Saturday, January 8, 2011

श्लोक ५४..

II श्रीराम समर्थ II

सदा सेवि आरण्य तारुण्य काळी |
मिळेना कदा कल्पनेचिनि मेळी |
चळेना मनी निश्च्ययो द्रुढ ज्याचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|| श्रीराम||५४||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar )....[हिन्दी में]
सदा सेवा करता जो तारुण समय में|
विषयों
की कल्पना में ना डूबे रे वो||
बदलता नही जिसका निश्चय है द्रुढ रे|
जग
में है वो दास सर्वोत्तम सा रे ||५४||
अर्थ..... श्री रामदासजी कहते है
कि हे मानव मन ! तरुण उम्र के समय में भी जो सदैव सेवा भाव से रहता हो
विषयादियो की कल्पना में जो भटकता न हो जिसका मन का निश्चय जरा भी डगमगाता न
हो वही भक्त संसार में परमेश्वर का सबसे बडा धन्य एवं उत्तम भक्त है |

suvarna lele said...

श्लोक ५४ सर्वोत्तमाचा दास आपले तारुण्य अरण्यात घालवतो ,एकांतात ध्यान धारणा करण्यासाठी ! वास्तविक तारुण्य हा काळ असतो विषय ,विलास भोगण्याचा ,पण सर्वोत्तमाचा दास स्वखुशीने आपले तारुण्य ईश्वर प्राप्तीच्या ऊच्च ध्येयाने प्रेरित होउन अरण्यात घालवतो .आरण्यातील एकांतात तो चित्त एकाग्र करतो .विचारांची चाळण तो करतो आणि ज्ञान प्राप्ती करून घेतो .
तो कल्पनेच्या घोटाळ्यात तो पडत नाही .कारण तो सतत ब्रह्माचे चिंतन करत असतो .स्वरूप चिंतनात तो मग्न असल्यामुळे त्याला कोणत्याही व्यावहारिक गोष्टी सुचत नाहीत .मान सन्मान .ऐश्वर्य यासारख्या गोष्टी त्याच्या खिसगणतीत ही नसतात .
त्याचे मन स्वरूप निश्चयापासून चळत नाही .सामान्य माणसाला कल्पनातीत असलेले स्वस्वरूप त्याने ओळखलेले असते .त्या स्वरूपाशी तो लीन झालेला असतो .त्यामुळे तो एकांतात प्रापंचिक विचाराने ढळत नाही .स्वस्वरूपा वरून त्याचे मन ढळत नाही .तुकाराम महाराज म्हणतात : विटंबो शरीर होत का विपत्ति | परी राहो चित्ती नारायण | अशी त्याची अवस्था असते .