Friday, December 24, 2010

श्लोक ५२

II श्रीराम समर्थ II


क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे |
न लिंपे कदा दंभ वादे विवादे||
करी सूख संवाद जो ऊगमाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|| ५२||

 डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar) .... मद मत्सर छोड रे स्वार्थ बुध्दि |
नही संसार में उसे लोभ की उपाधि||
सदा बोलना नम्र वाचा सुवाचा |
जग में है वो दास सर्वोत्तम सा||५१||

अर्थ== श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मनुष्य ! जो नशा, द्वेष और लोभ से दूर हो गया हो | जिसका मन से स्वार्थ बुध्दि का अंत हो गया हो एवं प्रपंच अर्थात घर संसार से जिसका मन उचट गया हो | जो सदैव नम्र भाषा का प्रयोग बोलने में करता हो वही भक्त इस संसार में श्रीराम का धन्य एवं उत्तम भक्त कहलाता है |

suvarna lele said...

या श्लोकात समर्थ सर्वोत्तमाच्या दासाचे आणखीन काही गुणधर्म सांगत आहेत .सर्वोत्तमाचा दास म्हणजे समर्थांचा सिध्दच असतो .सिद्ध लक्षण समासात समर्थ म्हणतात :
आपुला आपण आनंद | कोणावरी करावा मद |याकारणे वादविवाद | तुटोनी गेला || ८-९-२८ ||
साधू स्वरूप निर्विकार | तेथे कैचा तिरस्कार | आपला आपण मत्सर | कोणावरी करावा || ¬८-९-२९ ||
साधू स्वरूप स्वयंभ | तेथे कैचा असेल दंभ |जेथे द्वैताचा आरंभ | जालाच नाही ||८-९-३१ ||
साधू स्वस्वरूपात तल्लीन असतो .त्यामुळे त्याला दुस-यावर आरेरावी करायला वेळच
मिळत नाही .त्यामुळे तत्व किती यावर वादविवाद तो करत नाही .तो फक्त एकच
तत्व मानतो ,ते म्हणजे हरी ! प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप याने अनुभवलेले असल्यामुळे त्याची
तत्त्वसंख्या किती याविषयी तो नि:संदेह असतो .आणि वादविवाद तो करत नाही .
त्याने प्रत्यक्ष ब्रह्मानुभव घेतलेला असल्यामुळे त्याच्या कडे दंभ नसतो .,अभिमानही
नसतो . तो सर्वत्र आपणच भरलेले आहोत असे मानत असल्यामुळे ,मोठेपणा कोणापुढे
मिरवायचा असा प्रश्न त्याच्यापुढे असतो .त्यामुळेच वादविवाद त्याच्या जवळ नसतो .
मग तो करतो सूखसंवाद ! संवादाचा विषय असतो उगमाचा ! उगम म्हणजे ब्रह्म !
मायेच्या उगमाचा विचार म्हणजेच ब्रह्माचा विचार .
हा विचार गुरुशिष्य ,मुमुक्षु ,अनुभवी संत यांच्यातच चालतो .