Friday, December 31, 2010

श्लोक ५३

II श्रीराम समर्थ II

सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी |
सदा  सर्वदा सत्यवादी विवेकी ||
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||श्रीराम || ५३||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate( Gwaliar ...)

सदा लीनता से जो सबको अपना ले |
सदा सर्वदा सत्यवादी जो हो ले ||
नही बोलता मिथ्य वाचा कभी रे |
जग में है वो दास सर्वोत्तम सारे || ५३||
अर्थ ---
श्री राम दास जी कहते है कि हे मानव ! जो व्यक्ति सभी से सदैव प्रार्थना स्वरुप बात करता हो एवं जो सोच समझकर सदैव सत्य बोलता हो तथा जो व्यक्ति निश्चय करके झूठ का समर्थन नही करता हो वही भक्त परमेश्वर का सबसे धन्य एवं उत्तम भक्त होता है

suvarna lele said...

सर्वोत्तमाच्या दासाने परब्रह्म स्वरूपाचा अनुभव घेतलेला असल्याने त्याची द्वैत बुद्धी
नाहीशी झालेली असते .तो सर्वत्र हरिरूप पहात असतो .सूर्य ,व्रुक्ष नदी यांसारख्या आप
पर् भाव नसलेल्या गोष्टींप्रमाणे त्याच्या जवळही आप पर् भाव त्याच्या जवळ नसतो
.म्हणून गरीब ,श्रीमंत लहान थोर असा भेदभाव त्याच्या जवळ नसतो .तो सर्वांशी
प्रेमाने वागतो .त्याला कोणाचा संशय नसतो .कोणाबद्दल आकस नसतो .मनाने प्रेमळ
असतो .ह्या सर्व गुणांमुळे तो सर्वांना हवासा वाटतो .
तो नेहमीच सत्य बोलतो .सत्य पण मधुर बोलतो .तो स्वप्नातही खोटे बोलत नाही
.त्रीवाचेने म्हणजे वैखरी ,मध्यमा आणि पश्यन्ति या तीनही वाचांनी तो खोट बोलत
नाही .त्याच्या परा वाणी तच खोटे नसते त्यामुळे तो खोटे बोलू शकत नाही .तो
सरळ मनाचा असतो .दुसरे त्याच्याशी खोटे वागले तरी तो त्यांच्याशी सरळ वागतो
असा सरळ वागणारा ,सत्य पण गोड बोलणारा ,खोटे न बोलणारा सर्वोत्तमाचा दास
असतो .