II श्रीराम समर्थ II
नसे मानसी नष्ट आशा दुराशा |
वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ||
ॠणी देव हा भक्तिभावें जयाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा||५५||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !|
Friday, January 14, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
As stated by Lochan Kate ( Gwaliar) ....
[ हिन्दी में ]
न हो मन में जिसके आशा दुराशा |
रहे अंतर में प्रेम पाशा पिपाशा ||
ऐसे भक्त का रुणि रहता है भगवन|
जग में है वो दास सर्वोत्तम ||५५||
अर्थ...श्री रामदासजी कहते है कि हे मानव ! जिसके मन में स्वार्थ मूलक आशाये तथा आकांक्षाये नष्ट हो गयी हो तथा जिसके मन मे भगवद् प्रेम की प्यास हो , जो सदैव भक्ति भाव
से परमेश्वर का रुणी रहा हो वही भक्त परमेश्वर का धन्य भक्त एवं उत्तम भक्त है|
सर्वोत्तमाच्या मनात नष्ट आशा ,दुराशा नसते .दुराशा म्हणजे नसती आशा ! आशा जेव्हा असते तेव्हा माणसाच्या मनात स्वार्थ असतो ,स्वार्थ पूर्ण होत नाही तेव्हा काम ,क्रोध यासारखे शडरिपू ही असतात .आशा कधी तृप्त होतच नाही .आशेची तृप्ती झाली नाही तर पदरी निराशाच येते ,दुख येते .म्हणून तिला नष्ट आशा म्हटले आहे .आशेमुळेच कितीही संकटे आली तरी जगणे सोडून देत नाही .आशेमुळेच त्याला चांगलें दिवस येतील असे वाटून परिस्थिती बरोबर झगडत राहतो .त्यामुळेच त्याला संसारा च्या प्रेमपाशात अडकतो .पिपाशा म्हणजे तहान ! सांसारीक माणूस ,त्याला तहान असते सांसारीक सुखाची ! पण सर्वोत्तामाच्या दासाला तहान असते परमेश्वराच्या भेटीची .सर्वोत्तमाची तहान असते सगुण स्वरूप साक्षात्काराची .त्यामुळे त्याची मागणी असते निष्काम प्रेमाची .! निष्काम प्रेमाने देव सर्वोत्तामाच्या दासाचा
ॠणी होतो .दासाची काहीही मागणी नसल्यामुळे त्याच्या जवळ कोणतीही लाचारी नसते ..दासाची देवाकडून प्रेमाची अपेक्षा असते .त्यामुळे देवाची जी ईछा तीच भक्ताची म्हणजे सर्वोत्त्माच्या दासाची असते .समर्थ म्हणतात : मनी धरावे ते होते | विघ्न अवघेची नासोन जाते |
Post a Comment