II श्रीराम समर्थ II
देहेंरक्षणाकारणे यत्न केला |
परी शेवटी काळ घेउनि गेला ||
करी रे मना भक्ति या राघवाची |
पुढे अंतरी सोडीं चिंता भावाची ||२६||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, June 25, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
7 comments:
As Stated by Lochan Kate ( Gwaliar)...
श्लोक २६....
देह ना अमर प्रयत्न थकते ही जाते |
अंत में जीव को काल ही है ग्रसते||
अत: मन से भक्ति कर ले राघव की|
और तु छोड चिन्ता इस जहांन की||.
श्लोक २६ ...
श्री समर्थ रामदासजी कहते है कि -- मनुष्य अपने देह [शरीर] की रक्षा करने का प्रयत्न करता है परन्तु अंत काल मे, समय उसके प्राण ले ही जाता है| अत: हे मानव ! श्रीराघव की भक्ति के प्रति सदैव समर्पित रहे और संसार की अन्य सारी चिंताओ को छोडने का प्रयत्न करो क्योकि कुछ भी हो जाये श्रीराघव की भक्ति मे ही जीवन का सम्पूर्ण सार है|
देह म्हणजे मी असे आपण समजतो .त्यामुळे या देहाची आपल्याला अत्यंत चिंता असते .देहरक्षणा साठी आपण पाहिजे तितके प्रयत्न करतो .पण काळाची झडप जेव्हा पडते तेव्हा कोणाचाच ईलाज चालत नाही .परिक्षीत राजाने त्याच्या देहरक्षणाचा प्रयत्न केला पण बोरातून आळीच्या रूपात येउन तक्षकाने परिक्षीतीचा प्राण घेतला .म्हणजे आपले श्वास आपल्या आयुष्यात किती घ्यायचे ते ठरलेले असतात .ते संपले की काळ त्याचे काम
बजावतो .आपल्याला माहित नसते की केव्हा काळ आपल्याला घेउन जाणार आहे.
म्हणून समर्थ सांगतात :हे मना ,तुझा देह परमेश्वराने दिला आहे त्याचा चांगला उपयोग कर .केवळ तुझा देह बाहेरून शृंगारु नकोस . तू जेव्हा श्रीरामांचे नाम घेउ लागशील तेव्हा स्वत :मध्ये मुमुक्षु मध्ये असणारे सगळे गुण आपोआप येतील .फक्त तुझ्यामध्ये श्रीरामांवर निष्ठा हवी म्हणजे तुला श्रीरामांबद्दल प्रेम वाटायला लागेल .त्यांच्या बद्दल भक्ती वाढीस लागेल .हळू हळू तू साधक बनशील .जसजशी तुझी भक्ती फुलत जाईल तू सिद्ध बनशील आणि तुझ्या जीवनाचे सार्थक होईल .
राघवाची भक्ती केल्याने तुझी देहबुद्धी नाहीशी होईल .जन्म मरणाची तुझी चिंता तुला उरणार नाही . कोणतेही काम करायला घेतलेस तर राघवाच्या कृपेने त सफल होईल कारण राघवाच्या कृपेने तुझ्या मध्ये असलेला 'मी करतो ,मी केलं' हा अभिमान नाहीसा होईल .मीपणा नाहीसा झाल्यावर आत्मज्ञान सहज प्राप्त होईल मग तुझ्या वैभवाला कशाची कमी ?म्हणून हे मना राघवाची भक्ती कर म्हणजे तुझी संसार चिंता संपेल .
श्लोक २६
" हे मना ! हा देह रक्षणार्थ तू आयुष्यभर कष्टतो आहेस पण एके दिवशी काळाच्या जबड्यात सापडून तो नाहीसा होणार आहे यांचे भान ठेव . या भवसागरातून पार व्हायचे असेल तर श्रीरामाची भक्ती कर म्हणजे तुला पुढे संसार चिंताच राहणार नाही. "
देह नाशवंत तत्त्व एकत्र येऊन बनलेला एक नाशवंत पुतळा आहे.या नश्वर देहाला मी मी म्हणून सांभाळायचे, त्याचे लाड करायचे हे नक्कीच शहाणपणाचे नाही.त्याचे कितीही लाड केले,सारे जीवन त्याचे भरण पोषण करण्यात घालविले जाते पण शेवट त्याची मातीच होते ना ? देहाचे सुख हेच जन्माचे ध्येय असल्यासारखेच लोक वागताना दिसतात.श्री शिवरायांना एकदा मानत आले आपण समर्थांना पलंग बिछाना दिला आहे तरी ते डोंगरदरीत फिरत राहतात, अरण्यात, वनात निजतात असे कष्ट नको म्हणून त्यांनी समर्थांना विनंती केली की तुम्ही बिछान्यावर झोपत जा.समर्थ म्हणाले झोपू ,झोपू वेळ आली की नक्की झोपू.तोपर्यंत राजे तुम्ही पंढरपूरला जा तेथे खूप साधू सज्जन येतात त्यात तुम्हाला जो सत्पुरुष वाटेल त्यास पूजाअर्चन करून असा सगळा सरंजाम करून द्या.श्रीं शिवराय पंढरपुरी गेले तिथे त्याना श्रीगणेशनाथ नामक एक सत्पुरुष भेटले .राजांनी त्यांची शोडोपचारे पूजा केली व त्यांना राहण्याचा आग्रह केला.उत्तम बिछाना वगैरे दिले.सकाळी उठून दर्शनाला गेले तर त्यांनी पाहिले नाथांनी चादरी खाली नदीतीरावराचे खडे,काटे,सराटे आणून टाकले होते अन त्यावर निजले होते असे का विचारले तर नाथ म्हणाले,
" देहासी देता सौख्यासुरवाड I होईल तेणे परमार्थघरबुड I साधकासी कासया भलती भीड II "
देहाची उपेक्षा करावी असे नाही .शरीराचे सर्व अवयव धडधाकट व कार्यक्षम असावे.देहाचे सर्व व्यवहार चालू राहणार चालूच राहावे पण मन त्याच्या अधीन असते ते काढून रामाच्या चिंतनात लावावे.ज्याच्यामुळे हा देह मिळाला ,ज्याच्या तालावर हा देह चालतो तो आत्मा परमात्मा त्याला विसरून कसे चालेल ?
