II श्रीराम समर्थ II
बहुतापरी हेची आता धरावे|
रघूनायका आपुलेसे करावे ||
दीनानाथ हा तोडरी ब्रीद गाजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे || ४२ ||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, October 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
समर्थांनी या श्लोकात सार सांगितले आहे की 'रघुनायकाला आपुलेसे करावे ।'रघुनायक आपलासा कसा होईल् ?प्रेमाने ,भक्तीने ! आपल्या प्राणापेक्षा सुध्दा जास्त प्रेम रघुनायकाला द्यायला हवे। काहीही झाले तरीही रघुनायका वरचे प्रेम कायम रहायला हवे । रघुनायकच सर्व कर्ता असे जाणून त्याच्यावर सर्व भार टाकून आपले विहित कर्म करत फलेच्छा न धरता रामाची भक्ती करणे हा उपाय आहे रघुनायकाला आपलेसे करण्याचा ! देवाच्या सख्यत्वासाठी । पडाव्या जिवलगांच्या तुटी । जिवलग जरी दूर करावे लागले तरी चालतील् पण देवाशी दूरत्व पत्करायला तयार व्हायचे नाही ,ईतके सामार्थ्य स्वत् :च्या अंगी बाणवायचे म्हणजे रघुनायकाला आपलेसे करायचे । कारण तो दीनानाथ आहे ।त्याच्या पायातील् तोरदया आपल्याला भक्तांच्या रक्षणाचे आश्वासन् देतात ।म्हणून रघुनायकाला आपुलेसे करावे असे सामर्थ् म्हणतात ।
मनाला पुन:पुन्हा समजवताहेत की रे मना, रघुनायकाला आपलेसे कर.. बाकी सारे व्यर्थच आहे ..लोक कल्याणाची अत्यंतिक तळमळ समर्थांच्या पोटी आहे आणि ज्याप्रमाणे आई लेकराला एकच गोष्ट पुन:पुन्हा सांगते त्याच प्रमाणे हे समर्थांचे सांगणे आहे.,...
अनेकानेक उदाहरणे देऊन, वेगवेगळ्या शब्दात समर्थ सार सांगत आहेत.. पंतोजी हातात पाटी घेऊन एकच अक्षर सतत घोटून घेऊन पक्के करतात अगदी तसेच ओढाळ मनाला समर्थ हीताच्या गोष्टी सांगत आहेत ..आणि अशी खात्री देत आहेत की तो "दीनानाथ"आहे .. त्याच्या तोडर्या हेच तर सांगत आहेत! अश्या दैन्य घालवणार्या रघुनायकाला तू आपलेसे कर.. !
श्लोक ४२
हे मना,बहुत सांगून झाले आता सर ऐक.३८ व्या श्लोकापासून या श्लोकापर्यंत सांगितलेल्या भक्तिमार्गाने भगवंताला आपलेसे करून घेण्याचे साधंच समर्थ सांगत आहेत.
३८ उत्कट भक्तीने साधना करावी.
३९ चित्ताच्या चान्चालातेचा त्याग करावा.
४० कल्पनेचा क्षय करून मनोजय करावा.
४१ निष्ठेने एकाग्रतेने आत्मशोध घ्यावा.
४२ इथे सर्व सार सांगितले आहे वरीलप्रमाणे भक्तीकरून तो परमेश्वर आपलासा करून घे म्हणजे 'विभक्त नव्हे तो भक्त ' अशी स्थिती होते आणि हे सर्व करीत असताना परमेश्वर दीनांचा,अनाथांचा ,अनन्यभावाने शरण आलेल्यांचा रक्षण करतो हा ठाम विश्वास बाळगावा .दिनानाथ म्हणजे दीनांचा कैवारी.दीन म्हणचे दुबळे ,दरिद्री लाचार,व्याधीग्रस्त असे पिडीत जन नाही , तर नारदांनी भक्तीसुत्रात म्हटले आहे दीन म्हणजे ज्यांचा अभिमान गळून पडला ,अहंकार गेला तो.
खरी आर्तता त्याविना उत्पन्नच होत नाही .व्याकुळ होऊन आर्ततेने परमेश्वराची करुणा भाकतो.जे जे माझेसाठी करतो ते ते वास्तविक देवासाठीच अशी दृढ भावना ठेवतो तेंव्हाच तो परमेश्वराचा होतो.परमेश्वर त्याला आपला म्हणतो.
मी आणि राम एकच असे वाटणे हीच राघवी वस्ती ......
As stated by Lochan Kate ( Gwaliar)....
[हिन्दी में]
बहुतों के लोकों में क्या करना है रे |
रघुराम को तु अपना बना रे ||
दिनानाथ है वो तोडर जिसका गरजता |
हे मन सज्जन राघव में जो है बसता ||४२||
अर्थ.. श्रीरामदास जी कहते है कि हे
मानव मन ! समाज उध्दार के लिये अपने नामस्मरण से एवं सदकार्य से श्रीराम को
अपना बनाने का प्रयत्न करना चाहिये | दीनों के स्वा,ई श्रीरामचन्द्र जी
गरीबों की रक्षा करते है | उनक डंका चारों ओर गरजता है | इसलिये हे मनुष्य !
सज्जनता पूर्वक आचरण करके श्रीराम के स्वरुप में लीन होकत्र जीवन व्यतीत
करना चाहिये | जिससे अपना जीवन सार्थक हो सके |
Post a Comment