Friday, February 25, 2011

श्लोक ६१

II श्रीराम समर्थ II

उभा कल्पवृ क्षा तळी दु:ख वाहे |
तया अंतरी सर्वदा तेचि राहे ||
जनी सज्जनी वाद हा वाढवावा|

पुढे मागुता शोक जीवी धरावा|Iश्रीराम॥ ६१

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwalior ).....[हिन्दी में]
खडे कल्प व्रुक्ष नीचे फ़िर भी दु:ख से रोये | अंतर में उसके सर्वदा वो ही सा हे ||
जनों सज्ज्नों में वाद बढते ही देखा |
पिछे आगे शोक मन में ही रहता ||६१||
अर्थ... श्रीरामदासजी कहते है कि हे मानव मन ! वह व्यक्ति जिसके मन मे श्रीराम चन्द्र जी के प्रति आस्था या श्रध्दा न हो वह कल्पव्रुक्ष के नीचे खडा भी दु:खी रहता है | उसके अन्तर मन में सदैव वही दु:ख का भाव रहता है | सज्जन लोगों मे विभिन्न विचारों के प्रति मतभेद बना रहता है | बाद में यह मतभेद मानव के जी का जंजाल अर्थात जीवन के लिये कष्ट दायी बन जाता है | अत: हे मानव ! सर्वथा मतभेदो से दूर रहो जिससे बाद मे दु:ख सहने का समय ना आये |

suvarna lele said...

हा श्लोक मुमुक्षुला उद्देशून आहे ,समर्थ त्याला सांगत आहेत की सर्व देवांचा देव श्रीराम तुझ्या अंतरीच आहे .तू वाद घालण्यापेक्षा परमार्थाला उचित असा संकल्प कर .रामकृपेने तू सिद्ध होशील .
श्रीराम कल्पतरू प्रमाणे आहेत .कल्पतरू जसा आपल्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण करतो .सुखाची ईच्छा धरली तर सुख देतो .दु:खाची धरली तर दु:ख देतो .तसा या देहाचा स्वामी श्रीराम आपल्या कोणत्याही ईच्छा पूर्ण करण्यास समर्थ असतो .वासना तसे फळ तो देतो .सुखाची वासना धरली तर सुख ,दु:खाची धरली तर दु:ख देतो .जसे आपले चिंतन असते तसे आपल्याला फळ मिळते .
माणसाला आपले कोठे चुकते ते कळत नाही .माझेच खरे या भ्रमाने तो इतरांशी वाद घालू लागतो .आपले विचार ,आपले संकल्प आपल्या दु:खाला कारणीभूत होत आहेत हे त्याला कळत नाही ,म्हणून तो वाद घालतच बसतो वाद अनेक विषयांवरून घालतो .माझा देव ,माझा संप्रदाय ,माझा धर्म ,माझा देश असे अनेक विषय त्याच्या कडे असतात .तो फक्त एक गोष्ट विसरतो .ती अशी : सर्व सृष्टीकर्ता ,सृष्टी चे नियमन करणारा ,आपल्या देहात साक्षी रूपाने राहतो आहे .तो आपल्या अंतरात आहे ,आपण त्यालाच शोधायला पाहिजे ,त्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे .