Friday, June 11, 2010

श्लोक २४

II श्रीराम समर्थ II

रघुनायकावीण   वायां सिणावें|
जनांसारखें व्यर्थ का वोसणावे ||
सदा सर्वदा नाम वाचें  वसों दे |
अहंता मनी पापीणी ते  नसों दे ||२४||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

6 comments:

Kalyan Swami said...

As stated by Mrs.Lochan Kate ( Gwaliar)...
श्लोक २४
श्री रामदासजी कहते है कि हे मानव ! श्रीराम के नाम स्मरण के बिना जीवन मे सब कुछ व्यर्थ है| दूसरे को कटू भाषा मे निरर्थक बोलते रहना व्यर्थ है| इसलिये सदैव रामनाम ही बोलते रहना चाहिये| हे मानव ! इस पापी मन मे अहंकार का लेशमात्र भी नही रहना चाहिये| अत: सदैव म्रुदुभाषा में दूसरे से बात कहना चाहिए तथा अहंकार रहित जीवन व्यतीत करते हुए नाम स्मरण करना चाहिए|

suvarna lele said...

मागील श्लोकात समर्थ सांगतात की घडीने घडी काळ पुढे पुढे चालला आहे .आयुष्य हळू हळू कमी कमी होते आहे .गेलेला क्षण पुन्हा येणार
नाही .समर्थ म्हणतात :येचि क्षणी मरोनि जासी |तरी रघुनाथ भजनी अंतरलासी |म्हणून हे मना रघूनायका शिवाय मुखाने काही बोलू नकोस .रघूनायका शिवाय दुसरा कोणताही विचार करू नकोस .कारण रघूनायका शिवाय तू दुसरा कोणताही विचार केलास ,बोललास तर त्याचा शीणच येणार आहे .रघूनायका शिवाय कोणत्याही विषयाची प्राप्ती ही दु :ख देणारी ,शीण आणणारी आहे .
म्हणून सामान्य जनापेक्षा वेगळा व विशेष साधन मार्ग पत्कर.मिळालेल्या या दुर्लभ नरदेहाचे सार्थक कर ,व्यावहारिक गोष्टी मिळविण्यासाठी भक्ती करण्यापेक्षा परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी राघवाचे नाम घे ,माझ्या अंतर्यामी असलेल्या आत्मारामा मुळे हा देह चालतो आहे .तोच सर्व काही माझ्या कडून करवून घेतो आहे हा विचार जागृत ठेवून तुझा अहंभाव नाहीसा कर .त्यासाठी फक्त नामसाधन हा प्रभावी उपाय आहे .प्रापंचिक बडबड करू नकोस .केलीस तर अंतकाळी तुझ्या मदतीला कोण धावून येईल .

Yogini Godbole said...

Samartha mhantaat : ya nardehache saarthak karaiche asel tar satat bhagwantache naamsmaran karawe.
Deh naashiwant aslyamule kaal waya ghalavu naye aani saamanya jana pramane sukh- dukhaat manala shinavu naye.
Antaryami asleya aatmarama la smarun aapla aham bhav sodun mhanjech deh buddhi sodun naam sadhanene aatmabuddhit parvartit karave.

Dr.Madhavi Mahajan said...

।।श्रीराम समर्थ।।

यापूर्वी २२व्या श्लोकामध्ये समर्थ "मना सज्जना हीत माझे करावे । रघूनायका दृढ चित्ती धरावे" असे सांगतात....स्वत:चे हीत साधावयाचे असेल आणि रघुनायकाला दृढ चित्तात वसवायचे असेल तर काय केले पाहिजे याचा विस्तार समर्थ याश्लोकांमध्ये करीत आहेत...स्वत:चे हीत साधावयाचे असेल तर सर्वप्रथम व्यर्थ बोलण्यावर समर्थ आक्षेप घेतात...."जनी वाउगे बोलता सुख नाही" हे यापूर्वीच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात.....तर या श्लोकात "जनांसारखें व्यर्थ का वोसणावे" असे सांगुन पुन्हा एकदा वाणीवर संयम ठेवण्यास समर्थ सांगत आहेत.....हे मना तुझा जीव्हेवर सतत असणारे भगवंताचे नाम हे तुझा वाणीवर संयम आणण्याचे प्रभावी साधन आहे ....सतत नाम घेण्याची सवय मनाला आणि वाचेला व्यर्थ बडबड करण्यास आळा घालते.....भगवंता व्यतिरिक्त इतर बडबड ही वायफ़ळ बडबड आहे......मिळालेल्या या सामर्थ्याचा उपयोग करुन स्वत:चे हीत करुन घे....
भगवंताच्या नामाचे वळण जसे जीव्हेला लावायचे तसेच इतरांची निंदा न करता केवळ गुणांचा गौरव करण्याचे वळण लागणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे....सर्वसामान्यपणे आजच्या धावपळीच्या युगामध्ये नामासाठी वेळ काढायचा म्हटले की वेळ नाही ही सबब ठरलेली असते....परंतु इतरांची निंदा नालस्ती करताना, वायफ़ळ बडबड करताना खुप वेळ काढता येतो....खरे तर सतत भगवंताचे नाम घ्यावयाचे म्हणजे त्यामध्ये भगवंताला प्रिय असणारे वर्तन देखील अपेक्षीत आहे....वाणीच्या मध्यमातुन उत्तम विचार व्यक्त करणे, इतरांच्या गुणांचा गौरव करणे, दुस-याच्या मनाला शांतता लाभेल असे बोलणे, सत्यप्रिय भाषण असणे या गोष्टी देखील सतत नामस्मरणामध्ये अपेक्षीत आहे....या वाचिक तपाचा आपल्याला विसर पडतो.....समर्थांनी यापूर्वीच्या श्लोकामधून {"स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे", "मना सत्य ते सत्य वाचे वदावे",} वाणीचे महत्त्व स्पष्ट केले आहे.... याठिकाणी समर्थ सांगतात "सदा सर्वदा नाम वाचें वसों दे "
सतत भगवंताचे नाम घेताना अजुन एक पथ्य समर्थ सांगतात ते म्हणजे "अहंता मनी पापीणी ते नसों दे"....खरे तर भगवंताचे नाम आणि अहंकार या दोन गोष्टी एका ठिकाणी राहुच शकत नाहीत.....सर्व काही मी करतो हा भाव माणसाच्या मनात खोलवर रुजलेला असतो....त्याच्या बोलण्यातून हा दर्प सतत जाणवत असतो....कोणाचे कोणावाचून आडत नाही हे सत्य माहित असून देखील मी करतो हा व्यर्थ अभिमान त्याची पाठ सोडत नाही....स्वत:च्या कर्तृत्त्वाचा स्वत:च गौरव करणा-या अहंकारी वृत्तीपासून समर्थ दूर राहण्यास सांगतात.....स्वत:च्या कर्तृत्त्वाचा अहंकार असणा-या अहंकारी व्यक्तींना इतरांनी केलेल्या सहका-याची जाणिव नसते जे केले ते मी केले माझ्यामुळे सर्व घडले असाच त्याचा भाव असतो....या अहंकारी वृत्तीमुळे अशा व्यक्तीकडून अनेकांची मने दुखावली जातात....या अहंतेचा समर्थ पापीणी असा उल्लेख करतात..... "अभेदामाजी वाढवी भेदा । ते हे अहंता।" मनामध्ये द्वॆत निर्माण करणारी ही अहंता..... उत्तम गुणांपासून दूर नेणा-या या अहंतेला मनातून हद्दपार कर....आणि स्वत:चे हीत करुन घे असे समर्थांचे सांगणे आहे.....

॥जय जय रघुवीर समर्थ॥

Gandhali said...

श्लोक २४
" हे मना ! भगवंताला सोडून इतर काही करणे म्हणजे व्यर्थ श्रम आहेत.भगवंताला विन्मुख असणाऱ्या लोकांप्रमाणे वायफळ बडबड करू नये उलट वाचेने सतत भगवंताचे नाम घ्यावे.तसेच अध्यात्म दृष्ट्या घात करनारा अहंकार मनांत ठेऊ नये."
जीवनातील सारी धडपड प्रापंचिक लाभाने प्राप्त होणाऱ्या काल्पनिक सुखाच्या मागे असते. त्यातून काही निष्पन्न होत नाही हे लक्षात आले तरी पुन्हा पुन्हा निरनिराल्या प्रकारांनी तेच केले जाते. आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजातील बहुतेक सर्व लोक तत्वज्ञान दृष्ट्या फसव्या असलेल्या सुखोपभोगाच्या मागेच लागलेले असतात. खोट्या प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांना बळी पडलेले असतात.देखाव्यांना मोहित होऊन केवळ इतरेजनांचे अनुकरण करतात.त्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे,साधने ,विलास;सत्ता,संपत्ती संपादन करावी तेच सुख आहे.त्याने प्रतिष्ठा वाढते असे समजून त्या मागे धावतात आणि शेवटी या सर्व गोष्टी असमाधान देणाऱ्या,स्वास्थ्य घालवणाऱ्या ठरतात , अंतकरण निराश होते,म्हणून इतरेजनासारिखे प्रापंचिक सुखाच्या मागे लागून केलेले श्रम वायाच जातात.म्हणून ते सोड असे समर्थ सांगतात.तसेच बहुजन समाजाची भक्ती पण अनुकरणीय नाही कारण बहुतेक वेळा ती व्यावहारिक लाभाचीच असते .
" जनाचा लालची स्वभाव ! आरंभीच म्हणती देव !
म्हणजे मला काही देव ! ऐसी वासना ! "
म्हणून विचारी माणसाने इतर जनासारिखे त्याच त्याच माया मोहाच्या चक्रात अडकू नये आणि परमेश्वराची प्राप्ती हे मनुष्यजन्माचे सार्थक विसरून इतर ठिकाणी व्यर्थ वाया शिणू नये. मग काय करावे सगळ्यात सोपे सहज सुलभ साधन नाम घेणे .सतत देवाचे नाव घेत जा हे एकदा का साधले तर इतर आवश्यक गोष्टी आपोआप साधतात असे सर्व संताचे आश्वासन आहे.
" क्षण एक राम हृदयी धरिजे ! संसारी तरिजे हेळामात्रे !"
सहज सुलभ नामस्मरण मार्ग सोडून इतर काही करण्याची गरज नाही.पण मला जास्त कळते माझे मी निर्णय घेतो हि जी वृत्ती ती अहंकारातून येते .अहंकार मी व माझे या रूपाने प्रगट होतो.रोजच्या व्यावहारिक आयुष्यात सुद्धा हा अहंकार फारसा उपयुक्त ठरत नाही.सर्व नात्यांमधील ताण-तणाव हे या अहं मुळेच येतात. "Ego is just like dust in the eye , unless we clear the dust we cannot see anything clearly." आजूबाजूला चालू असलेले माणसाला दानव बनवणारे राजकारण अन त्याचे खेळ, बहुतेक गुन्हे यांचे बीज या ego,अहंकारातच आहे.
परमार्थात तर या अहंकाराइतके घातक कोणी नाही..ती अहंता एकदा मनात आली तर आपण रामापासून,सद्विचारांपासून दूर जातो.तिला जपण्यासाठी पातकाच्या पातळी वर ही माणूस जाऊ शकतो. समर्थानी तर अहंतेला पापिणी हे विशेषण दिले आहे
" अहंता पापिणी मोठी ! थोरथोरांसी सिंत ही !
बुकालावी धुमालावी ! लावावी भजना कडे ! " (चतुर्थामान)
देहबुद्धी,देहाभिमान म्हणजेच अहंता अन ती टाळायची तर नामाचा आधार घे.
,संत श्रीनामदेव सांगतात,
" साधनात सोपे नाम हे केवळ ! यावीण सकळ शीण वाया !"

lochan kate said...

[ हिन्दी मे]
रघुराम के बिन क्यो तु थका है|
जनो के जैसे व्यर्थ सम ये गवां रे||
सदासर्वदा नाम वाचा पर रख ले|
अहं पाप है वो तुझमे ना हो ले||श्रीराम||२४||