Friday, October 1, 2010

श्लोक ४०

II श्रीराम समर्थ II

मना पविजें सर्व ही सूख जेथे|
अति आदरे ठेविजें लक्ष तेथे ||
विवेके कुड़ी कल्पना पालटीजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ४० ||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar ) [हिन्दी मे]
हे मन तु चाहे सारे सुख जहॉ पर|
अति आदर रखता लक्ष से वहॉ पर||
बुरी कल्पना जो विवेक से है जाती|
हे सज्जन मन राघव मन कर बस्ती||श्रीराम||४०||
अर्थ..... श्रीराम दास जी कहते है कि हे मनुष्य ! तु कितना स्वार्थी है कि जहॉ पर सारी सुख सुविधाये प्राप्त होती है वही पर ज्यादा आदर देने का कार्य करता है तथा उसी व्यक्ति मात्र की ओर ध्यान देता है|अत: हे मानव ! परमेश्वर का भी ऐसा ही होता है कि जहॉ उसे याद किया जाता है वही वह ध्यान देता है| इसलिये अपने मन की बुरी तथा दुष्ट अर्थात् अशुध्द कल्पनाओं को अपने मन से दूर करना चाहिये तथा श्रीराम की भक्ति मे लीन रहना चाहिये|.......

suvarna lele said...

राघवाच्या ठिकाणी वस्ती का करायची याचा विचार समर्थांनी या श्लोकात केला आहे .मनुष्य जीवनात एकच गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न करत असतो .ती गोष्ट म्हणजे सुख .तो मिळविण्याचा प्रयत्न करत असतो पैसा ,घर ,गाडी ,बंगला ,मुले मार्गाला लागून सुखी असणे ,परंतू त्याला कळत नाही की ह्या सर्व भौतिक गोष्टीं पासून मिळणारे सुख क्षणिक असते .शाश्वत सुख मिळण्यासाठी समर्थ मनाला सज्जन म्हणून चुचकारत राघवाच्या ठिकाणी वस्ती करायला सांगतात .सुख दोन प्रकाराने प्राप्त करून घेता येते .एक प्रवृत्ती मार्गांने वा दुसरे निवृत्ती मार्गाने !भौतिक मार्गाने मिळणारे सुख ईंद्रियातून मिळते तर निवृत्ती मार्गाने मिळणारे सुख म्हणजे आत्मसुख ! आत्मसुख मिळते आत्मज्ञानाने ! बहुदाज्ञान निरुपण समासात श्री समर्थांनी आत्मज्ञान हेच खरे ज्ञान असे म्हटले आहे .कारण आत्मज्ञान प्राप्त झाले असता दुसरे काही मिळवायचे शिल्लक उरत नाही .त्यातून ब्रम्हानंद मिळतो ,तो सर्वात उच्च दर्जाचा आनंद समजला जातो .तो मिळवण्यासाठी राघवाच्या ठिकाणी वस्ती करायला समर्थ सांगतात

Suhas said...

अत्यंत सुखाचा, अविनाशी, टिकणार्या सुखाचा मार्ग धरावा हे समर्थ मनाला सांगत आहेत... आमच्या पूर्वसुरीनी शाश्वत सुखाचा चिरकाल टिकणारा मार्ग सांगितला आहे .. तो सोडून अत्यंत हीन दर्जाचे, क्षणात नाहीसे होणारे आणि त्यामुळेच अधिक दु:खात नेणारे असल्या भौतिक सुख आपण शोधत बसतो आणि बुडत्याचा पाय खोलात .. या न्यायाने अधिकाधिक रुतत जातो. परमार्थाचा सारा प्रवास हा देह्बुद्धी कडून आत्मबुद्धी असा असून " कुडी कल्पना " म्हणजे देहाचे अस्तित्वच काल्पनिक आहे ! तेव्हा त्याला मिळणारे सुख ही काल्पनिकच ! साराच भातुकलीचा खेळ !हे समजण्यासाठी मनाच्या वस्तीवर राघवाचे ठाण हवे! जेथे राघवाचे स्थान तेथे देह्बुद्धी कुठली?

Gandhali said...

श्लोक ४०
हे मना , आपण सतत काय मिळवायच्या शोधात असतो आणि काय मिळाले नाही तर दु:खी होतो,ते म्हणजे सुख.साधारणता आपण विषयसुखाच्या ,संसारासुखाच्या मागे लागतो पण हे इंद्रियगम्य असून नश्वर आणि क्षणिक असते .प्राप्तीसाठी प्रथम कष्ट,मिळाल्यावर टिकेल का म्हणून तणाव आणि नंतर संपले किंवा नाविन्य संपले म्हणुन पुन्हा दु:ख आणि पुन्हा शोध ,अशांती .
सर्वोत्तम सुख परमार्थात आहे.मी माझेपणा संपून आपण जे,जे काही करतो त्यातून मिळणारे सुख आनंद देते .आत्मसुख हे इंद्रीयांपलीकडचे असते.सर्व सुखाचा अंतर्भाव ज्यात होतो ते प्राप्त झाले असता दुसऱ्या सुखाची अपेक्षाच राहत नाही
"सर्व सुखाचे आगर I बापरखुमादेवीवर II "
व्यवहारात सुद्धा थोडेसे सुख हवे तर कष्ट करावे लागतातच तसेच हे परमसुख मिळवायचे तर प्रयत्न हवाच .दीर्घकालीन अभ्यासाची आवश्यकता असते,म्हणूनच समर्थ त्या सर्व सुखावर परमार्थावरच आदरपूर्वक लक्ष ठेव,केंद्रित कर असे सांगतात. शास्त्रांचा अभ्यास ,वाचन ,श्रवण,मनन,सज्जनांचा सहवास,भजन,पूजन नामस्मरण , कामक्रोधादी विकारांना आवर ,या सर्व गोष्टी हळूहळू साधु लागतात.यामध्ये कित्येकदा बुद्धी स्थिर होत नाही.वाईट कल्पना म्हणजे मिथ्या,अशुद्ध परमार्थाला घातक कल्पना आड येतात त्याना जाणावे.चांगल्या वाईटाची विवेक करण्याची शक्ती क्रमाक्रमाने वाढत जाईल अन वाईट आहे हे एकदा ठामपणे कळले की सुटणे वा सोडणे हे शक्य होऊ लागते .
" म्हणौनी सर्वांचे मूळ I ते हे कल्पनाची केवळ I
इचे केलिया निर्मूळ I ब्रम्हप्राप्ती II "
त्या दृष्टीने माणसाने प्रयत्नशील असावे. मी जीव नव्हे आत्मा सगळीकडे तोच एक भरून आहे या शुद्ध कल्पनेने मी,माझे घर,माझा संसार या अशुद्ध कल्पनेला नाहीसे करावे मग उरलेली शुद्ध कल्पना स्वरूपचिंतनी तद्रूप होते मग उरते ते आत्मासुखच .यास्तव प्रयत्नपूर्वक रामचंद्रांच्या चरणाशी सतत राहिले पाहिजे ,मन परमार्थात स्थिरावेल असा उद्योग केला पाहिजे ,मना सज्जना राघवी वस्ती कीजे असे पुन:पुन: सांगितले आहे ते यासाठीच ...