Friday, January 21, 2011

श्लोक ५६

II श्रीराम समर्थ II

दिनाचा दयाळु मनाचा मवाळु।
स्नेहाळु कृपाळु जगीं दासपाळु ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥ श्रीराम॥५६॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwalior ).............[ हिन्दी
में]
दीनों का दयालु मन का वो प्रेमा |
स्नेहता क्रुपालुता जिसका हो
जामा ||
उसके अंतर मे क्रोध संताप कैसा |
जग में होता वो दास
सर्वोत्तम सा||५६||
अर्थ...
श्री रामदासजी कहते है कि हे मन ! जो
व्यक्ति दीन दुखियों के प्रति दयाभाव रखता हो , जो मन से कोमल स्वभाव का
हो , स्नेह्पूर्ण व्यवहार रखता हो | उसके अंतर्मन में क्रोध का भाव कैसे हो
सकता है ? अत: वही मनुष्य परमेश्वर का सच्चा भक्त संसार मे है और वही
धन्य भी है |

suvarna lele said...

या श्लोकात दासाचे अंत:करण कसे असते ते सांगितले आहे .सर्वोत्तमाचा दास दिनांचा दयाळू असतो .दीन म्हणजे असहाय्य ,दु:खी ,कष्टी ,संकटात असणारे .अशा दीन माणसाचे दु:ख दासाला बघवत नाही ,तो त्यांचे दु:ख हरण करण्यासाठी झटतो .नुसते बघून हळहळत नाही .तो त्यांच्यावर द्या करतो .दु:ख मग ते कोणाचेही असो ते दूर करणे हे फक्त संतांनाच जमते .कारण ते सर्वां भूती परमेश्वर पहात असतात .
तो मनाचा मवाळू असतो .कोमल अंत:कारणाचा असतो .त्याचे स्पर्श ,रूप ,रस ,गंध,वाणी सर्वच मृदू असते .त्याच्या संगतीने राहिले तर माणसाला अतीव आनंद मिळतो ,समाधान मिळते .
तो स्नेहाळू असतो .त्याने केलेल्या उपकाराची परतफेड दुस-याने करावी अशी त्याची अपेक्षा नसते .तो जगमित्र असतो त्यामुळे हे विश्वची माझे घर अशी त्याची भावना असते .
तो कृपाळू असतो .दासपाळू असतो दासांचे रक्षण करणारा असतो ..या सर्व गोष्टींमुळे त्याच्या अंगी क्रोध ,संताप नसतो .तो सर्वत्र हरिरूप पहात असल्यामुळे ,तो स्वत: हरिरूप झालेला असल्यामुळे ,आपणच आपल्यावर कसं रागवायचं असा विचार करून तो कोणावर संतापणार ?
असा हां दास धन्य असतो .