणजे सतत नाम घेणे !नित्य नेमाने नाम घेणे .नित्य नेमाने साधना करणे .नित्य नेमाने चित्त शुध्द होते .त्या आनंदघन परमेश्वराच्या रूपाचे ज्ञान होते .ते रूप म्हणजे आपण आहोत असे ज्ञान झाले की प्रापंचिक आघात कांहीच नाहीत असे वाटते .पण ठरवून सुध्दा नित्य नेम करायला जमत नाही .१ गर्व २ आळस
आपण नाम घ्यायला सुरुवात केली ,की आपल्याला गर्व होतो की आपण नामधारक ! आपल्या इतके नामधारक दुसरे कोणी नाही .या अहंकारा मुळे ती भक्ती ,ते नाम वाया जाते .कारण अहंकाराने मन ईश्वर चरणी लीन होत नाही ,
पहाटे जाग येउन सुध्दा साधना करायाला उठावेसे वाटत नाही ,अशा वेळेस आपल्या सारखे करंटे आपणच असतो .म्हणून समर्थ म्हणतात ‘मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा | असे करंटे पण येउ नये म्हणून’ प्रभाते मनी राम चिंतीत जावा ‘!
AS stated by Lochan Kate...[हिन्दी में]
सदा राम नाम वदे नित्य नेम से |
रहे नियम से सदा बाधा न होये रे||
मदालस्य और तु अहं को त्याग दे |
प्रभाती में कर तु चिंतन राम का ये||७०||
श्री राम दास जी कहते है कि हे मन ! सम्पूर्ण कार्य सदैव श्रीराम का चिंतन करके ही प्रारंभ करना चाहिये | नित्य प्रतिदिन नियमित रुप से श्रीराम का नाम लेने से महान दोषों का निवारण होता है और आपदायें कदापि आपको कष्ट नही देगी | अत: हे मन ! अहंकार अवं आलस्य सब छोडकर नियमित रुप से प्रात: के समय में श्री राम का चिंतन करते रहना चाहिये
Post a Comment