Friday, October 29, 2010

श्लोक ४४

II श्रीराम समर्थ II

मना रे जनी मौन मुद्रा धरावी|
कथा आदरे राघवाची करावी||
 
नसे राम ते धाम दोडूनि द्यावे
|
सुखा लागि आरण्य सेवित जावे|| श्रीराम||४४||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

Kalyan Swami said...

As stated By Lochan Kate ( Gwaliar )....[हिन्दी मे]
हे मन जन में मौन तु हो ले|
कथा आदर से राघव की तु कर ले||
नही राम वो धाम छोडता जा|
सुख के लिये तु एकांत धरता जा||
अर्थ...... श्रीरामदासजी कहते है कि हे मानव मन ! लोगो मे अपने को मौन मुद्रा मे रखना चाहिये,अर्थात् अधिक बात नही करना चाहिए |सदैव श्रीराम का चिंतन करते रहना चाहिये| जिस स्थान पर श्रीराम के नाम का अनादर होता हो अथवा तिरस्कार किया जाता हो उस स्थान पर रुकना सदैव अनुचित होगा, अर्थात् वह स्थान तुरंत छोड देना चाहिये| मनुष्य को सुख पाने के लिये चाहे जंगल ही क्यो न मिले? परन्तु श्रीराम का वहॉ आदर अवश्य होता है तो उसे वहॉ भी रहने मे कोई हर्ज नही| मुख्य बात यह है कि श्रीराम को पाने के लिये एकांत का सेवन करिये|.

suvarna lele said...

मागील श्लोकात सांगितलेला स्वरूपाचा अखंड ध्यास कसा धरावा ते सांगताना समर्थांनी मौन्य मुद्रा धरायला सांगितली आहे .मौन्य मुद्रा म्हणजे काय असा प्रश्न येतो .मौन्य मुद्रा म्हणजे फक्त वैखरीने बोलायचे नाही असे आहे का ?मौन्यमुद्रा म्हणजे केवळ वैखरीने न बोलणे नाही .आपण मुखाने बोललो नाही तरी तरी मनात संकल्प ,विकल्प ,विचारांचे तरंग उठतच असतात .मनात आपण अशा लोकांशी मनात भांडत असतो ज्यांच्याशी आपल्याला प्रत्यक्ष भांडता येत नाही .तेच आपण मौनात विचार करत असतो .नुसतेच वैखरीने न बोलणे म्हणजे मौन्य मुद्रा नाही .
अखंड विचारांचे तरंग असणा-या आपल्या मनाला बोलल्या शिवाय चैन पडत नाही .त्यासाठी समर्थांनी वायफळ न बोलता मोजकेच बोलायला सांगितले आहे .बोलत नसतांना राघवाचे नाव घ्यायालां सांगितले आहे .मौनं सर्वार्थ साधनं |असे म्हटले आहे .मौनात अंतर्मुख होतानां शेवटी स्वरूप साक्षात्काराचा धनी होता येते .
शेवटी जेथे राम गायला जात नाही तेथे राहू नये असे समर्थ सांगतात .

Ravindra Phadke said...

In this shloka Samartha swamiji is addressing how should we use our faculty of speech and how should we live every moment of our life.
There is a proverb " silence is golden" . Whenever we are with the people we have to use speech as our way of communication. But when we are alone what do we do? On examination we will find that we verbalise our thoughts. These thoughts come to our mind like a flood . one after the other.Then are we really silent? The answer is Of cource 'no!'

Then we may ask ourselves a question . Have we used every moment to remember HIM as was advised in the previous shloka? If we have remembered Him then yes we did use our time for the right cause. Otherwise even if we are not speaking with others we are not silent. The real silence is the one when we remember HIM. when we contemplate on HIM. When we are examining Who we are. That is The silence. (Mauna) Samarhta is advising our mind that we should live in this kind of silence whenever we are free.
He has always told us that we need not run away to Jungle. On the other hand he has told us to continuously put our efforts to train our mind remaining all the while in this Sansara. This training of our mind to remain in silence is a long term activity. It has to be done again and again untill it becomes our second nature.and habit.In fact once we develope such habit then the body will be doing its assigned task but the mind will always dwelve on the LORD. This is the Namasmarana. When we speak we should praise LORD SRIRAM who gave us the inspiration to do a certain task. In case we forget , we can at least be greatful to him and offer HIM the task and it's results. This is doing the RAMAKATHA as is said in the second line of the shloka.
In fact Samarthaji has also advised us that we should leave that place where people around are not following this methodology and path. It is better to live in a jungle he says inthe fourth line of the shloka.

