Friday, March 25, 2011

श्लोक ६५..

II श्रीराम समर्थ II

नको दैन्यवाणे जिणे भक्ति उणे |
अती मूर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे ||
धरी रे मना आदरे प्रिती रामी |
नको वासना हेमधामी विरामी||६५||


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwalior)...भक्ति विहीन का है दीन जीवन |
अति मूर्ख का सर्वदा दु:खी है मन ||
करो आदर से साधना राम नाम |
नही वासना हो कनक रीती धाम ||६५||
अर्थ...
श्री समर्थ राम दासजी कहते है कि हे मन ! श्रीराम की भक्ति के बिना जीवन अत्यंत मूर्खता पूर्ण एवं सर्वदा दुगुने दुख के साथ दीन बनकर जीना होता है | अत: श्रीराम के प्रति मन में प्रिती और आदर रखना चाहिये ,क्योकि स्वर्ण से भरेपुरे घर की ईच्छा रखने की अपेक्षा श्रीराम की भक्ति से जीवन भरे , क्योकि श्रीराम की भक्ति के बीना जीवन का सार व्यर्थ है और श्रीराम की भक्ति ही कनक से भरे घर के समान है|

suvarna lele said...

जर दैन्य वाणे जीणे नको असेल तर काय करावे ते समर्थ सांगतात : परमेश्वराच्या अस्तीत्वा विषयी श्रद्धा, भक्ती ठेव म्हणजे तुला दैन्य वाणे जिणे जगावे लागणार नाही .
जेव्हा आपण बुध्दिवादाच्या जोरावर परमेश्वराचे अस्तित्व मानत नाही ,तोच सर्व कर्ता करविता आहे असे मानत नाही ,त्याउलट मीच कर्ता असे आपण मानतो तेव्हा काय होते ते समर्थ सांगतात : मी कर्ता म्हणसी |तेणे तू दु:खी होसी | राम कर्ता म्हणसी | तेणे पावसी यश कीर्ती प्रताप ||
म्हणून हे मना ,तू कोणत्याही कार्याचा कर्ता आहेस असे समजू नकोस .तसे समजलास तर तुला फक्त दु:ख आणि दु:खच मिळेल .तू जर कोणत्याही कार्याचा कर्ता असतास तर तुझे कार्य योग्य पद्धतीने तू पार पाडू शकला असतास ,पण तसे प्रत्येक वेळेस होत नाही .त्याचा अर्थ तुझ्या कार्यावर नियंत्रण ठेवणारे कोणीतरी आहे .ते तू मान्य कर .आणि त्या रामावर सगळा भार अर्पण कर .म्हणजे नुसता बसून राहू नकोस .तुझ्या वाट्याला आलेले कर्म तू कर .पण फलाची आपेक्षा करू नकोस .श्रीराम तुझी काळजी घेईल .
सुखासानिता हा एक दोष आहे त्याच्या संबधी कोणतीही आशा बाळगू नकोस .त्याला मनातून काढून टाक.रीकामपणात विचार स्वैर सुटतात .त्या विचारांवर नियंत्रण रहात नाही .रिकामे मन सैतानाचे घर बनते .आणि मनाला दैन्याचा सामना करावा लागतो .म्हणून हे मना ,राघवाची भक्ती कर .म्हणजे तुझे मन संतोषाने ,आनंदाने भरून जाईल .