" तत्वे तत्व मेळविले I त्यासी देह हे नाम ठेविले I
विवेके देहा कडे पाहिले I तो तत्वे वोसरीले I "
जगत म्हणजे गतिमान हा प्राचीन शोध आहे.कालचक्र फिरत असते.आज ना उद्या काळ हा देह घेऊन जाणार आहे .
" देह जाईल जाईल I यासी काळ बा खाईल I "
आत्ता हा नरदेह मिळाला हे मोट्ठे घबाड आहे. देहात उत्तम ताकद आहे ,इंद्रिये काम देत आहेत तोपर्यंतच देहाचे सार्थक करावे.स्वहिताचा मार्ग, रामचिंतनाचा मार्ग स्वीकारावा.नाहीतर पुन्हा नीच योनीत जन्म घ्यावा लागेल.
"बहुता जन्मांचा शेवट I नरदेह सापडे अवचट I
येथे वर्तावे चोखट I नीतीन्याये I "
संसारचिंता केली व ना केली तरी संसार आपल्या मार्गाने चालत राहतो.एकदा का मन राममय झाले की सर्व प्रापंचिक चिंता दूर होतात , मनोरथे पूर्ण होतातन भौतिक संकटे येतच नाहीत असे नाही.सिद्ध साधूसंताना,उच्चतम भक्तांना असे अनुभव येत असतील ही,पण मनापासून रामची भक्ती केली त्याचे सतत स्मरण ठेविले तर भक्ताची जी श्रद्धा ,भक्ती देवावर असते ना ती shock absorber चे काम करते.सामान्यांवर संकटांचा, अडचणींचा आघात होतो तसा भक्तांवर होत नाही. कोणत्याही स्थितीत तो समाधानी व प्रसन्न राहू शकतो.
" नामे संकटे नासती ! नामे विघ्ने निवारती !! "
भगवंताच्या उपासकाने व्यवहारदृष्ट्या व्यक्तींची,वस्तूंची व घटनांची उत्तम काळजी घ्यावी पण अध्यात्मदृष्ट्या प्रपंचावरील भगवंताची मालकी ध्यानात ठेवून कोणाची व कशाची काळजी करू नये. योग्य प्रयत्न आणि प्रारब्ध यांचा परिणाम म्हणून जे व्हायचे ते होईल .संसार माझा नाही परमेश्वरी इच्छेने तो आला अशी धारणा ठेवावी . संतांचे चरित्र पाहिले तर ते प्रपंचात नटाप्रमाणे वागतात. नाटकापुरती भूमिका करायची नाटकाचा परिणाम स्वतःवर होत नाही. म्हणून समर्थ वारंवार बजावीत आहेत,
"करी रे मना भक्ती या राघवाची I पुढे अंतरी सोडी चिंता भवाची II "
!! श्रीराम !!
माणूस जन्मभर देहाचे रक्षण कसे होईल ? तो सुस्थितीत कसा राहील ? ज्यामुळे या संसारातील सुखे मला उपभोगता येतील याच प्रयत्नात असतो.हा प्रयत्न स्तुत्य आहे यात काही शंका नाही .आपल्या कडे जीवेत शरद: शत I म्हणजे तुला शंभर वर्षे आयुष्य लाभो असे म्हंटले जाते पण ते केंव्हा तर शरीर प्रकृती ठीक असेल , आजूबाजूला आपली काळजी घेणारी माणसे असतील तर.असे असले तरीमन्युष्य काही अमरत्वाचा पत्ता घेऊन आला नाही शेवटी काळ त्याला गाठतोच तो काळ माणसाला केंव्हा कुठे कसा गाठेल हे त्यालाच माहीत.
हे जर त्रिकालाबाधित सत्य असेल न एकदा देहपतन झाले म्हणजे पुढे त्याचे काय होते ? हे माणसाला काळात नाही.जीवाची ,देहाची आसक्ती सुटावी म्हणून देह जाळण्याची आपली पद्धत फार चांगली आहे.
या जीवाबरोबर काय येऊ शकेल तर ती गोष्ट म्हणजे आपण जन्मभर केलेली राघवाची भक्ती .या भक्तीमुळे माणसाला भेडसावनाऱ्या भवाची म्हणजे या संसाराची चिंता ,काळजी करण्याचे कारणच नाही .समर्थ सांगतात ही चिंता किंवा काळजी अंत:करणातून काढून टाक.
हे कसे घडते याचे सुंदर ओवीबद्ध विवेचन गीता अ ५८ श्लोक ६५
" मन्मना भव माद्द्भाक्तो मद्याजी म नमस्कुरु I
मामे वैश्यासी सत्यं ते प्रतिजाने प्रियोsसि मे II "
या वर श्री ज्ञानदेवांनी केले आहे ते मुळातूनच वाचणे श्रेयस्कर .....
" देहासी देता सौख्यासुरवाड I होईल तेणे परमार्थघरबुड I साधकासी कासया भलती भीड II "
हे काव्य पूर्ण मिळेल का?शिवरायांची कथा फारच छान आहे !
Post a Comment