We can at least avoid such company.

But it is not always possible to do so. Then we should pray to Him that O RamaRAYA , you have put me in this company. Please do not allow my mind to get carried away form my chosen path. If our prayer is comming from the bottom of our hearti.e. sincere then HE will definitely respond and protect us. The Lotus flower is living in the pond with mud around it. It does not get affected by the Mud and water around it. We are expected to live in this world like that.Then we will find that living in this world is not difficult.
Basically we should always remember this shloka for this background.

Jai Jai Raghuveer Samartha.

Gandhali said...

श्लोक ४४
हे मना आपले या जन्माचे हित साधायचे तर रघुनायाकाविण व्यर्थ शब्द बोलून वाणी शिणवू नकोस.सतत रामाचा निजध्यास ठेव हे मागील श्लोकात सांगितले ते कसे साध्य होईल तर १) वाणीवर त्यायोगे मनावर नियंत्रण २) दुष्टसंग त्याग
वाणीचा संयम शरीर आणि मनाचे बळ वाढविण्याच्या दृष्टीने एक चांगला प्रयोग आहे.गरजे पेक्षा जास्त बोलू नये इतर वायफळ बोलण्यातून अभिमान बाहेर पडतो त्यातून कोणालातरी दुखावले जाऊ शकते,कलह निर्माण होतात.
" जनी उदंड पाहिले I कळहो करीत राहिले I
अनन्य देव भेटला I कळहो तयासी तुटला I
कळो करील शब्द रे I अनंत तो नी:शब्द रे I
तुम्ही अनंत का न व्हा I वेवादिता अवासवा II (स्फुट श्लोक)
मौन म्हणजे केवळ मुखस्तंभ राहणे आणि मनात सतत संकल्प विकल्प सुरू हे असले मौन संताना अभिप्रेत नाही .मनाचे ही यंत्र बंद राहणे .शब्दरुपाने मागचे काही स्मरण नसावे व पुढचे चिंतन नसावे.मनातल्या मनातही नी:शब्दात येणे म्हणजे खरे मौन... "ते शब्द सांडून बैसला I तो मौनी म्हणावा भला I"
वाणीने आवश्यकतेशिवाय बोलूच नये असे आतून वाटणे महत्वाचे .ते साधे पर्यंत बोलावेसेच वाटले तर राघवाचे गुणगान गावे त्यामुळे चित्त शुद्ध होत जाते ,भक्ती वाढते.जगाचे वाईट संस्कार आपल्यावर होत नाहीत आणि आपले सतत ऐकून भक्ती प्रेमाचे संस्कार आपल्या आजूबाजूच्या लोकांवर न कळत होतात.
'नसे राम ते धाम ' म्हणजे परमार्थाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही अशा गोष्टी ,अशी कार्ये करण्याचे टाळावे.सुख,ऐश्वर्या,लालसा, वासना,त्यायोगे येणारा अहंकार हे सर्व पोसले जाते आणि आपण भगवंतापासून त्याच्या चिंतनापासून विचलित होऊ शकतो म्हणून अशी कामे आणि अशी ठिकाणे सोडून द्यावी.त्यापेक्षा एकांत धरावा.एकांतापासूनच सर्व लाभ होतात.विवेक सुचतो,ध्यानधारणा जमते.
" एकांती विवेक करावा आत्माराम वोळखावा (द.१९-६-३० )
आणि लोकात राहून हे जमत नसते तरी सुद्धा हे करणे इतके महत्वाचे आहे की तू अगदी अरण्यात निघून जा असे समर्थ सांगतात.वनसौन्दर्य आणि शांतता हे त्यासाठी पोषक असतेच. तेथे जाऊन ध्यानधारणा उत्तम होइलच.पण सध्याच्या काळात हा अरण्यात जा ,ते धाम सोडून दे हे रूपक अर्थाने घ्यावे.समर्थ मनाला समजावून विवेक जागा करत आहेत.लोकव्यवहारात फार रमू नकोस ,संसारात सर्व करावेच पण अलिप्तपणे कर .ते घर सोड म्हणजे सतत द्रव्यदाराचे चिंतन सोड.जगाचे व्यवहार सुरू होण्यापूर्वी उठून एकांतात ध्यानधारणा चिंतन करून एकांत मिळव.त्यानेच तुझे कल्याण होणार आहे.