Friday, October 8, 2010

श्लोक ४१

II श्रीराम समर्थ II

बहू हिंडता सौख्य होणार नाही |
शिणावे परी नातुडे हीत काही ||
विचारे बरे अंतरा बोधाविजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ४१ ||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ....

[हिन्दी मे]
यु ही भटकने से कभी सुख नही मिलता|
थकने पर भी कुछ प्राप्त नही होता||
विचार करने पर अंतर मे होता रे|
हे मन ! सज्जन राघव के मन में बस रे||४१||
सार्थ..... श्रीरामदासजी कहते है कि हे मनुष्य मन ! अत्यंत व्यर्थ मे भटकने से सुख की प्राप्ति नही होती है| अत्यधिक व्यर्थ भटककर थकने पर अपने हित के लिये कुछ भी प्राप्त नही होता है यह सत्य है| अत: इस पर विचार करके तो देखो, अपने अंत:करण से पूछकर तो देखो ? इसलिये हे मनुष्य ! अपने को सज्जन व्यक्ति बनाने का प्रयत्न करके श्रीराम स्वरुप मे लीन होकर जीवन व्यतीत करना चाहिये|

suvarna lele said...

समर्थ सांगतात की 'बहू हिंडता सौख्य होणार नाही ' ! यामध्ये समर्थांना सांगायचे आहे की तुम्ही कितीही तीर्थ यात्रा केल्या तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही।फक्त श्रम होतील ।कारण सर्वत्र तुला पाणी,दगड गोटे च सापडतील ,तुज्या हाताला काहीच लागणार नाही ।तुला समाधान मीळनार नाही ।परमार्थाची प्राप्ती होणार नाही ।कारण देव आपल्या अंतर्यामी आहे ।त्याला आपण ओळखत नाही ।तुकाराम महाराज म्हणतात : देही असोनिया देव । वृथा फिरतो निर्देव । आपल्याच देहात असलेला देव ओळखन्याचा प्रयत्न हे मानवा तू कर ।त्यासाथी समर्थ सांगतात की एका ठिकाणी बस ,मन एकाग्र कर ,मीच तो आहे असे मानण्याचा अभ्यास कर की तुला परमेश्वराची प्राप्ती होईल् ।पण त्यासाथी एक करावे लागेल ,विवेक व वैराग्य हवे ।विवेकाने तुला दृश्य विश्व नाशिवंत आहे हे समजेल् तर वैराग्याने तू या दृश्य विश्वाच्या आसक्तीतून बाजूला होशील ।रघुनायकाला दृढ धरायला शिकशील् तर अंतरात्म्याचा शोध् घेऊ शकशील् ।म्हणून समर्थानी मनाला समजाविले आहे की 'विचारे बरे अंतरा बोधविजे '

Suhas said...

हा समर्थांचा श्लोक आजच्या काळात अत्यंत मार्गदर्शक आहे. क्षणोक्षणी दूरदर्शनचे चेनेल बदलणार्या आजच्या जमान्यात मनाला कोठेच स्थिरता मिळत नाही.. एका घरात सुख नाही,,, आणखी मोठे हवे.. या नोकरीत सुख नाही.. अधिक पैश्याची हवी..एवढेच काय आपल्या जोडिदाराबरोबर देखिल एकत्व नाही! सातत्याने बदल करणे हे मनाच्या अस्थिरतेचे आणि कमकुवतपणाचे लक्षण आहे !
" बहु हिंड्ता.." हे फक्त अध्यात्मातच नव्हे तर रॊजच्या जगण्यातही सत्य आहे. असल्या धरसोड वृत्तीने वृथा शीण होतो पदरी काहीच पडत नाही.. कुठेतरी निष्ठा ठेऊन चित्त स्थिर करुन सातत्याने प्रयत्न करण्यासाठी जो दम असवा लागतो त्याचा विशेष अभ्यासच करावा लागतो.. तितिक्षा अंगी आणावी लागते.. वाट पहाण्याची तयारी असायला हवी.. दोन मिनिटे रहदारी थांबली तरी देखील आमचा रक्तदाब वाढतो! असला उतावळेपणा काय कामाचा? फास्ट फूडच नव्हे तर जगणेच फास्ट झाले आहे .. त्याला विवेकाचे ब्रेक लावले नाहीत तर अपघात अट्ळ आहे.. ही रोजच्या जगण्याची गोष्ट झाली ,, परमार्थात देखील कष्टाची तयारी हवी.. " तुका म्हणॆ तेथे नाही चालत तातडी.. प्राप्तकाळ घडी आल्याविना!..

Gandhali said...

श्लोक ४१
हे मना ,वेगवेगळे देव , तीर्थाटणे, यात्रा, अनेक संत त्यांची प्रवचने, निरुपणे, भजन कीर्तन ,पूजा, व्रतवैइकल्ये,उपासना या सर्वांचा मनाला देवाची ,परमार्थाची ओढ निर्माण होण्यासाठी,बुद्धीचा निश्चय होण्यासाठी पाया म्हणून नक्कीच उपयोग होतो पण वरचेवर वर्षानुवर्षे फक्त तेच करीत राहिलो तर साधना म्हणुं त्याचा उपयोग होत नाही .पहिलीतच किती वर्षे राहणार,पायरीपायरीने पुढच्या वर्गात जाणे हे अंतिम ध्येय असावे.त्यासाठी निष्ठा कोठेतरी एके ठिकाणी स्थिरावली पाहिजे.अनेक वक्ते,अनेक ग्रंथ,अनेक विचार याने केवळ शीण आणि कष्टच यात वेळेचा ,काळाचा,संपत्तीचा अपव्यय होतो.
" विचार न करिता जे जे केले I ते ते वाउगे व्यर्थ गेले I म्हणोनी विचारी प्रवर्तले I पाहिजे आधी II "
विचार करून विवेकपुर्वक वागून नाविन्याची ओढ असणाऱ्या चंचल मनाला हिताचे काय समजाऊन दिले पाहिजे.एकांतात शांतपणे विचार करून आत्मारामाचा शोध घेतला पाहिजे.
" संसार त्याग न करिता I प्रपंच उपाधी न सांडीता I जनामध्ये सार्थकता I विचारेची होय II "
म्हणून हे मना नुसते पुष्कळ हिंडणे उपयोगाचे नाही.देवासाठी हिंडायला नको तो बसल्याजागी अंतरीच सापडणारा आहे. "अंतरीचा देव अंतरीच पाहावा "
एकांती विवेक विचार करून त्या आत्मारामाला आळवावे आणि हा अनुभव घेण्यासाठी सदैव राघवरूपी चित्त स्थिर ठेव.तुझ्या मनाचे निवास स्थान प्रभूचरण हेच व्हावे म्हणजे तू चिरंतन सुख उपभोगशील......