Friday, February 4, 2011

श्लोक ५८

II श्रीराम समर्थ II

नकों वासना वीषई वृत्तीरुपें।
पदार्थी जडें कामना पूर्वपापें ॥
सदा राम नि:काम चिंतित जावा।
मना कल्पना लेश तोही नसावा॥श्रीराम॥५८॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwalior) ....[हिन्दी में]
नही वासना रुप में विषय व्रुत्ति |
पूर्व पाप से कामना जड हो जिसकी ||
सदा रामनाम बोलो निष्कामता से |
मन कल्पना में लेश ना रहे रे ||५८||
अर्थ..
श्री रामदास जी कहते है कि हे मानव ! जो व्यक्ति मन में विषय व्रुत्ति रुपी नही रखे तथा पूर्व पाप कर्मों के अनुसार जिसकी इच्छायें जड हो ग ई हो | उसे सदैव रामनाम निषकाम भाव से लेना चाहिये , तथा मनुष्य के मन में लेशमात्र भी विषय रुपी कल्पनाओं की भावना नही रहना चाहिये | वही मानव संसार में धन्य है |

suvarna lele said...

या श्लोकात वासना ,कामना ,कल्पना ,वृत्ती या महत्वाच्या संकल्पना आहेत .
वासना म्हणजे हवेपणा ,हवेपणा येतो ,एखाद्या गोष्टीने आपल्याला सुख मिळेल या कल्पनेने ! त्यामुळे ती गोष्ट आपल्याला हवी असे वाटते .आपल्या वृत्तीनुसार आपल्याला एखाद्या पदार्थाची आवड उत्पन्न होते व ती वस्तू हवीशी वाटते .तेव्हा त्या गोष्टीच्या उपयोगाबद्दल आपण सारासार विचार करत नाही .आणि त्या वस्तूचा अंगीकार आपण करतो तेव्हा तिला वासना म्हणतात .वासना अनेक प्रकाराच्या असतात . लोक वासना ,शास्त्र वासना ,विषय वासना ,देह वासना इत्यादि .
कामना :वासना जेव्हा तीव्र रूपात असते तेव्हा तिचे रूपांतर कामनेत होते .एखादी गोष्ट जेव्हा तीव्रतेने आपल्या हवी असते तेव्हा तिचे रूपांतर कामनेत होते .
वृत्ती : वृत्ती म्हणजे अंत:करणातील विचारांचे तरंग ! कल्पना कामना वासना या सर्व विचारांचे तरंग असतात .त्यांची जाणीव ज्यामुळे होते तिला वृत्ती म्हणतात .
जेव्हा आपल्याला असे वाटते की या दृश्य विश्वातून वस्तूंपासून आपल्याला सुख मिळते तेव्हा आपली वृत्ती बहिर्मुख होते .बहिर्मुख वृत्तीने निरनिराळ्या वस्तूंची ,त्या मिळवण्याची वासना निर्माण होते .समर्थ म्हणतात की अशी बहिर्मुख वृत्ती जन्म मृत्यू च्या चक्रात आपल्याला अडकवते .म्हणून अशी वासना ,विषयी ,वृत्ती नको .
जड पदार्थावर आपली कामना, पूर्व पापांवर अवलंबून असते .ती आपल्याला बदलता येते ती निष्काम भावनेने श्रीरामाचे चिंतन करावे .पूर्व जन्मीच्या पापामुळे जरी वृत्ती विषयाकडे वळली ,तरी श्रीरामाच्या भक्तीने तिला वळवता येते .त्यासाठी सत्कर्म करावे लागते .पुण्य कर्म करावे लागते .फक्त स्वत:चा स्वार्थ नं बघता दुस-यासाठी देह कष्टवीला पाहिजे .तरच वृत्ती शुध्द होते .त्यासाठी विषयाकडे धावणा-या मनास विषयाऐवजी राम स्वरूपाचे आमिष दाखवावे .म्हणजे निष्काम भक्तीचे फळ समजावून सांगावे .निष्काम भक्तीने वासनांचा क्षय होतो .चित्त शुद्धी होते ही गोष्ट मनाला पटवून द्यावी .चित्त शुध्दिने मग आत्मकृपा होते आणि मग स्वस्वरूपाची ओळख !
श्रीरामाचे चिंतन करायचे जोपर्यत कल्पनेचा लेशही उरणार नाही .राम रूपाची इतकी ओढ लागली पाहिजे की दुसरे काहीही नको असे वाटले पाहिजे .