II श्रीराम समर्थ II
मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥
मनी कामना राम नाही जयाला।
अति आदरें प्रीती नाहीं तयाला॥॥श्रीराम॥५९॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, February 11, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
AS stated by Lochan Kate ( Gwalior)...[हिन्दी में]
कल्पना मन की कोटि है कल्पित|
नही रे नही सर्वथा राम है मिलत||
मन में कामना राम की नही जिसको|
अति आदर प्रीति नही कभी उसको||५९||
अर्थ....
श्री रामदास जी कहते है कि हे मनुष्य मन ! जिस व्यक्ति के मन में विषयों के प्रति कोटि-कोटि कल्पनायें घुम रही हो तथा जो ये सोचता हो कि मुझे राम वगैरेह कुछ नही चाहिये | श्रीराम को पाने की लालसा नही रखता हो | उस व्यक्ति के मन में प्रेमभाव कदापि नही रहता | ऐसे व्यक्ति अपने जीवन में नियम धर्म के प्रति सिर्फ़ दिखावा करते है | सच्चे मन की श्रध्दा उनके मन में कभी भी नही रहती है| अत: वे लोग श्री राम को पाने में भी असमर्थ होते है |
अरे मना ,तू रामाच्या स्वरूपाविषयी कितीही कल्पना केलीस तरी तुला रामाची भेट होणार नाही कारण रामाचे स्वरूप कल्पनातीत आहे .तुझ्या कल्पनेच्या बाहेर आहे..याउलट तू कल्पनेच्या आहारी गेलास तर फक्त दु:ख तुझ्या पदरी येईल .
जेव्हा आपण एखादे कर्म करतो तेव्हा आपल्याला एखादे कर्म करण्याची ईच्छा ,वासना निर्माण होते .ईच्छा ,वासनेचे सूक्ष्म स्वरूप म्हणजे कल्पना आहे .ती कल्पना सतत माणसाच्या मनात राहते ,कल्पनेनेच माणूस हालचाल करतो .माणूस मेल्यावर सुध्दा वासानारूपाने ती देहाच्या बाहेर पडते .तीच सुख ,दु:ख आणि मोक्षाला कारण ठरते .आपण जे विचार करतो ,आचरण करतो ,आपली वाणी आपण बोलतो ,ह्या सर्व गोष्टी कल्पनेनेच होतात .एका कल्पनेतून दुसरी कल्पना निर्माण होते .कल्पनेचा विस्तार वाढत जातो .
कल्पनेनेच मायेच्या बधनात आपण अडकतो ,तर कल्पनेनेच माया निवारण होते व ब्रह्म प्राप्ती होते .,मी आणि अंतरात्मा वेगळे आहोत हे द्वैत ही कल्पनाच निर्माण करते .
कल्पना सर्वत्र असते ,आत ,बाहेर ,मागे पुढे सर्वत्र कल्पनाच असते .सर्व दृश्य सृष्टी ,सर्व जीव प्राणी ,स्थूल सूक्ष्म ,कारण ,महाकारण देह या सर्व कल्पनाच आहेत .ही अष्टधा प्रकृती ,ज्ञान अज्ञान ,बध्द ,मुमुक्षू ,साधक या सर्व कल्पनाच आहेत .
सगळ्या सृष्टीत जरी त्या आत्माराम अंश रूपाने आहे तरी त्या आत्मारामाच्या भेटी ला अडथळा आणते ती कल्पना ! कारण आपण विषयाच्या कल्पनेत गुंगून जातो त्यामुळे रामाची भेट होत नाही .राम दूरच राहतो .आणि रामा विषयी प्रेमही निर्माण होत नाही .
Post a Comment