Friday, January 28, 2011

श्लोक ५७

II श्रीराम समर्थ II

जगीं होईजे धन्य या रामनामें।
क्रिया भक्ति उपासना नित्यनेंमें॥
उदासीनता तत्त्वता सार चिंता।
सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहें॥ श्रीराम॥५७॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

हे मना ,रामनाम घेउन या जगात तू धन्य हो कारण या नामात क्रिया ही होते ,भक्ती होते ,उपासना ही होते .तू धन्य होशील कारण नराचा नारायण होईल .नाम म्हणजे न मम ! म्हणजे हा देह मी नाही ,देहात असलेले आत्मस्वरूप ,आत्म् चैतन्य म्हणजे मी आहे ,जो परमेश्वराचा अंश आहे याची जाणीव होते मी म्हणजे देह ,ह्या अहंकारा पासून सुटका होते .आपला आपल्याला विसर पडतो तेव्हा मी आत्मारामच आहे याची जाणीव होते .अज्ञान मोह नाहीसा होतो .आत्मारामाची ओळख पटते .म्हणजेच मी नाहीसा होतो .म्हणजेच उपासना .
एकनाथ महाराज म्हणतात : मीच देवो मीच भक्त |पूजोपचार मीच समस्त | मीची मातें पूजित | हे इत्यभूत उपासना ||
मीच देव आहे ,मीच भक्त आहे ,मीच पूजा ,मीच उपचार ,मीच मला पूजित आहे हीच उपासना आहे ,माझं मी न राहता देव भक्त ऐक्य होणे ,याचा सतत अनुभव घेणे म्हणजे उपासना ! नामात असे ज्ञान आहे .
तसेच नामात भक्ती आहे ,ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूची ओढ आपल्याला लागली तर त्या वस्तूचेच मनन ,चिंतन निदिध्यास आपल्याला लागतो .ती वस्तू मिळविण्यासाठी आपण जीवाचे रान करतो तसेच जर नामाची ओढ आपल्याला लागली तर त्या नामाचा ध्यास आपल्याला लागतो .आणि उपासना साधते .आणखीन एक गोष्ट समर्थांनी आपल्याला सागितली आहे ती म्हणजे नित्य नेम हवा .नित्य नियमाने आपण साधना म्हणजे नामसाधना केली पाहिजे .नित्य नेम कशासाठी ? नित्य नियमाने जर नाम घेतले तर आपल्या मनात असलेल्या अनंत वासना नाहीशा होतात .नित्य नेमाचा फार मोठा उपयोग असा की नित्य नियमाने अंतकाळी सुध्दा आपोआप नाम मुखात येते .त्यासाठी फारसे प्रयास करावे लागत नाहीत .
समर्थ तीस-या चरणात म्हणतात ‘उदासीनता तत्वता सार आहे ‘ आपण व्यवहारात उदासीन म्हणजे कशातही मन न लागणे असा अर्थ घेतो .पण समर्थ या चरणात म्हणतात की उदासीनता हेच सार आहे .कोणत्याही सांसारिक गोष्टींत कोणताही रस नं वाटणे म्हणजे उदासीनता !कोणत्याही गोष्टींची उपाधी न वाटणे म्हणजे उदासीनता !उदासीनता असल्यामुळे सुख दुखापासून अलिप्तता येते .सुख दुखाचा पलीकडे गेलेले असल्यामुळे हवे नको पणा संपलेला असतो .वासना संपुष्टात आलेल्या असतात .समाधानी स्थिती आलेली असते .जाईल ते जाउ दे,राहील ते राहू दे अशी मनाची आनंददायी अवस्था असते .म्हणून वृत्ती मोकळी राहते .

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwalior )...[हिन्दी में]
जग में होता धन्य राम नाम से रे |
क्रिया भक्ति उपासना नित्य कर रे ||
उदासीनता होना तत्व का सार है रे |
सदा सर्वदा स्वच्छंद व्रुत्ति तेरी हो रे||५७||
अर्थ...
श्री रामदास जी कहते है कि हे मानव मन ! जो व्यक्ति परमेश्वर की पूजा , अर्चना , कर्म-धर्म नियमित रुप से करता हो वह व्यक्ति इस संसार में रामनाम के कारण धन्य होता है | जिसकी प्रव्रुत्ति पूर्ण रुप से बैरागी हो ग ई हो तथा जिसकी विचारधारा ,जिसका वर्तन , आचार - विचार
सदा के लिये खुले मन का अर्थात स्वच्छंद हो गया हो वह भक्त धन्य है |