II श्रीराम समर्थ II
सदा बोलण्या सारिखे चालताहे |
अनेकी सदा एक देवासि पाहे||
सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा||श्रीराम||४९||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, December 3, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
सदा बोल जैसा करे वैसा तु|
किसी एक भगवंत जो भ रे तु||
सगुण भज रे भ्रम ना कर तु|
तभी धन्य कहलाता दास है तु||४९||
श्रीरामदासजी कहते है कि हे मन ! सदैव जैसा बोलो वैसा ही कार्य करो |तथा सदैव सभी का आदर करो परन्तु भक्ति निस्वार्थ भाव से करते रहो| सदगुणो का विचार ऐसा श्रीराम का भक्त इस संसार मे सबसे धन्य व बडा ही उत्तम कहलाता है|......
जो नेहमी बोलतो तसा चालतो तो सर्वोत्तमाचा दास असतो .सामान्य माणसे बोलतात तसे करत नाहीत .दुस -यावर एखादा प्रसंग ओढवला तर त्याला आपण अनेक गोष्टी सुचवतो ,पण तसाच प्रसंग आपल्यावर ओढवला तर आपण तसे वागू शकत नाही .आपण वेगळे वागतो .म्हणून एका सुभाषितात म्हटले आहे ,'परोपदेशे पांडीत्यां सर्वथा सुकरं नृणां | धर्मे स्वीयं अनुष्ठानां
कस्यचित सुमाहात्मन:|सुभाषितकार म्हणतात : दुस -याला उपदेश करणे नेहमीच सोपे असते .पण ते कृतीत आणणे येरागबाळाचे काम नाही .पण हा प्रश्न सत्पुरुषांच्या विषयात आढळत नाही .कारण सत्पुरुष जे बोलतात तेच त्यांच्या मनात असते ,तेच त्यांच्या कृतीत दिसते .
एकच सद्वस्तू सर्व चेतन अचेतन पदार्थांना व्यापलेली असते .तिचाच अंश सर्वत्र असला तरी ही सृष्टी मध्ये सर्व चेतन ,अचेतन गोष्टींमध्ये ,प्राण्यांमध्ये ,वनस्पतींमध्ये रूप ,रंग ,आकार ,गुण या दृष्टीने विविधता असते .तसेच हिंदू धर्मात १३ कोटी देव आहेत असे मानले आहे .प्रत्येक देवाचा गुणधर्म वेगळा असतो .तरी जो नामरूपाने वेगळे असलेल्या देवात एकच देव पहातो तो सर्वोत्तमाचा दास असतो .श्री समर्थांनी श्रीरामांच्या रूपात विठ्ठल पाहिला .जसे आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम ,सर्व देवं नमस्कारं केशवं प्रतीगच्छति | अनेक देव मानले तरी त्यापैकी कोणत्याही देवाला केलेला नमस्कार केशवाला [श्रीकृष्णाला ] पोहोचतो .
सर्वोत्तमाच्या दासाने जरी आत्मज्ञान प्राप्त करून घेतले तरी तो सगुणोपासना सोडत नाही .कारण पूर्णतेची जाणीव होणे हे अपूर्णतेचे लक्षण आहे असे शास्त्र सांगते .त्यामुळे साधना सुटत नाही .सत्पुरुष साधनेचा त्याग करत नाही ,सगुण भजन ते करतात .पण ब्रह्म आपल्या मूळ रूपात निर्गुण च आहे हे नि :शंयपणे त्याला माहीत असते .म्हणून असा महापुरुष सर्वोत्तमाचा दास असतो .
श्लोक ४९
सर्वोत्तमाचा दास समाजात कसा व्यवहार करतो हे या श्लोकात समर्थ सांगत आहेत.सदा बोलण्यासारखे चालता हे .. हा गुण परमार्थात तसेच लोकव्यवहारात पण महत्वाचा आहे. लोक बोलल्याप्रमाणे वागू लागतील , जे करू शकतो तेच बोलतील तर बरेच गोंधळ ,तंटे कमी होऊन समाजात सभ्यता नांदेल .परमार्थात सुद्धा नुसते पांडित्य उपयोगाचे नाही. निरुपणे ,प्रवचने,लिखाण खूप जोरात पण साधना व अनुभव नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. जसे पक्वान्नाचे नुसते वर्णन ऐकले पण खाऊन चव नाही पाहिली तर तृप्ती येते का ? "बोलाचीच कढी बोलाचाची भात I सेवुनिया तृप्त कोण झाला? "
पण हा समर्थांचा समर्थ भक्त जसा बोलतो तसाच चालतो किंबहुना जे करतो तेच बोलतो.
" बोलोनिया मुखे तैसी क्रिया करी I धन्य तो संसारी ब्रम्ह ज्ञानी II "
हा दास ज्ञानी असतो अन त्या ज्ञानामुळे त्याची दृष्टीच अशी असते की सृष्टीत प्रत्येक गोष्टीत त्याला भगवंत दिसतो मग बोलणे एक अन चालणे एक असे ठेवून फसवायचे कोणाला ?सगळीकडे तर तोच आत्माराम भरून राहिला आहे हा त्याचा भाव असतो. ' तो येकालाची सकळा घटी ...' सगळीकडे तोच व्यापून आहे. अनेकांमध्ये तो असतो .त्याच्या अधिष्ठानावर हे जग चालते तो सर्वत्र आहे पण तो स्वत:सर्वाहून अलिप्त आहे बोध या दासाला आहे.
" एवं जगदीश तो वेगळा Iजग निर्माण त्याची कळा I
तो सर्वांमध्ये परी निराळा Iअसोन सर्वी II " (दा.८.१.४१)
याप्रमाणे देव निर्गुण,व्यापक,अलिप्त आहे हे ज्ञान असूनही सगुणाचे भजन , ध्यान तो भक्तिभावाने करतो.कारण निर्गुण तेच सगुणात उतरले याची त्याला खात्री असते त्यामुळे भ्रम होणे शक्यच नसते.ज्ञानेश्वर माउलीने म्हणलेच आहे.
"तुज सगुण म्हणू की निर्गुण रे Iसगुण निर्गुण एकु गोविंदू रे II "
परामात्म्स्वरुपाचा अनुभव आल्यामुळे अज्ञानाचा भ्रमनिरास ज्याचा झाला आहे, जो बोलण्यासारखा चालतो, सर्वत्र आत्मदर्शन घेणारा , निर्गुणज्ञान असूनही सगुणोपासना करतो असा स्वरुपी लीन झालेला भक्त धन्य धन्य आहे.
Post a Comment